जळगाव, प्रतिनिधी । आज कुसुंबे खु. येथे आत्मनिर्भर महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण, सायली काँस्मेटीक सेंटरमार्फत व प्रोफेशनल ब्युटीपार्लरच्या संचालिका रेखा अहीरे यांच्या सौजन्याने सहभागी मुलींना व महिलांना मोफत ब्युटी किटचे वापट करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन महिला सरपंच इंदुबाई दगडु पाटील, पल्लवी चौधरी, मिनाबाई पाटील, मनिषा कोळी, सुरेखा साळुंखे, सोनाली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
Author: saimat team
जळगाव प्रतिनिधी । २५ हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास करणाऱ्या संशयित चोरट्याला अटक करण्यात आलेली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील वासुदेव जोशी कॉलनीतून २६ ऑक्टोबर रोजी २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याला एमआयडीसी पोलीसांनी शहरातील अजिंठा चौफुलीवरून अटक केली आहे. एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश शिवाजी सुरळकर (वय-२०) रा. इंदीरागांधी चौक धामणगाव जि. बुलढाणा असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, शहरातील वासुदेव जोशी कॉलनीत राहणारे अनिल सुधाकर जाधव (वय-५२) हे कुटुंबियांसह राहतात. बांधकामाचे काम करून उदरनिर्वाह करतात. २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जोशी कॉलनीत…
जळगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील श्रीवश्री बंटी ताडे यांची शिवशंभु संघटना संपर्कप्रमुख निवड करण्यात आली. \ बंटी ताडे यांची निवड संस्थापक अध्यक्ष महादेव पवार व शिवशंभु संघटना उपाध्यक्ष जळगाव जिल्हा सोपान मानकर व शिवशंभु संघटना अध्यक्ष नितीन पाटील व शिवशंभु संघटनेचा संघटकपदी आनंद आनंद घुगे यांनी नियुक्तीपत्र देऊन केली एकच निर्धार अन्याय विरुद्ध येल्गार या ब्रीदवाक्य प्रमाणे संघटनेचे कार्य व बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी तसेच गाव तिथे शाखा आणि घर तिथे मावळा हे अभियान राबवून जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणार असल्याचे बंटी ताडे यांनी निवडी प्रसंगी सांगितले.
जळगाव,प्रतिनिधी । आज दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी धरणगाव तालुका येथील साळवा येथील वैतागवाडी आदिवासी वस्ती नांदेड रस्ता येथे नारीशक्ती ग्रुप जळगाव तर्फे दिवाळी फराळ व साड्या वाटप करण्यात आल्या. यात शेवचिवडा, मोहनथाल, शंकरपाळे, व महिलांना साड्या यांचा समावेश असुन संजय भिल, काशिनाथ भील, मगन भील, अभिमन पिंपळसे , चंद्रभागा निकम, कमलबाई भील, रावली बारेला, दीपाली मोरे, चंदा भील, ममता बारेला अशा 150 कुटुंबाना वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी महापौर मा जयश्रीताई महाजन जिल्हा परिषद सदस्य मा माधुरीताई अत्तरदे, नारीशक्ती ग्रुप जळगाव अध्यक्ष मनिषा पाटील, सरपंच ईशाताई बोरोले, उपसरपंच सतीश पवार, सदस्य मनोज सोपान अत्तरदे, सदस्य चंद्रलेखा सतीश पवार सदस्य भूषण बऱ्हाटे,…
मुंबई, वृत्तसंस्था । “मंत्री छगन भुजबळ हे निर्दोष झालेच की आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की अनिल देशमुख यांनी काही केलेले नाही. ते निर्दोष होतीलच परंतु माणसाला मानसिक छळ करण्याचे काम आणि सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र केंद्र सरकारच्या एजन्सीमार्फत काही लोक करत आहे. लवकर सत्तेत येण्याची घाई लागल्याने सगळ्या मार्गाचा अवलंब आणि वापर होतोय.”, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषदेत केला. तसेच, “कुठलंही काम हे मेरीटने होणार यामध्ये मराठी आणि अमराठी असल्याचा विषय येत नाही. यापूर्वी ज्या गोष्टी झाल्या त्यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांना २८ महिने ईडीने तुरुंगात ठेवले ते मराठीच…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (( UPSC ) 10 ऑक्टोबर रोजी झालेल्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर upsc.gov.in पाहता येणार आहे. यूपीएससीच्या वेबसाईटवर हा निकाल पीडीएफ स्वरुपात प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये यशस्वी उमेदवाराचे नाव, रोल नंबर प्रकाशित करण्यात आला आहे. त्यासाठी आयोगाच्या वेबसाईटवर ‘What’s New’ या सेक्शनवर क्लिक करावं लागेल. या यादीत केवळ यशस्वी विद्यार्थ्यांची नावंच प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यामुळे या यादीत जर नाव नसेल तर तो विद्यार्थी यूपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणार नाही. या पूर्व परीक्षेसाठी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य…
मुंबई, वृत्तसंस्था । राज्य सरकारच्या वीज कंपन्यांमधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शुक्रवारी केली. त्यानुसार वीज कंपन्यांमध्ये वर्ग एक ते चतुर्थ श्रेणीतील सर्व अधिकारी-कर्मचारी यांना १२ हजार, तर सहायक कर्मचाऱ्यांना ७ हजार २०० रुपये बोनस देण्यात येणार आहे.सुरुवातीला वर्ग १ आणि २ च्या अधिकाऱ्यांना वगळून १० हजार रुपये बोनस देण्याचा प्रस्ताव ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी ठेवला. मात्र कामगार संघटनांनी या प्रस्तावाशी असहमती व्यक्त करून ऊर्जामंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली. कामगार संघटनांशी चर्चा केल्यावर डॉ. राऊत यांनी ऊर्जा विभागाच्या प्रस्तावात गेल्या वर्षीच्या दिवाळीप्रमाणे याही वर्षी बोनस देण्याची घोषणा केली.…
जळगाव, प्रतिनिधी । आगामी सणासुदीचा व गर्दीचा हंगाम लक्षात घेता प्रवाशांकडून मोठया प्रमाणात खाजगी कंत्राटी बसेसचा वापर करण्यात येतो. प्रवाशांकडून खाजगी कंत्राटी वाहतूकीची ने-आण करणाऱ्या वाहतूकदारांकडून गर्दीच्या हंगामामध्ये अवाजवी भाडेवाढ करण्यात येते. अशा खाजगी कंत्राटी वाहनांच्या भाडेदरासंदर्भात मा. उच्च न्यायालय, मंबई येथे जनहित याचिका क्र. 149/2011 दाखल करण्यात आली होती. सदर याचिकेत मा. उच्च न्यायालयाने खाजगी कंत्राटी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचे आदेश शासनास दिले होते. राज्यातील खाजगी कंत्राटी प्रवाशी वाहनांचे कमाल भाडेदर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहनांचे संपूर्ण बससाठी प्रति किलोमीटर भाडेदर त्याच स्वरुपाच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रती किलोमीटर भाडेदराच्या 50% पेक्षा अधिक राहणार नाही…
जळगाव, प्रतिनिधी । टायगर ग्रुप जळगाव तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले विवेकानंद व्यायाम शाळेत 71 तरुणाने रक्तदान केले. जळगाव शहरातील गांधी उद्यान जवळ विवेकानंद व्यायामशाळेत टायगर ग्रुपचे संस्थापक जालिंदर जाधव राष्ट्रीय अध्यक्ष डॉ तानाजी जाधव सागर काबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अध्यक्ष डॉ तानाजी जाधव. यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात तरी 71 रक्तदान 10 ते 5 केले. प्रमुख पाहुणे मा आमदार राजू मामा भोळे, डॉ. प्रदीप तळवळकर, शेखर कुलकर्णी, सागर सपके, डॉ. अवधूत चौधरी, नगरसेवक धिरज सोनवणे, अतुल हाडा, अमित काळे, प्रशांत कुलकर्णी आदी रक्तदान शिबिर उद्घाटनासाठी उपस्थित होते. आयोजक टायगर ग्रुप जळगाव जिल्हा प्रमुख सदस्य गौरव…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,०५० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,०४० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६४,६०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे आजचा भाव? गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,०५० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४८,०५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम…