Author: saimat team

मुंबई, वृत्तसंस्था । अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीसाठी काम करणाऱ्या सुरेश पुजारीला बेड्या ठोकण्यात अखेर मुंबई पोलिसांना यश आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस सुरेश पुजारीच्या मागावर होते. २००७ मध्ये सुरेश पुजारीनं भारताबाहेर पलायन केलं होतं. तेव्हापासून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. अखेर, पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं असून सुरेश पुजारीला फिलिपिन्समधून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरेश पुजारीला १५ ऑक्टोबरला अटक करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. आता फिलिपिन्समधून त्याचं भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुरेश पुजारी मुंबई पोलिसांप्रमाणेच एफबीआय आणि सीबीआयच्या देखील रडारवर होता. एफबीआयनंच त्याला संयुक्त कारवाईमध्ये अटक केल्याची माहिती मिळत आहे. गेल्या…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथे जन नायक फौंडेशन यांच्या वतीने आज सकाळी पहूर कसबे ग्रामपंचायत हॉलमध्ये सामाजिक ऐक्य सद्भावना चे प्रतीक ईद-ए-मिलाद निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एडवोकेट संजय पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पवार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे माजी कृषी सभापती प्रदीप लोंढा शिवसेना प्रमुख तथा पत्रकार गणेश पांढरे उपसरपंच श्याम सावळे युवासेना उपतालुका प्रमुख अमीन शेख ग्रामपंचायत सदस्य ईका पैलवान शिवसेना उपतालुका प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव सरपंच शंकर जाधव ग्रामपंचायत सदस्य विनोद थोरात योगेश भडांगे अल्पसंख्या तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी…

Read More

यावल, प्रतिनिधी । सकाळच्या सुमारास शेतातील एका झुडपात एक नवजात स्त्री जातीचे अर्भक सोडून अज्ञात मातेने पलायन झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवजात स्त्री जातीचे अर्भक सोडून अज्ञात मातेने पलायन केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील सांगवी ते भालोद रस्त्यावरून काही शेतमजूर आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास शेतात कामाला जात असतांना वाटेत असलेले हरी बोरोले यांच्या शेताजवळ काटेरी झुडपात एका लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला. यावेळी मजूरांनी पाहणी केली असता त्यांना नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आले.…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । पुणे जिल्ह्यातील भोसरी एमआयडीसीतील जमीन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाल्या आहेत. या जमीन गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी ईडीने मंदाकिनी खडसे यांच्या चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानंतर आज मंदाकिनी खडसे या चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. अटक होणार? भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी मंदाकिनी खडसे यांनी मुंबई सेशन कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, 12 ऑक्टोबर रोजी सेशन कोर्टाने त्यांचा हा अर्ज फेटाळून लावला. त्यांच्याविरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मंदाकिनी खडसे यांना अटक होण्याची शक्यता आहे. तर एकनाथ खडसे यांना प्रकृतीच्या कारणामुळे दिलासा मिळाला…

Read More

यावल, प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील सावदा येथील प्रत्येक समाज आरक्षण मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करत आहे . त्या तुलनेत एस.बी.सी.समाज बांधवांनी मात्र आंदोलनाचा आक्रमक असा वेगळाच फंडा राबवला आहे . गटतट हेवेदावे हटवा-आरक्षण वाचवा हे ब्रीद वाक्य घेऊन आरक्षण चळवळ सप्ताह आयोजित केला आहे. या आक्रमक चळवळीत गावागावातील एस.बी.सी . समाज बांधवांनी सहभागी व्हावे आणि सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडण्यासाठी लढा भक्कम करावा असे आवाहन प्रदेश अध्यक्ष शशिकांतराव आमने यांनी केले आहे . अधिक माहिती की . राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक लोकप्रतिनिधी,आमदार, खासदार,मंत्री यांना आरक्षण मिळालेले असताना सुद्धा ते आणखी आरक्षण मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.त्या तुलनेत राज्यातील एस.बी.सी अंतर्गत पोट…

