Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांचे अधिपत्याखालील जळगाव जिल्हा लाभक्षेत्रातील, गिरणा मोठा प्रकल्प, पांझण डावा कालवा, जामदा डावा आणि उजवा कालवा, निम्म गिरणा कालवा, जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प व वळण बंधाऱ्यावरील अधिसुचित नदी, नाले तसेच गिरणा नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजनांच्या पाण्याचा फायदा घेणाऱ्या बागायतदारांनी सुरु झालेल्या रब्बी हंगामासाठी 31 डिसेंबर, 2021 पर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी केले आहे. सर्व बागायतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात 31 डिसेंबर, 2021 पर्यंत सादर करावेत. बागायतदारांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार…

Read More

यावल, प्रतिनिधी । यावल शहरातील वार्ड क्रमांक चार मध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याने वार्डातील नागरिकांना दूषित पाणी पिल्याने इतर आजार उद्भवण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याने तात्काळ उपाययोजना करण्यासाठी वार्डातील नागरिकांसह शिवसेना शहर प्रमुख,उपप्रमुख यांनी यावल नगरपरिषद अध्यक्ष सौ.नोंशाद तडवी यांना लेखी निवेदन दिले. सोमवार दि.1नोव्हेंबर 2021रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यावल शहरात वार्ड क्र.4 मध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याने वार्डातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याने इतर आजार उद्भवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे,त्यामुळे वार्ड क्र.4मधील पाईप लाईन बदलवून शुद्ध पाणीपुरवठा करणेबाबत कार्यवाही करावी कारण दूषित पाणी सेवन केल्याने कोणतेही दुष्परिणाम तसेच साथीचे रोग उद्भवल्यास त्याला नगरपरिषद अधिकारी,कर्मचारी जबाबदार…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । जामनेर शहरातील विश्रामगृहात भारतीय भटके-विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष अशोक जाधव धनगाव कर यांच्या प्रमुख उपस्थितीत जामनेर तालुका बैठक संपन्न झाली. या बैठकीत जामनेर तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली तालुका अध्यक्षपदी तुकाराम काळे तर उपाध्यक्षपदी उस्मान भाई गॅरेज वाले सांडू तडवी सरचिटणीस पदी पत्रकार गणेश पांढरे सचिव सुरेश काळे सहसचिव गोविंदा रूम कोषाध्यक्ष कडोबा नवघरे जामनेर शहर अध्यक्षपदी अमोल लोहार तर उपाध्यक्षपदी न्यानेश्वर ताठे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली या बैठकीसाठी संदीप काळे गणेश काळे अमोल लोहार उस्मान शेख तुकाराम काळे संदीप काळे ईश्वर काळे अतुल महाजन गोविंदा लोहार सांडू तडवी गणेश पांढरे यांच्यासह पदाधिकारी…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)अटक केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची १२ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती. त्यांना मंगळवारी कोर्टात ११ वाजता हजर करण्यात येणार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात सोमवारी हजर झाले. त्यावेळी त्यांचे वकीलही त्यांच्याबरोबर होते. यावेळी ईडीने त्यांचा जबाब नोंदवला. या प्रकरणी ईडीने देशमुख यांना आतापर्यंत पाच समन्स बजावले होते.

