Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । तूर हे जिल्ह्यातील खरीप हंगामातील महत्त्वाचे आंतरपीक आहे. तुरीवर शेंगा पोखरणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी व पिसारा पतंग आदींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत असतो. त्यासाठी वेळीच फुलकळी लागताना पहिली फवारणी निंबोळी अर्क 5 टक्के, दुसरी फवारणी 12 ते 15 दिवसांनी हेलिओकिल 500 मिली/हेक्टर गरजेनुसार, तिसरी फवारणी क्लोरोपायरीफॉस 25 मिली अथवा पॉलिट्रीन 20 मिली प्रोफेनोफॉस 50 टक्के ई.सी. 15 मिली 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. अळीचे प्रमाण सुरुवातीस जास्त असेल तर 45 टक्के स्पिनोसॅड 162 मिली किंवा इमामेक्टिन बेंझोएट 5 टक्के दाणेदार 220 ग्रॅम/हेक्टर 500 लिटर पाण्यातून फवारावे. तसेच क्रॉपसॅप…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । जागतिक संकेतानुसार सोमवारी दिल्ली सराफात सोन्याचे दर 182 रुपयांनी वाढून 47,023 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तयार चांदीचा दर मात्र 178 रुपयांनी कमी होऊ 64,721 रुपये प्रत्येक किलो झाला. सकाळच्या सत्रात रुपयाचे मूल्य 18 पैशांनी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली. जागतिक बाजारात डॉलर घसरत असल्यामुळेही सोन्याचे दर वाढत असल्याचे दिसून येते असे एचडीएफसी सिक्‍युरिटीज या संस्थेचे विश्‍लेषक तपन पटेल यांनी सांगितले. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,800 डॉलर व चांदीचा दर 24.48 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता.

Read More

नवी दिली, वृत्तसंस्था । ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून सुरु असलेली पेट्रोल-डिझेल दरवाढीनं महिना अखेरला थोडीशी उसंत घेतल्याचं चित्र आहे. लागोपाठ दुसऱ्या दिवशी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झाला नाही. दोन दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर उतार-चढाव पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली होती. भारतीय तेल कंपन्यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 26 ऑक्टोबर रोजीही पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) च्या किंमती स्थिर आहेत. याआधी 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) नं दिलेल्या माहितीनुसार, देशाची राजधानी दिल्लीमध्ये…

Read More

रत्नागिरी, वृत्तसंस्था । तब्बल तीन वर्षानंतर एसटीच्या तिकीटात भाडेवाढ झालीये. यामुळे मुंबई पुण्याचा प्रवास तब्बल 75 रुपयांनी महागणार आहे. तर कोल्हापूरच्या प्रवासासाठी 30 रुपयांनी महागणार आहे. कोकणातून मुंबईत जाण्यासाठी आता 450 ऐवजी 525 रुपये मोजावे लागणार आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्याअंतर्गत प्रवास 5 रुपयांपासून 40 रुपयांपर्यत महागणार आहे. एसटी महामंडळाकडून भाडेवाढ लागू इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ दरवाढ, टायरच्या तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर चांगलाच भार पडला आहे. हा भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने अखेर भाडेवाढ लागू केली आहे. एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षांनंतर प्रथमच 17.17 टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात दरवर्षी एक आठवडा दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने या वर्षी दि. 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021 या कालावधीत अँन्टी करप्शन ब्युरो, जळगांव तर्फे “दक्षता जनजागृती सप्ताहाचे ” आयोजन करण्यात येणार आहे. मंगळवार दि. 26 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेऊन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या संदेशाचे वाचन केले जाणार आहे. शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार आणि भ्रष्ट पध्दतीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी दक्षता जनजागृती मोहिम राबवण्यात येत आहे. त्याअनुषंगाने “दक्षता जनजागृती सप्ताह” अंतर्गत अ‍ॅंटी करप्शन ब्युरोची कार्यप्रणाली, भ्रष्टाचार विरोधी कायद्याची माहिती आणि अंमलबजावणी याबाबत जनजागृती…