Read More

यावल, प्रतिनिधी । यावल नगरपरिषद हद्दीतील यावल फैजपूर रोडवरील गट क्र. 46 माधवनगर मधील मुख्यरस्ता संबंधित लेआउट धारकाने बंद केल्याने तसेच गटारीची तोडफोड करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे त्यामुळे लेआउट धारकावर गुन्हा दाखल करून रस्ता पूर्ववत सुरू करावा अशी लेखी तक्रार तथा मागणी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आणि गटनेते अतुल पाटील यांनी यावल नगरपालिका मुख्याधिकाऱ्याकडे केली तसेच 8 दिवसात कार्यवाही न केल्यास रहिवाशांसह यावल नगरपालिके समोर उपोषण करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. अतुल पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गट क्रमांक 46 मधील माधवनगर मधील मुख्य रस्ता गेल्या 35 वर्षापासून सार्वजनिक रित्या वापरला जात होता.विरारनगर,गणेशनगर, एकरानगर,रजानगर भागातील…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या नवीन कानळदा रोडवर रात्री राधाकृष्ण नगरात वडाचे झाड तोडण्यात आले आहे, परंतु त्याचे खोड व मूळे येथेच असल्यामुळे रात्री 11 वाजेच्या सुमारास चारचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली. वाहन चालक अतुल शिरसाळे हे आपले काम आटोपून घरी जात असताना रात्री अंधारात त्या वडाच्या खोडावर गाडी चालविली गेली याने मात्र गाडीचे भरपूर नुकसान झाले सुदयवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. यावेळी येथील नागरिक ही मोठ्या प्रमाणात एकत्र झाले होते , या वडाच्या झाडाचे खोड भरपूर दिवसापासून रस्त्यावर बाहेर असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे, या वडाच्या झाडाजवळ नगरसेवक दिलीप पोकळे यांचे कार्यलय आहे ,…

Read More

पहुर. ता.जामनेर, प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या गोद्री येथील एका ३४ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्या ची घटना आज सकाळी७वाजेच्या सुमारास उघडकीस आली. रेशमाबाई वजीर तडवी(वय६५)रा.गोद्री. ता.जामनेर यांनी पहुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की, माझा मोठा मुलगा युनुस वजीर तडवी(वय३४)याचा मृतदेह आज सकाळी ७वाजेच्या सुमारास घरासमोरील ओट्यावर आढळून आला. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे त्याची पत्नी हाजराबाई हीने सांगितले. हाजराबाई ही बाहेरख्याली वृत्ती ची असून तीचे गोद्री येथील नाना पुनमचंद नाईक(वय४०) याच्याशी अनैतिक संबंध आहे.या संबधाला कंटाळून मुलगा युनूस याने आत्महत्या केली. याप्रकरणी पहुर पोलिस ठाण्यात पत्नी हाजराबाई तडवी व प्रियकर नाना नाईक यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन 2021-22, 22-23,23-24 या तीन वर्षाकरीता लागू करण्यात आली आहे. या योजनेत जळगाव जिल्ह्यासाठी आंबिया बहाराकरीता केळी, मोसंबी, पपई, आंबा व डाळिंब या फळपिकांसाठी महसूल मंडळस्तर क्षेत्र घटक धरुन अधिसुचित मंडळामध्ये भारतीय कृषि विमा कंपनी लि. मुंबई मार्फत राबविण्यात येणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे. जळगाव जिल्ह्यात या योजनेव्दारे आंबिया बहार फळ पीकनिहाय केळी या पिकासाठी कमी तापमान, जादा तापमान, वेगाचा वारा व गारपीट, मोसंबी या फळपिकासाठी अवेळी…

Read More

जळगाव प्रतिनिधी । २३ वर्षीय तरूणीने राहत्या घरात रात्री ९ वाजेच्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद नशिराबाद पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. कल्याणी लक्ष्मण मिश्राम (वय-२३) रा. वर्धा ही तरूणी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नर्सिंगचे शिक्षण पुर्ण करून जळगाव शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये नर्सिंग संदर्भात प्रशिक्षण सुरू होते. घरी मुक्तेश्वर नगरातील गणेश वाणी यांच्या घरात भाड्याने राहत होती. कल्याणीने रविवारी १७ ऑक्टोबर रोजी रूमवर एकटी असतांना छताला गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी तिने बेड सुसाईड नोट लिहून ठेवली होती. हा प्रकार रात्री ९ वाजेच्या सुमारास घरमालक वाणी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नशिराबाद…

Read More