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एलपीजीच्या महागाईचा बॉम्ब फुटला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात आता २६५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. एक नोव्हेंबर रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीच्या दरात वाढ झाल्याची घोषणा केली आहे. ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरमध्येच झाली आहे, ही दिलासादायक बाब आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. या नव्या दरांमुळे व्यावसायिक वापराचा १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत १७३६.५ रुपयांवरुन २०००.५ रुपये इतकी झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापरासाठीच्या १४.२ किलो विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ केलेली नाही. त्यामुळे त्यांची दरवाढ झालेली नाही. दिल्लीत १४.२ किलोच्या…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । WIFA अर्थात वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन म्हणजेच महाराष्ट्र फूटबॉल बॉडी ची ७२ वी सर्व साधारण सभा पुणे येथील भारती विद्यापीठात शनिवार ३० ऑक्टोबर रोजी अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यात एकूण 36 जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष व राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, दुसरे उपाध्यक्ष व राज्य मंत्री डॉ विश्वजित कदम , तिसरे उपाध्यक्ष माजी आमदार मालोजी राजे छत्रपती सह सचिव सॉर्टर वाझ,खजिनदार प्यारेलाल चौधरी उपस्थित होते. एकूण ७ ठराव सर्व संमतीने पारित झाले. आयत्या विषयावर जिल्ह्यातील अडचणी मांडतांना जळगांव जिल्ह्याचे सचिव फारूक शेख यांनी राष्ट्रीय व खास करून संतोष ट्रॉफी साठी मुंबई,पुणे,…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । दि. 30 ऑक्टोबर रोजी आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनतर्फे हॉटेल सिल्व्हर पॅलेस येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, महापौर जयश्री महाजन, डॉ. नितीन पाटील डॉक्टर कराळे, तुषार वाघुळदे, चेन्नईहून डॉक्टर बॅग उपस्थित होते. या कार्यक्रमात कोरोना काळात रुग्णांची सेवा व पूर्ण जिल्ह्यात चांगली कामगिरी केल्याबद्दल ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुमैय्या शेख यांना खान्देश गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र शासन, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील परिपत्रक क्र. आरएलपी-1021/प्र.क्र.247/विशा-१ब, दि. 27 ऑक्टोबर, 2021 अन्वये दिपावली उत्स्व 2021 सादर करणेबाबत मार्गदर्शक सुचना निर्गमीत केलेल्या आहेत. कोविड रोगाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या दीड वर्षापासून सर्व धर्मीय सण/ उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरीकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. उत्सव साजरा करतांना सर्व नागरीकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. त्याअनुषंगाने, जळगाव जिल्ह्यात कोव्हिड-19 मुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता जिल्हाधिकारी…

Read More

यावल, प्रतिनिधी । माजी नगरसेवक तसेच कायद्याचे ज्ञान असलेल्या व्यक्तीस यावल नगरपरिषदेने नोटीस दिली आहे. नोटीस मध्ये नमूद केल्या नुसार प्रत्यक्षात काय कारवाई होणार किंवा नाही याकडे संपूर्ण यावल शहराचे लक्ष वेधून. यावल नगरपरिषदेने माजी नगरसेवक तसेच कायद्याचे माहितगार वकील अशोक प्रभाकर गडे व वगैरे यांना दिनांक 29/10/2021रोजी दिलेली नोटीस प्रत्यक्ष बघितली असता यावल नगरपरिषद गटनेता तथा माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान सदस्य अतुल वसंतराव पाटील यांनी यावल नगरपरीषदकड़े तक्रार केल्यानुसार यावल नगरपरिषद अभियंता यांनी स्थळ निरीक्षण अहवाल सादर केला. तसेच ज्या अर्थी महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५चे कलम १७९ सार्वजनिक रस्त्याच्या पृष्ठभागावरील प्रक्षेपणे,अथडळे व अतिक्रमणे अन्वये कोणत्याही…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । लॅपटॉपसह बॅग चोरणाऱ्यास संशयित आरोपीला आज शहरातील नवीन बसस्टॅन्ड येथे जिल्हापेठ पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी त्याच्यावर जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दिवाळी सना निमित्त जळगाव बस स्टँडवर प्रवाशांची गर्दी असलेने प्रवाशी नामे जिशान अशपाक पिंजारी अमळनेर हे शिक्षणासाठी नांदेड येथे गेले होते ,नांदेड येथून अमळनेर येण्यास जळगाव येथे येऊन बस स्टॅन्ड वर आले,त्यांचेकडे 4 बॅग होत्या त्यांची अमळनेर बस संध्याकाळी 19/30वाजता आली परंतु त्यांना 4 बॅग पैकी तीनच बॅग दिसल्या कोणीतरी त्यांची बॅग नेल्याचे त्यांचे लक्ष्यात आलेने 3 बॅग घेऊन अमळनेर येथे गेले असता, नमूद चोरटा रेल्वे स्टेशन जळगाव येथे बॅग…

Read More