Author: saimat team

पाचोरा, प्रतिनिधी । राज्यात पेट्रोल डिझेल यांचे भाव मोदी सरकार वाढवत असून या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहे. गोरगरीब नागरिक कोरोना च्या संकटाला तोंड देत कसातरी उदरनिर्वाह करत असून त्यामध्ये मोदी सरकार गोरगरिबांना लागणारे तेल गॅस पेट्रोलचे भाव दिवसेंदिवस वाढत असून गोरगरिबांनी जगायचं तरी कसं त्यासाठी आज बारा वाजता राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी गाडीवर मोटरसायकल घेऊन राष्ट्रवादी चे झेंडे लावून तहसील कार्यालयावर मोदी सरकार हाय चा नारा देत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी माजी आमदार दिलीप वाघ नगरसेवक विकास पाटील बशीर बागवान बागवान वासुदेव महाजन रणजीत पाटील गोपी पाटील संजय वाघ अशोक मोरे बोला चौधरी भगवान…

Read More

यावल, प्रतिनिधी । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड जळगाव बँकेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम सुरू आहे.आज दि.20 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या जळगाव येथील घरकुल घोटाळ्यातील काही आरोपी तथा जळगाव जिल्हा बँकेचे सभासद जळगाव जिल्हा बँक निवडणूक रिंगणात दिसणार आहेत का तसेच जिल्ह्यातील काही न्यायप्रविष्ट विविध कार्यकारी सोसायटीचे काही सभासद सुद्धा सहभागी होणार आहेत का याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष वेधून आहे आणि अशा काही अपात्र नामनिर्देशित पत्रांवर कोणी हरकती न घेतल्यास मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करून अपात्र अशा नामनिर्देशन पत्रावर हरकत घेणार असे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जळगाव जिल्हा(आदरणीय अण्णा हजारे कृत)संघटक…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । नवरात्रीच्या निमित्ताने समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडी यांच्यामार्फत करण्यात आला. आ. प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या सुचनेनुसार करण्यात आला. यावेळी या नवदुर्गाचा सन्मान करण्यात आला. सविता भास्कर नारखेडे-शेतकरी, शैलजा निकम- सहकार क्षेत्र, विजया पाटील – बॅकीग आॅफिसर, कल्पना वसाने- सामाजिक क्षेत्र, मयुरी भाऊसाहेब कर्पे- आशादीप अध्यक्ष, शोभा यशवंत हांडोरे-समुपदेशक, विद्या सुधाकर सोनार- शिक्षीका, जयश्री सुभाष पाटील-रिमांडहोम, मनीषा अनिल बागुल- जळगाव, सुवर्णलता अडकमोल आदी महिलांचा सत्कार करण्यात आला.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी खिरोदा प्र. या. तालुका रावेर येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन रमेश चौधरी (खिरोदा प्र.या., ता. रावेर) यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली. यावेळी महिला जिल्हा अध्यक्षा मंगलाताई सोनवणे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष किरण ठाकूर, प्रतिभा भालेराव, जिल्हा सदस्य कृष्णा जमदाडे , नेमाडे , सोनवणे , मोतीराडे व महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते . नितीन चौधरी हे केंद्र व राज्य योजना सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आहेत, तसेच त्यांनी काँगेसच्या युवक जिल्हा चिटणीस पदाची जबाबदारी देखील यशस्वीपणे पार पाडलेली आहे. सदर नियुक्ती झाल्याबद्दल छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री…

