जळगाव, प्रतिनिधी । दि. १७ रोजी राजनंदिनी बहुद्देशीय संस्था आणि करणी सेनेचेवतीने कृषिरत्न, कृषीगौरव, नारी रत्न दोन हजार वीस एकवीस जीवन गौरव पुरस्कार हजारो मे दादा पाटील यांच्या हस्ते वितरण जळगाव समाजातील विविध गुणवंतांच्या पाठीशी सामाजिक संस्थांनी उभे रहावे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी त्यांनी केलेले अलौकिक कार्य समाजासमोर आणण्यासाठी विविध उपक्रमांची उपक्रमांच्या क्रमांक आयोजित करावेत गुणवंतांना देखील आपण करीत असलेले काम समाजाच्या विकासात कामी यावी यासाठी प्रज्ञा शील सहावे आपण केलेली मेहनत आपण केलेले काम तुम समाजातील नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी समाजाने पुरस्कार रुपी आशीर्वाद गुणवंतांच्या पाठीशी द्यावेत असे आग्रही प्रतिपादन यांनी व्यक्त केले. आज जळगाव येथील ओंकारेश्वर…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील बालविवाहाचे प्रमाण कमी करून जळगाव जिल्हा बालविवाह मुक्त करणे आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी समाजातील प्रत्येकाने पुढे येवून एकत्रितरीत्या बालविवाह विरोधात काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. महिला व बालविकास विभाग, यूनिसेफ व सेंटर फॉर सोशल ॲण्ड बिव्हेवियर चेंज कम्युनिकेशन (एसबीसी-३) यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह निर्मूलनासाठी प्रशिक्षकांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालकल्याण) देवेंद्र राऊत, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग…
यावल, प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील तसेच बुऱ्हाणपूर–अंकलेश्वर महामार्गावर असलेल्या सावदा एस.टी.बस स्थानकात गेल्या20वर्षापासून स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने हजारो प्रवासी वर्गात तसेच एस.टी.महामंडळ कर्मचाऱ्यांमध्ये,स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.या सार्वजनिक गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधीचे अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे या गंभीर समस्येची तक्रार फैजपूर येथील ललितकुमार नामदेव चौधरी यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्याने वरिष्ठ अधिकारी काय कार्यवाही करतात?याकडे संपूर्ण भुसावळ विभागाचे लक्ष वेधून आहे. रावेर तालुक्यातील सावदा एस.टी.बसस्थानक हे राष्ट्रीय मार्ग बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर मार्गावरील सामुहिक बाजारपेठ असलेले आणि यावल रावेर तालुक्यातील औद्योगिक,सामाजिक,शैक्षणिक मुख्य रस्ता असलेले परिवहनाचे सावदा रेल्वे स्टेशन5 ते10 किलोमीटरवर असल्याने 25ते30 हजार लोकसंख्या असलेल्या गावाजवळील भव्य अशा नवीन बांधकाम केलेल्या…
जळगाव, प्रतिनिधी । येथील गांधीतीर्थ येथे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर गांधी रिसर्च फाऊंडेशचे संचालक तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व जैन परिवारातील सदस्य, गांधीतीर्थचे सहकारी यांच्या उपस्थितीत सोविनियर शॉपचे उद्घाटन करण्यात आले. वातानुकुलीत व प्रशस्त अशा शॉपमध्ये ग्राहकांना विविध वस्तूंची खरेदी करणे शक्य व्हावे म्हणून ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अस्सल खादीप्रेमींसाठी गांधीतीर्थ प्रथम पसंतीस उतरले असून सोविनियर शॉप खादीप्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे. गांधीतीर्थचे निर्माते भवरलालजी जैन यांनी महात्मा गांधीजींना आपले आदर्श मानले आहे. महात्मा गांधीजींच्या विचारांचे, चारित्र्याचे पुढच्या पिढीत अनुसरण व्हावे या उद्देशाने जगातील अद्ययावत ऑडीओ, व्हीडीओ गाईडेड म्युझियमचे तत्कालीन महामहीम राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते 25 मार्च 2012…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल च्या (Petrol-Diesel Price) किमतींमध्ये वाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेल दोन्हींचे दर 35 पैशांनी महागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्यात येत आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं दिलेल्या माहितीनुसार, आजच्या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये पेट्रोल 105.84 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. तर डिझेलची किंमत आता 94.57 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. सलग महाग होणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. एकीकडे पेट्रोल पंपावरच्या मीटरचे आकडे दररोज वाढत चालले आहेत आणि तेवढ्याच वेगानं तुमचा-आमचा खिसाही रिकामा होत चालला आहे. आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 35 पैसे तर…
