जळगाव, प्रतिनिधी । सोळा वर्षाच्या मुलीवर नराधम पित्याने तीन वर्ष वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकात कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिता-पूत्रीच्या पवित्र नात्याला कलंक लागल्याची घटना शहरातील एका भागात घडली. आपल्या सख्या 16 वर्षीय मुलीवरच नराधम पित्याने तीन वर्षांपासून अत्याचार केला मात्र छळ असह्य झाल्याने अत्याचाराला वाचा फुटली व नराधम पित्याविरोधात पीडीतेने भुसावळ बाजारपेठ पोलिसात तक्रार नोंदवल्याने पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 41 वर्षीय संशयीत आरोपी पित्याला अटक करण्यात आली. शहरातील एका भागात पीडीता आपल्या वडिल व आत्या व भावासह राहते. पीडीतेच्या आईचे 13 वर्षांपूर्वीच निधन झाल्याने आत्यानेच पीडीतेचा सांभाळ केला. दरम्यान, संशयीत…
Author: saimat team
मुंबई, वृत्तसंस्था । देशभरात सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी जाहीर केलेल्या दरपत्रकानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा प्रत्येकी 35 पैशांची वाढ झाली आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचा दर प्रतिबॅरल 86 डॉलर्सपर्यंत पोहोचला होता. तो आता 85 डॉलर्सच्या खाली आला आहे. त्यामुळे भारतात इंधन स्वस्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून अद्याप इंधनदरात कपात करण्यात आलेली नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 113.46 रुपये इतका आहे. तर डिझेलचा प्रतिलीटर दर 104.38 रुपये इतका आहे. तर दिल्लीत पेट्रोल…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission, UPSC) ने सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी आणि इतर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केलीय. या अंतर्गत एकूण 64 पदांची भरती केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2021 आहे. त्याच वेळी, उमेदवार 12 ऑक्टोबर 2021 पर्यंत फॉर्मची प्रिंटआउट घेऊ शकतात. अर्ज करताना हे लक्षात ठेवा की उमेदवारांनी अधिसूचना फॉर्म पूर्णपणे वाचावा आणि त्यानुसार अर्ज करावा. रिक्त जागा तपशील सहाय्यक प्राध्यापक – 1 सहाय्यक संरक्षण…
अमळनेर, प्रतिनिधी । तक्रारदाराकडून विनयभंगाच्या गुन्ह्याचे चार्जशीट लवकर पाठविण्यासाठी आज दिनांक २३ रोजी सायंकाळी १५ हजारांची लाच घेताना मारवड पोलीस ठाण्याचा हवालदार भास्कर नामदेव चव्हाण वय ५१ यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमळनेर येथील पोलीस लाईनच्या वसाहतीत राहत्या घरी रंगेहाथ सापळा रचून पकडले असून लागलीच अटक करण्यात आली आहे , पथकाने आरोपीस जळगावला नेले आहे ,यामुळे पोलीस खात्यात खडबड उडाली आहे. मारवड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार भास्कर नामदेव चव्हाण यांनी पाडसे येथील ४५ वर्षीय पुरुष तक्रारदार कडून स्वतः , भाऊ व वडिलां विरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात १०५/२०२१ नुसार विनयभंगाच्या दाखल गुन्ह्यात मदत करून चार्चशीट कोर्टात लवकर दाखक करण्यासाठीच्या मोबदल्यात १५…
जामनेर, प्रतिनिधी । शहरातील विशाल लॉन्स जामनेर येथे अखिल भारतीय कैकाडी समाज आघाडी. जामनेर. तालुकास्तरीय बैठक संपन्न झाली. बैठकीच्या सुरुवातीला कैकाडी समाजाचे दैवत श्री संत कैकाडी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. बैठकीला खानदेश संपर्कप्रमुख मुकेश जाधव, जळगाव जिल्हा अध्यक्ष दिगंबर जाधव, जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष मुकेश जाधव, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रतिभा गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार केला व मार्गदर्शन केले. जामनेर तालुक्यातील नेरी येथील सागर गायकवाड. यांची कैकाडी समाज आघाडी युवा तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. जामनेर तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकारी यांचा कैकाडी समाज आघाडी च्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश संपर्कप्रमुख…
