जामनेर, प्रतिनिधी । येथील शेंदुर्णी वाडी दरवाजा भागातील एम एस सी बी ची डीपी मागील 32 ते 30 दिवसापासून बंद होती स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते आणि त्यांनीही त्यांची समस्या गावातील सर्व सर्व राजकीय पदाधिकारी स्थानिक नगरसेवक लोकप्रतिनिधी यांना सर्वांना सूचना दिली पण त्याची गोष्ट कोणीच घेतली नाही त्यांची ही समस्या त्यांनी वार्ड क्रमांक 16 चे शिवसेना शाखाप्रमुख संदीप काटोले यांना ही समस्या सांगितली समस्याचे गांभीर्य समजून संदीप कातुले यांनी शहर प्रमुख व उपतालुकाप्रमुख यांचा संपर्क केले असता त्यांनी त्यांना तातडीची भेट दिली व सामाजिक कार्यकर्ते शिवसैनिक युवराज बारी यांनी सर्व महिलांना समजावून सांगीतले, शिवसेना तुम्हाला दोन दिवसांमध्ये डीपी उपलब्ध…
Author: saimat team
यावल, प्रतिनिधी । यावल पंचायत समिती आवारात नवीन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा काल दि.24 रविवार रोजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन चोपडा विधानसभेच्या आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या व इतर प्रमुख विशेष अतिथींच्या उपस्थित संपन्न झाला परंतु या कार्यक्रमात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार शिरिषदादा चौधरी यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकल्याने रावेर व चोपडा या दोन्ही विधानसभा मतदारसंघात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावल तालुक्यात पूर्व पश्चिम भागात दोन आमदार आहेत पूर्व भागात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार शिरीषदादा चौधरी तर पश्चिम भागात यावल तालुक्याचा काही भाग समाविष्ट असलेल्या चोपडा विधानसभा मतदार संघ…
यावल, प्रतिनिधी । गोंदिया येथे जाणारा ३० टन रेशन तांदूळाचा साठा यावल पोलिसांनी भरदिवसा जप्त केल्याची घटना घडली. धुळे जिल्ह्यातून कापडणे येथून अमळनेर- चोपडा- यावल- भुसावल मार्गे गोंदिया येथे जाणारा ३० टन वजनाचा तांदूळ भरदिवसा (रेशन दुकानातील तांदूळ) वाहतूक करणारा ट्राला यावल मार्गे जात असल्याची गोपनीय खबर पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाल्याने त्यांनी ए.एस.आय मुजफ्फर खान, पो. कॉ. सुशिल घुगे, पोलीस वाहन चालक गणेश रोहील यांनी व त्यांच्या सहकारी पोलिसांनी यावल पोलीस स्टेशन पासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या केशरबाग हॉटेल जवळ सदर तांदळाचा ट्रक थांबवून चौकशी केली असता त्यात संशयास्पद रेशनचा तांदूळ असल्याच्या कारणावरून तो ट्राला यावल…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एम जे महाविद्यालयाजवळ असलेल्या एका मेडिकल ला रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. याप्रकरणी दहा लाखांचे औषधी जळून खाक झाले. यात कोणालाही जीवितहानी झालेली नाही. शहरातील एम जे महाविद्यालय परिसरातील समर्थ कॉलनीत रविवारी रात्री सव्वा अकरा वाजता वेणू फार्मसी या मेडिकलला आग लागली. यात आठ ते दहा लाख रुपयांची औषधी जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाचे बंब तातडीने दाखल झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मेडिकलचे मालक मिलिंद आनंद चौधरी (रा. दांडेकर नगर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सव्वा अकरा वाजता मेडिकलमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली बाहेर धूर व आगीचे लोळ येत असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी एकाच…
मुंबई, वृत्तसंस्था । अमली पदार्थाच्या निमित्ताने महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईत सिनेसृष्टी आहे आणि ते मुंबईचे वैभव आहे. एनसीबीच्या माध्यमातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही सिनेसृष्टी महाराष्ट्रातून निघून जावी अशा प्रकारचे प्रयत्न काही लोक करत आहेत, असा आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी केला. राज्य सरकारने या सर्व प्रकरणांची स्युमोटो दखल घेत विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करावी, अशी मागणीही राऊत यांनी केली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या कारवाईचे काही व्हिडीओ समोर आल्यानंतर, संजय राऊत यांनी एनसीबीसह केंद्रीय यंत्रणांवर जोरदार हल्लाबोल केला. अमली पदार्थाच्या निमित्ताने महाराष्ट्राला बदनाम करण्याची काही लोकांनी सुपारी घेतल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव…