जळगाव, प्रतिनिधी । वाघुर धरण क्षेत्रात संततधार पावसाने जलाशयाच्या पाणी पातळी मध्ये वाढ होत आहे. सद्यस्थितीत वाघूर धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आले आहे व त्याद्वारे 13377 कयुसेक विसर्ग सोडण्यात आलेला आहे, तरी कोणीही नदीपात्राजवळ जाऊ नये. ही विनंती कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव यांनी कळविले आहे. काल शनिवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे आज रविवारी धरणाचे ४ दरवाजे २० सें.मी. ने उघडण्यात आले आहे. धरणातून २७०० क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तरी कोणीही नदीपात्रा जवळ जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले…
पुणे, वृत्तसंस्था । परतीच्या पावसामुळे नवीन कांदा लागवडीवर परिणाम झाला असून महाराष्ट्रातील शेतक ऱ्यांनी साठविलेल्या जुन्या कांद्याला परराज्यातून मागणी वाढत आहे. या मागणीमुळे बाजारात कांद्याचे दर वाढत चालले असून किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एक किलो कांद्याची विक्री ५० ते ६० रुपये किलो दराने केली जात आहे. नवीन कांद्याचे पीक हाती येण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे कांदा दरात यापुढील काळात वाढ होणार असल्याची माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली. महाराष्ट्रासह कर्नाटकात झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये परतीचा पाऊस झाला. नवीन हळवी कांद्याचे पीक साधारणपणे नोव्हेंबर महिन्याच्या आसपास येते. परतीच्या पावसामुळे नवीन कांद्याच्या लागवडीवर परिणाम झाला…
जळगाव, प्रतिनिधी । येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचालित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयाच्या ग्रंथालय व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जंयती निमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. डॉ. कलाम यांचे प्रतिमेस कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील याचे हस्ते माल्यापर्ण करण्यात आले सदर प्रसंगी प्रा डॉ. आर.एस. खडायते, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.बी.वाघुळदे उपस्थित होते. डॉ. शिरीष पाटील यांनी डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा जीवन परिचय व त्यांचे प्रेरणादायी विचार मांडून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. तसेच त्यांनी डॉ. कलाम लिखित ”अग्निपंख” या पुस्तकातील…
जळगाव, प्रतिनिधी । अवैध गावठी बनावटीचे पिस्टलसह धारदार चाकूने दहशत माजविणाऱ्या एका इसमास स्थानिक गुन्हे शाखा जळगावने अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, इसम गावठी बनावटीचा कटटा व धारदार चाकू बाळगून नशिराबाद गावात दहशत माजवित असलेला आरोपी मो. हाशीम मो. सलीन खान (वय ४१, रा.प्रल्हाद नगर, रिंग रोड, १५ बंगला जवळ, भुसावळ ता. भुसावळ जि.जळगांव) याला अटक केले आहे. पोलीस अधिकारी, अंमलदार, पोलीस उपनिरीक्षक, अमोल देवढे, संदिप रमेश पाटील, प्रविण जनार्दन मांडोळे, परेश प्रकाश महाजन, रविद्र रमेश पाटील यांच्या पथकाने नशिराबाद गावातील बस स्थानकाजवळ आरोपी मो. हाशीम मो. सलीन खान याला…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील सरदार वल्लभभाई पटेल हॉल (लेवा भवन) येथे लेवा सखी घे भरारी यांच्यावतीने भव्य दिपावली उत्सवाचे महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल हॉल (लेवा भवन) येथे १६ व १७ ऑक्टोंबर सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत भव्य दीपावली उत्सवाचे ( प्रदर्शन व विक्री) आयोजन करण्यात आले असून यात 48 स्टॉल व खाद्यपदार्थ 6 स्टॉल असणार आहेत. या उत्सवाचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक अरुण बोरोले उपस्थित होते. या उत्सवाला अध्यक्ष ऍड. भारती ढाके, सचिव निलम किनगे, उपाध्यक्ष डॉ. स्मिता पाटील, कोषाध्यक्ष भारती…