Read More

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वराड बुद्रुक येथील उपसरपंच, माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेचे उपनेते तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला. यामुळे वराड येथे भाजपला भगदाड पडले असून ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. ना. गुलाबराव पाटील व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे व जिल्हा सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी या सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. या प्रवेशामुळे वराड येथे शिवसेनेचे एकहाती वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. पालकमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांच्या उपस्थितीत आज अजिंठा विश्रामगृहात वराड बुद्रुक येथील लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । राज्याचे बहुजन कल्याण, खार जमीन विकास, मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार हे मंगळवार, 26 ऑक्टोबर, 2021 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मंत्री श्री. वडेट्टीवार यांचा दौरा असा : मंगळवार, 26 ऑक्टोबर, 2021 रोजी सकाळी 9.00 वा जळगाव विमानतळ येथे विशेष विमानाने आगमन. सकाळी 9.30 वाजता बऱ्हाणपूरकडे (मध्य प्रदेश) प्रयाण (मार्गे – जळगाव-भुसावळ- मुक्ताईनगर-हतनूर), दुपारी 1.30 वाजता जळगावकडे प्रयाण, दुपारी 3 वाजता जळगाव येथे आगमन व अजिंठा विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 3.45 वाजता जळगाव विमानतळकडे प्रस्थान, दुपारी 4 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व विशेष विमानाने (CJ२) मुंबईकडे प्रयाण करतील.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा बाल कल्याण समिती, जळगाव यांच्या आदेशान्वये दिनांक 11 सप्टेंबर, 2021 रोजी धुळे येथील शिशुगृहात पुढील पुनर्वसनाकरीता बालिकेला दाखल करण्यात आलेले आहे. या मुलीस कोणी ओळखत असेल तर त्यांनी बाल कल्याण समिती, जळगाव या पत्त्यावर व दुरध्वनी क्रमांक- 0257/ 2239851 तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जळगाव 0257/2228825 वर संपर्क साधावा. असे योगेश मुक्कावार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Read More

यावल, प्रतिनिधी । दि.21 ऑक्टोबर2021रोजी जामनेर तालुक्यातील लोणी गावात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करून जिल्हाधिकारी जळगाव पोलीस अधीक्षक जळगाव यांना लेखी निवेदन महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियन जळगाव जिल्हा तर्फे देण्यात आले. दि.21ऑक्टोबर2021रोजी लोणी तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्यासाठी शासकीय कामकाज करण्यासाठी गेलेल्या पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व अंमलदार,पोलीस कर्मचारी यांना काही समाजकंटकांकडून शिवीगाळ व मारहाण करण्यात आली त्या निषेधार्थ दि.25सोमवार रोजी जिल्हाधिकारी साहेब जळगाव,व पोलीस अधीक्षक साहेब जळगाव यांना महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियन जळगाव जिल्हा तर्फे निवेदन देण्यात आले आहे. सदर आरोपीना कठोरात कठोर शिक्षा होऊन कारवाई करण्यात यावी जेणेकरून खाकी वर्दी…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । श्री जळगाव माहेश्वरी विवाह सहयोग समितीतर्फे ऑनलाइन परिचय संमेलनाचे आयोजन २३ व २४ ऑक्टोबर रोजी महेश प्रगती मंडळ जळगाव येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माहेश्वरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामसुंदर सोनी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. हयावेळी प्रमुख अतिथी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष श्रीकिसन भंसाली, सुप्रसिद्ध विवाह समुपदेशक निशा चांडक ऑनलाईन उपस्थित होते. जळगाव माहेश्वरी विवाह सहयोग समितीचे अध्यक्ष श्यामसुंदर झंवर, सचिव सुरजमल सोमाणी, प्रमोद झंवर, वासुदेव बेहेडे, सुभाष जाखेटे, डॉ.जगदीश लढ्ढा, विवेकानंद सोनी, प्रकल्प प्रमुख प्रदेश संघटनमंत्री प्रा.संजय दहाड, प्रदेश उपाध्यक्ष मनीष झंवर, जिल्हाध्यक्ष एड.नारायण लाठी, जिल्हा सचिव माणकचंद झंवर, जिल्हा महिला अध्यक्षा राधा झंवर,…

Read More