Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी | यावल तालुक्यातील डांभूर्णी येथे स्वयंदीप प्रतिष्ठान अंतर्गत शासकीय योजना व माहिती समिती डांभूर्णीतर्फे शनिवार दि. ३० ऑक्टोबर रोजी आयोजित ई-श्रम कार्ड नोंदणी व वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आ. लता चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. स्वयंदीप प्रतिष्ठान अंतर्गत शासकीय योजना व माहिती समिती डांभूर्णीतर्फे ई-श्रम कार्ड नोंदणी व वाटप शिबिराचे सकाळी १०.३० वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजन करण्यात आलेले आहे. याशिबिराचे उद्घाटन आ. लता चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच सेतू सुविधा कक्ष (आपले सरकार पोर्टल)चे उद्घाटन तहसीलदार महेश पवार…

Read More

भुसावळ प्रतिनिधी | येथून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या जवळ ट्रॉला, कोंबड्या वाहून नेणारी पीकअप व्हॅन आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाले असून दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी जखमींना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले आहे. भुसावळजवळील साकेगाव येथील उड्डाणपुलाच्या उतारावर रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास ट्रॉला आणि कोंबड्या वाहून नेणार्‍या व्हॅनची टक्कर झाली. यात एमएच-१९ पीजी ०२२४ या क्रमांकाच्या दुचाकीलाही या दोन्ही वाहनांनी उडविले. या अपघातात मोटारसायकल चक्काचूर झाली असून ट्रॉला आणि पीक अप व्हॅनचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून व्हॅनमधील एक तर ट्रॉलातील एक असे दोन जण गंभीर…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । आज दि. २९ रोजी जळगांव येथे श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी सभागृह, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे कार्यालयात सहकार भारती व मनहर भाई मेहता पतसंस्थेचे संचालक व महासंघाचे कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक झाली, बैठकीत सहकार भारतीचे वतीने सुरू असलेले उपक्रमाची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर सहकार क्षेत्रात संस्कारीत कार्यकर्ते असणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन बन्सीलालजी आंधोरे यांनी केले, सहकाराच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची चांगली संधी असते त्यातुन सुदृढ समाज उभा राहतो. समाजाच्या आर्थिक गरजांचे वेळी अडीअडचणीच्या वेळी सहकाराच्या माध्यमातून वेळोवेळी मदत होते व गरजा भगविल्या जातात, शेती,  उद्योगाची उभारणी यांच्या भरभराटीमध्ये सहकाराचा खुप मोठा वाटा आहे, सहकार जगला पाहिजे यासाठी प्रामाणिक, होतकरू,…

Read More

जळगाव प्रतिनिधी । कृषी औद्योगीक सर्व सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयावर दरोड्याप्रकरणी आज दोन जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी संशयितांकडून मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरु आहे. संशयित आरोपी रणजीत सिंग जुन्नी यास जळगाव शहरातून व सागरसिंग बावरी यास जालना येथून अटक करण्यात आलेल्यांचे नावे आहेत. जळगाव जिल्हा कृषी सहकारी सेवा संस्थेकडे विकास दूध आणि पारले बिस्कीटची एजन्सी असून यामुळे संस्थेत बर्‍याचदा मोठ्या प्रमाणात रोकड असते. या अनुषंगाने ६ जुलै २०२१ रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास अनोळखी चार जणांनी संस्थेच्या कार्यालयाचा कडी कोयंडा ताडून आत प्रवेश केला होता. त्यांनी संस्थेच्या आतील कार्यालयात झोपलेल्या कर्मचार्‍यांना धमकी देऊन चोरीचा प्रयत्न केला. त्यांना तिजोरी…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । दिवाळी सणासुदीच्या काळात भेसळयुक्त खादय पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करा, याबाबतचे निवेदन आज प्रहार जनशक्ती युवाच्यावतीने जिल्हा सहाय्यक आयुक्तांना दिले आहे. कोरोनाच्या काळात खाजगी रुग्णालयांनी रुग्णांच्या नातेवाईक; रूग्णांकडून आर्थिक मलिदा लाटून अगोदरच नागरीकांच्या डोळ्यात धुळफेक केलेली आहे. ऑक्सिजन बेडची संख्या;पॉझिटीव्हीटी दर पाहता व कोरोनावरील लसीकरणामुळे जिल्ह्यात रुग्णसंख्या आटोक्यात येत आलेली आहे.त्यामुळे आता यंदाच्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाच्या नियमाची शिथीलता झालेली आहे. खाजगी दुकाने;बाजारपेठा;नागरीकांच्या सण उत्सवानिमित्ताने मोठ्या प्रमाणात खादयपदार्थ खरेदी करण्याकरिता मोठ्या प्रमाणात नागरीकांची गर्दी होत असते.या अन्न भेसळमुळे नागरीकांचे आरोग्याचा धोका उदभवू नये या करीता खादय भेसळसाठेबाजी करणाऱ्यांवर तातडीने कारवाई व्हावी.या गर्दीचा…

Read More

यावल, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य शासनाने दि.१ नोव्हेंबर२००५पासून परिभाषित अंशदायी योजना(DCPS) कर्मचाऱ्यांना लागू केली आहे. सदर योजनेचे राष्ट्रीय पेंशन योजनेत(NPS)रुपांतर झाले आहे.परंतु संबंधित NPS धारक कर्मचाऱ्यांचे अनुज्ञेय हक्क डावलल्यामुळे आर्थिक दृष्ट्या अतिशय नुकसान होत आहे. सदर योजनेतील सुमारे१६०० कर्मचाऱ्यांचे परिवार आर्थिक बाबतीत संपूर्ण उध्वस्त झाले आहेत.त्यामुळे सदरची योजना रद्दबातल होणे आवश्यक असून कर्मचाऱ्यांच्या हिताचे आहे. यासाठी तसेच इतर अनुषंगिक मागण्यांसाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील १२ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सकाळ सत्रात ठिय्या आंदोलन करुन राज्य सरकारला साकडे घातले.सदर ठिय्या आंदोलनात१) जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव,२)महिला व बालविकास अधिकारी,जळगाव,३)प्रकल्प अधिकारी,एकात्मिक बाल विकास प्रकल्प,जळगाव,४) जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१,सहकारी संस्था,जळगाव, ५) सह दुय्यम निबंधक वर्ग- जळगाव-३,६)जिल्हा…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । एसटी महामंहाडळ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासंदर्भात पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभुमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने 27 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची दखल घेऊन कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यातही वाढ करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने 27 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची दखल घेऊन परिवहन मंत्री परब यांनी मंत्रालयात संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक आयोजित करुन तोडगा काढला. परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी यासंदर्भात…

Read More

जळगाव प्रतिनिधी | पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना माहिती मिळताच बंदी असलेल्या बायो-डिझेलची साठवणूक करून विक्री करणार्‍यांवर एलसीबीने मारलेल्या छाप्यात २० लाख ७५ हजार रूपयांचे बायो-डिझेल जप्त करण्यात आले असून तिघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने भुसावळ ते मुक्ताईनगर महामार्गाला लागून असणार्‍या हॉटेल गरीब नवाज ढाब्याजवळ छापा टाकला. त्यात बायोडिझेलची काळ्या बाजारात चोरटी विक्री करण्यासाठी जमिनीत पुरलेल्या दोन टाक्या भरलेल्या आढळल्या. या कारवाईत २० लाख ७५ हजार रूपयांचे बायो-डिझेल पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी युसूफ खान नूर खान (वय ५४,…

Read More

जळगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील दोन ठिकाणी पोलिसांनी छापे मारून सहा गावठी कट्टयांसह २४ जीवंत काडतुसे जप्त करून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पोलीस महानिरिक्षक बी.जी. शेखर यांना चोपडा तालुक्यात दोन ठिकाणी अवैध शस्त्रविक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तालुक्यातील खार्‍या पाडाव शिवारातील उमर्टी ते वैजापूर रस्त्यावरील टेकडीजवळ सतनामसिंग महारसिंग जुनैजा (२२, रा. उमर्टी, जिल्हा बडवाणी) याच्याकडून ८२ हजार ५०० रुपये किंमतीचे तीन स्टिलचे गावठी बनावटीचे पिस्टल तसेच मॅगझीनसह चौदा जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली आहेत. यासोबत त्याला अटक करण्यात आली आहे. दुसर्‍या छाप्यामध्ये चोपडा ते धरणगाव रोडवरील हॉटेल विश्व…

Read More

पुणे, वृत्तसंस्था । गेल्या 13 दिवसांपासून ठप्प असलेली पुणे विमानतळारील हवाई वाहतूक पुन्हा सुरु होईल. याठिकाणी तिकीट बुकिंग सेवा पूर्ववत झाली आहे. उद्या सकाळी 8 वाजता प्रवासी वाहतूक पुन्हा सुरु होईल. मात्र, रात्री आठ ते सकाळी आठ दरम्यान वाहतूक बंदच राहील. रात्रीची विमान वाहतूक सुरू होण्यासाठी आणखी दोन महिने वाट पहावी लागेल. धावपट्टीच्या दुरुस्तीचे कामासाठी विमानतळावरून वाहतूक 16 ते 29 ऑक्टोबर दरम्यान बंद ठेवण्यात आली होती. यापूर्वी दसऱ्याच्या दिवशी पुणे विमानतळावरुन तब्बल 63 विमानांनी उड्डाण केले होते. या काळात 18 हजार प्रवाशांची ये-जा झाली होती. पुण्यात विमान प्रवासी वाहतुकीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सध्या असलेल्या इमारतीत प्रवाशांची मोठी गर्दी…

Read More