Read More

जळगाव,प्रतिनिधी। शहरातील एका भागामध्ये राहणाऱ्या २९ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव शहरातील आंबेडकरनगरात राहणाऱ्या लक्ष्मी सचिन सैंदाणे (वय २९) या विवाहित महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवार रोजी दुपारी उघडकीला आली आहे. दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयताचे कारण अध्याप स्पष्ट झालेले नसून घटनेची माहिती कळताच शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी तपासणी करुन मृत घोषित केले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । गेले दीड वर्ष बंद असलेली राज्यातील महाविद्यालये आजपासून सुरू होणार आहेत. मर्यादित उपस्थिती, लसवंतांनाच प्रवेश हे नियम लागू राहतील. मात्र, सध्या ऑनलाइन सत्र परीक्षा सुरू असल्याने अनेक महाविद्यालयांनी दिवाळीनंतरच प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविद्यालयांच्या संकुलातील गजबज दिवाळीनंतरच वाढण्याची शक्यता आहे. करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर ग्रामीण भागांतील काही महाविद्यालये अल्प कालावधीसाठी सुरू झाली होती. परंतु, दुसऱ्या लाटेनंतर सर्वच महाविद्यालये पुन्हा बंद झाली होती. सध्या अनेक महाविद्यालयांमध्ये पहिल्या सत्राच्या ऑनलाइन परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे बऱ्याच महाविद्यालयांनी बुधवारपासून वर्ग सुरू करण्यास असमर्थता दर्शवली आहे. के वळ विज्ञान, अभियांत्रिकी आदी शाखांच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षांसाठी बोलावले जाणार आहे. करोना…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ करण्यात आलीय. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये लिटरमागे ३५ पैशांनी वाढ केलीय. या दरवाढीबरोबरच ऑक्टोबर महिन्यातील एकूण इंधन दरवाढ ही साडेचार रुपये प्रती लिटरपर्यंत पोहचली आहे. आजची दरवाढ ही या महिन्यातील १५ वी दरवाढ ठरलीय. इंडियन ऑइल कॉर्परेशन लिमिटेडने आज जारी केलेल्या नवीन दरांनुसार दिल्लीमध्ये इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल १०६.१९ रुपये लिटर तर डिझेल ९४.९२ रुपये लिटरपर्यंत पोहचलं आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर लिटरमागे ११२.११ रुपये तर डिझेलचे दर १०२.८९ रुपयांवर पोहचलेत. ऑक्टोबरमध्ये १५ वेळा वाढले दर… ऑक्टोबर महिन्यामध्ये आतापर्यंत १५ वेळा इंधनाचे दर वाढवण्यात आले आहेत.…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । पिंपळगाव बु येथील हनुमान मंदिराजवळ बऱ्याच दिवसापासून असलेले घाणीचे साम्राज्य काही दिवसापासून पसरलेले होते, तरी देखील मंदिराजवळील गाजरी गवताचे व काटीचे झुडपे काढून संपूर्ण परीसर स्वच्छ करण्यात आला. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी गावात विजेच्या धक्क्याने माकडाचा म्रुत्य झाला होता, त्या माकडाचा अंतिम संस्कार करण्यात आला. गावातील रविंद्र महाजन यांच्यासह तरुणांनी हिंदू धर्माच्या पारंपरिक पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले.

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । दुकाने, उपाहारगृहे, मॉलची वेळमर्यादा वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. करमणूक उद्यानेही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात दुकाने आणि उपाहारगृहांची वेळमर्यादा वाढवून देण्याची मागणी दुकानदार, व्यापारी आणि उपाहारगृह मालकांच्या संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानंतर आता याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व उपाहारगृहे, हॉटेल्स रात्री १२ वाजेपर्यंत तर सर्व प्रकारची दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर राज्य सरकारने राज्यातील उपहारगृहे आणि दुकाने यांची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला. २२ ऑक्टोबरपासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृह सुरू केली जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपहारगृहांची वेळ…

Read More

जम्मू, वृत्तसंस्था । भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील ‘लष्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेच्या सहा दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं आहे. राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांमध्ये भारतीय लष्कराने ही कारवाई केली. भारतीय लष्कराच्या १६ पोलीस बटालियनकडून याच भागात दडून बसलेल्या तीन ते चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अजूनही चकमक सुरु आहे. राजौरी सेक्टमधील चकमकीमध्ये भारतीय लष्कराचे नऊ जवान शहीद झाल्यानंतर चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन राव यांनी १६ ऑक्टोबर रोजी या प्रदेशाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी या ठिकाणी नेतृत्व करणाऱ्या भारतीय लष्करातील कमांडर्सची सध्या सुरु असणाऱ्या कारवाईबद्दल चर्चा केली होती. यावेळी या कमांडर्सला स्वत: पुढाकार घेऊन दहशतवाद्यांवर हल्ला करण्याऐवजी वाट पाहण्याचा सल्ला देण्यात आला होता.…

Read More