जळगाव, प्रतिनिधी । शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या वाघुरच्या ३३ के.व्ही. उच्चदाब वाहिनीवरील केबल दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे वाघुर पंपिंगला होणारा वीज पुरवठा २५ ऑक्टोबर रोजी बंद राहणार असल्यामुळे जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. २५ ऑक्टोबर रोजी होणारा पाणीपुरवठा २६ ऑक्टोबर रोजी होणार असून, २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी होणारा पाणीपुरवठा अनुक्रमे २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती जळगाव शहर महानगरपालिका, पाणीपुरवठा विभागाचे शहर अभियंता यांनी दिली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
जळगाव प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी आणि विसनजी नगरातून एकाच दिवशी दोन दुचाकींची चोरी झाल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिल्या घटनेतील योगेश रमेश चौधरी (वय-३५) रा. आसोदा ता.जि.जळगाव हे फुल विक्रीचा व्यवसाय करतात. २२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांनी विसनजी नगरातील गायत्री मंदीराजवळ (एमएच १९ बीटी ०८८९) क्रमांकाची दुचाकी पार्कींग करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत सिंधी कॉलनी परिसरातील युनियन बँकसमोर संदीप बाळकृष्ण चौगुले (वय-३७) रा. विवेकानंद नगर साई बाब मंदीरासमोर जिल्हापेठ यांची…
जळगाव, प्रतिनिधी । सोळा वर्षाच्या मुलीवर नराधम पित्याने तीन वर्ष वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकात कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिता-पूत्रीच्या पवित्र नात्याला कलंक लागल्याची घटना शहरातील एका भागात घडली. आपल्या सख्या 16 वर्षीय मुलीवरच नराधम पित्याने तीन वर्षांपासून अत्याचार केला मात्र छळ असह्य झाल्याने अत्याचाराला वाचा फुटली व नराधम पित्याविरोधात पीडीतेने भुसावळ बाजारपेठ पोलिसात तक्रार नोंदवल्याने पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 41 वर्षीय संशयीत आरोपी पित्याला अटक करण्यात आली. शहरातील एका भागात पीडीता आपल्या वडिल व आत्या व भावासह राहते. पीडीतेच्या आईचे 13 वर्षांपूर्वीच निधन झाल्याने आत्यानेच पीडीतेचा सांभाळ केला. दरम्यान, संशयीत…
मुंबई, वृत्तसंस्था । देशभरात सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी जाहीर केलेल्या दरपत्रकानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा प्रत्येकी 35 पैशांची वाढ झाली आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचा दर प्रतिबॅरल 86 डॉलर्सपर्यंत पोहोचला होता. तो आता 85 डॉलर्सच्या खाली आला आहे. त्यामुळे भारतात इंधन स्वस्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून अद्याप इंधनदरात कपात करण्यात आलेली नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 113.46 रुपये इतका आहे. तर डिझेलचा प्रतिलीटर दर 104.38 रुपये इतका आहे. तर दिल्लीत पेट्रोल…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission, UPSC) ने सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी आणि इतर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केलीय. या अंतर्गत एकूण 64 पदांची भरती केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2021 आहे. त्याच वेळी, उमेदवार 12 ऑक्टोबर 2021 पर्यंत फॉर्मची प्रिंटआउट घेऊ शकतात. अर्ज करताना हे लक्षात ठेवा की उमेदवारांनी अधिसूचना फॉर्म पूर्णपणे वाचावा आणि त्यानुसार अर्ज करावा. रिक्त जागा तपशील सहाय्यक प्राध्यापक – 1 सहाय्यक संरक्षण…