फैजपूर, प्रतिनिधी । सीमेवर सैनिक थांबून देशाचे रक्षण करीत असतात. त्यांच्या ऋणातून आपण कधीही मुक्त होऊ शकणार नाही. आणि चांगले कार्य जगात भरपूर आहे पण हे चांगले कार्य प्रत्येक मनुष्य करु शकत नाही. सीमेवर थांबून देशाची सेवा करण्याचे कार्य प्रत्येकालाच आवडत असते पण प्रत्येक व्यक्ती सीमेवर जाऊन सेवा करू शकत नाही. म्हणूनच प्रत्येक सैनिकाचे कौतुक करणे समाजाचे कर्तव्य आहे. त्यांना मदत रुप होणे हे आपले कर्तव्यच असून त्यांचे आई-वडील, धर्मपत्नी यांचेही आपण धन्यवाद मानायला पाहिजे. त्यांनी आपल्या मुलाला, पतिला केलेल्या सहकार्यामुळेच तो सीमेवर थांबून देशाचे रक्षण करू शकला. आणि प्रत्येक भारतीय आपल्या घरी शांततेत जीवन जगू शकला.सैनिक प्रत्यक्ष युद्धात सहभागी…
यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील किनगावात एका सेतु सुविधा केंद्र चालकाने थेट यावल तहसिलदारांचे पीएम किसानचे खाते हॅक केले व तब्बल ३८ जणांची नोंदणी त्यात केल्याचे उघड झाल्याने जिल्ह्यात महसुल विभागासह ईतर सर्व शासकीय कार्यालया मधे मोठी खळबळ उडाली आहे.गेल्या काही दिवसांपासुन तहसिल कार्यालयात पीएम किसान संर्दभातील नोंदी थांबवण्यात आल्या होत्या.तरी देखील38नोंदी झाल्या कशा?या बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संशय आल्याने चौकशी केला असता हा प्रकार निदर्शनास आला तेव्हा या प्रकरणी एका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील तहसिल कार्यालयातील लिपीक दिपक शांताराम बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार तीन वर्षापासुन तहसिल कार्यालयात त्यांच्याकडे महसुल सहाय्यक म्हणुन कामकाज आहे व त्याअनुशंगाने ते मागील दोन…
जळगाव, प्रतिनिधी । शिवसेना सचिव मा.श्री.सुरजजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिक विराज कावडीया यांच्या पुढाकाराने जळगाव शहरातील 32 अनाथमुलांना शैक्षणिक व जीवनावयशक वस्तूंचे वाटप करण्यात आले. पेन, पेन्सिल, वही, सोयाबिन तेल, साखर, चहा पट्टी, मिरची, हळद, तांदूळ, मूंग डाळ, तूर डाळ, गहूचे पीठ, मिठ, बिस्कीट, बेसन, रवा, मैदा, शेंगदाणा, इत्यादी देण्यात आले. या वेळी शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहानगरप्रमुख प्रशांत सुरळकर, शिवसैनिक विराज कावडीया, उमाकांत जाधव, पियुष तिवारी, प्रीतम शिंदे, संदीप सूर्यवंशी, अमित जगताप, पियुष हसवाल, अर्जुन भारुळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील गोंदेगाव येथे विधी सेवा प्राधिकरण यांचे संयुक्त विद्यमाने तालुका वकील संघ आणि एस एस मणियार लॉ कॉलेज येथील विद्यार्थी यांच्यामार्फत कायदा जनजागृती शिबिर ॲड. ज्ञानेश्वर बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले. त्या दरम्यान तेजस्विनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर ॲड.एस आर पाटील यांनी कायदा अंतर्गत तर ॲड अर्चना किरोते यांनी महिला विषयी असलेल्या कायद्याची माहिती दिली, तसेच डॉ. सौ. भक्ती कुलकर्णी यांनी ॲसिड अटॅक मधील पीडित महिला व त्यांचे अधिकार या विषयी माहिती, तर डॉ. विजयानंद कुलकर्णी यांनी स्री पुरुष समानता या विषयी मार्गदर्शन केले, तसेच ॲड. ज्ञानेश्वर बोरसे आणि ॲड आशुतोष चंदेले यांनी विधी…
सातारा, वृत्तसंस्था । जिल्ह्यातील माण तालुक्यातील संभूखेड गावाचे सुपूत्र जवान सचिन विश्वनाथ काटे यांनी देशसेवेसाठी आपल्या प्राणाची आहूती दिली आहे. सचिन काटे यांचे वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी राजस्थानमध्ये देशसेवा करताना वीरमरण आले . सचिन यांच्या जाण्याने संपूर्ण काटे कुटुंब आणि संभूखेडावर गावावर शोककळा पसरली आहे. २० ऑक्टोबर रोजी शहीद सचिन यांना वीरमरण आल्याची माहिती त्यांचे भाऊ रेवन काटे यांच्या राजस्थान लष्कराच्या युनिटने दिली. २३ ऑक्टोबर रोजी सचिन यांचे पार्थिव संभूखेड गावात आणले जाणार असून त्यांच्या अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सचिन यांच्या गावी त्यांच्या लग्नाची गडबड सुरू होती मात्र त्यांचे लग्न करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. सचिन यांच्या पश्चात त्यांचे आई…