Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी जिल्हापेठ व्यायाम शाळा साने गुरुजी वाचनालयाचे बाजूला येथे सकाळी १० वाजता वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेतील प्रथम विजेते आठ पुरुष व महिला यांचा संघ पुढील महिन्यात पालघर येथे होणाऱ्या वरिष्ठ राज्य स्पर्धेत सहभागी होईल. सदर स्पर्धा जागतिक तायक्वांदो संघटनेच्या नियमानुसार होतील जास्तीत जास्त खेळाडूंनी यात स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे वतीने करण्यात आले आहे.

Read More

पहूर ता जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या लोणी गावी ग्रामपंचायतीच्या जागेवरील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या समोर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण हटाव पथकास आडवे आल्याने समोर आलेल्या पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी त्यांची समजूत काढत त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवत असताना त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला .याप्रकरणी पहूर पोलिस स्थानकात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे . तथापि एक जण फरार झाला असून पोलीस शोध घेत आहेत. जामनेर तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून तेथे गावातीलच व्यक्तींनी अतिक्रमण केले होते . अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतीने वेळोवेळी संबंधितांना तोंडी लेखी सूचना दिल्या…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । पेट्रोल-डिझेलच्या(Petrol Diesel Price) किंमती दररोज नवनवे विक्रम करत आहेत. आजही सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. कंपन्यांनी जारी केलेल्या नवीन दरानुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलीटर दरात प्रत्येकी 35 पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या दरांनुसार देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 106.89 आणि 95.62 रुपये इतका आहे. तर, मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 112.78 रुपये इतका आहे. तर एका लिटर डिझेलसाठी 103.63 रुपये मोजावे लागत आहेत. ऑक्टोबरमध्ये 5 रुपयांनी वाढ आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यात इंधनाचे दर 15 पटींपेक्षा जास्त वाढवण्यात आले आहेत. फक्त तीन दिवस वगळता…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत १०० कोटी लसींच्या डोसचा टप्पा पार करून भारताने गुरुवारी नवा विक्रम नोंदवला. देशाच्या करोनाविरोधी लढ्यातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार आहेत. यासंदर्भातील माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन देण्यात आलीय. सकाळी सात वाजता करण्यात आलेल्या ट्विटमध्ये, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दहा वाजता देशाला संबोधित करतील,” असं म्हटलं आहे. मोदी नक्की कोणत्या विषयावर बोलणार हे स्पष्ट करण्यात आलेलं नसलं तरी कालच देशामध्ये १०० कोटी लसींचा टप्पा पूर्ण झाल्याने मोदी या लसीकरण मोहिमेसंदर्भातच भारतीयांना माहिती देतील आणि लसीकरण मोहीम या पुढे कशी राबवली…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडील शासन निर्णय 6 जुलै, 2017 व दि. 16 सप्टेंबर, 2021 अन्वये जळगाव जिल्ह्यात आजमितीस रद्द असलेली, राजीनामा दिलेली व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची, मयताचे वारस नसल्याने/वारसांने विहीत मुदतीत अर्ज सादर न केल्याने, नवीन तसेच विविध कारणांमुळे अकार्यान्वित रास्तभाव दुकानांचा जाहिरनामा प्रसिध्द करणेबाबत निर्देश दिले आहे. त्यानुसार 1 ऑगस्ट, 2017 व 16 सप्टेंबर, 2021 अन्वये जळगाव जिल्ह्यात शहरी, ग्रामीण भागात अकार्यान्वित रास्तभाव दुकाने तसेच इतर कारणास्तव नवीन शिधावाटप दुकाने मंजूर करणेसाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. नवीन रास्तभाव/ शिधावाटप दुकाने व केरोसीन परवाने मंजुर करण्याकरीता जाहिरनामा काढणे व प्रसिध्द करणे…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 30 जून, 2021 रोजी आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिनांक 11 सप्टेंबर, 2021 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केलेले आहे. त्यासाठी अर्ज सादर करण्याची ऑनलाईन कार्यपध्दती महाराष्ट्र शासनाकडून लवकरच अधिसूचित करण्यात येणार असून त्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. त्यानुसार प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांनी त्यांचे पत्र दिनांक 12 ऑक्टोबर, 2021 अन्वये निर्देशित केलेनुसार जळगाव जिल्ह्यातील कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान वितरीत…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । आज दि. २१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय मुंबई येथे एजाज़ अब्दुल गफ्फार मलिक यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी नियुक्ती पत्र देतांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंतराव पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, खा. सुनील तटकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आदी उपस्थित होते.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । येथील जी. एच. रायसोनी इस्टीट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयातर्फे ता. २३ ऑक्टोबर शनिवार रोजी उद्योग आणि इस्टीट्यूटमधील विध्यार्थ्यांना कनेक्ट करणारा “संगोष्ठी” या महत्वाकांशी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या काळात अभियांत्रिकी,मॅनेजमेट,फार्मसी यासारखे विविध पदवीधारक युवक मोठ्याप्रमाणात महाविद्यालयातून शिक्षण घेवून बाहेर पडतात. म्हणजेच आजच्या विध्यार्थ्यांकडे आपण घेत असलेल्या विषयाचे परंपरागत ज्ञान आहे. परंतु आजच्या सत्यपरिस्थितीचे अवलोकन केले तर बाहेरच्या जगात लागणारे कौशल्य आणि शिक्षणात मिळणारे ज्ञान यात बऱ्यापैकी तफावत आढळून येते. याच अनुषंगाने बाहेरील इंडस्ट्री व एज्युकेशन इस्टीट्यूट यांनी सामंजस्याने एकत्र येत व बरोबरीने हाताला हात देत काम केले तर आजच्या या क्रांतिकारी युगात एक उत्तम विध्यार्थी नक्कीच…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जळगाव येथील नारीशक्ती गृप अध्यक्षा तसेच महिला पर्यावरण सखी मंच जळगाव जिल्हा कार्याध्यक्षा सौ.मनिषा किशोर पाटील यांना 17 ऑक्टोंबर रोजी इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन, खान्देश नारीशक्ती गृप, खान्देश न्यूज नेटवर्क आणि खान्देश जनसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय नारीदीप सन्मान-२०२१ गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मनिषा पाटील यांनी समाज कार्यामध्ये स्वताला झोकून दिले असून अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून देखील त्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतात.महिला पतंजली योग समितीच्या जिल्हा प्रभारी पदाची देखील जबाबदारी त्यांच्यावर असुन जळगाव शहरात गेली अनेक वर्षे मनिषा ताई विनामुल्य योग…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणखी तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झालं असून याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. यापूर्वीच अर्ज दाखलच न झाल्याने शिवसेनेचे २ तर राष्ट्रवादीचे १ असे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. दरम्यान काल बुधवार रोजी छाननीत विरोधकांचे अर्ज अवैध ठरल्याने राष्ट्रवादीचे आणखी तीन उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. छाननी दरम्यान अनेक उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आले होते. यात काही उमेदवारांचे अर्ज बाद ठरले असून यात अमळनेर मधून भाजपच्या माजी आ. स्मिता वाघ यांचा अर्ज बाद करण्यात आला तसेच मुक्ताईनगर आणि बोदवड येथील उमेदवारांचे अर्ज देखील…

Read More