मलकापूर, प्रतिनिधी । दारू पिण्यासाठी १० रूपये न दिल्याने मित्रांमध्ये झालेल्या वादातून एकाचा डोक्यात लाकडी राफ्टर मारून दोघांनी खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी तपास चक्रे फिरवित एका तासात आरोपींना अटक करण्यात आली आहे. आज २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजे दरम्यान मुक्ताईनगर रोडवरील सरकारमान्य दारूविक्री दुकानाजवळ घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. तर पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास वेगाने तपास चव्रेâ फिरवित एका तासात आरोपींना अटक केली आहे. शहरातील मुक्ताईनगर रोडवर सरकारमान्य दारूविक्री दुकान असून या दुकानावर भागवत सिताराम फासे (वय ५५) रा.हिंगणा काझी, विनोद लक्ष्मण वानखेडे (वय ४०), दिलीप त्र्यंबक बोदडे (वय ३५) दोघे…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । आज दिनांक 27 बुधवार रोजी ११ वाजता इकरा यूनानी मेडिकल कॉलेज येथे नवीन कोविड लसीकरण सेंटरचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद निकुंभ, सोसायटीचे सचिव एजाज मलिक, गुलाम नबी बागबान, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अब्दुल कुद्दुस, उपप्राचार्य डॉ. शोएब शेख व डॉ. हारून बशीर आदी उपस्थित होते. याप्रसंगी अब्दुल करीम सालार यांनी कोरोना लसीकरणाचे पहिला डोस घेतला. लस घेतल्यानंतर करीम सालार यांनी सांगितले की, आम्ही कोरोना काळापासून कोरोनाशी लढा देत आहोत. मी पूर्वी लस घेतलेली नाही परंतु समाजातील विशेषता महाविद्यालयातील आमचे विद्यार्थी व विद्यार्थिनी…
यावल, प्रतिनिधी । फैजपूर नगरपरिषदेने केलेल्या कामांचे बिल देण्यासाठी फिर्यादी ठेकेदार सचिन भोंबे यास बिल देण्यासाठी खंडणी मागितली आणि ती खंडणी न दिल्यामुळे तत्कालीन मुख्य अधिकारी सुवर्णा उगले शिंदे,नगराध्यक्षा महानंदा रवींद्र टेकाम,नगरसेवक कलिमखा हैदारखा मणियार, हेमराज खुशाल चौधरी उर्फ डालु शेठ,रशीद नशिर तडवी,मिलिंद शंकर वाघुळदे,शेख कुर्बान शेख याकूब यांनी फौजदारी कट रचून ठेकेदारास काळ्या यादीत टाकून बदनामी केल्यामुळे त्यांनी यावल न्यायालयात सन2019 मध्ये तक्रार केली होती.त्यावर दि. 18/10/2021रोजी यावल न्यायालयाने भा.द.वी.कलम 385,463,464,465,469, 470,471,499,120B व 511 प्रमाणे प्रोसेस इश्यु केलेने संपूर्ण राजकीय क्षेत्रात नगरपरिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.याकामी तक्रारदार सचिन भोंबे यांचे तर्फे अड.व्हि.एच्. पाटील जळगाव यांनी काम पाहिले.
चाळीसगाव, प्रतिनिधी । भरतीसाठी आलेल्या 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी सुमारास घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील शिंदी येथील कैलास वासूदेव राठोड (वय-१८) हा तरूण एनसीसीच्या भरतीसाठी शहरातील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे कोतकर महाविद्यालयात आज आलेला होता. दरम्यान मैदानी चाचणी दरम्यान पळताना अचानक त्याला चक्कर आल्याने तो खाली पडला. त्यातच त्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी उघडकीला आली आहे. मयताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून कैलास वासूदेव राठोड याच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी धुळे येथे नेण्यात आले आहे. दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी…
यावल प्रतिनिधी । ३० टन तांदूळ यावल पोलिसांनी पकडून ट्रक ताब्यात घेतल्याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाचा शिधापत्रिकेवर वितरित होणारा तांदूळ काळ्याबाजारात जास्त दराने विक्री करणारा ट्रक चोपडा-यावल मार्गे गोंदिया येथे जात असल्याची गोपनीय माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहिती २३ ऑक्टोबर रोजी दुपारी मिळाली. त्यानुसार यावल पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार मुझफ्फर खान समशेर खान, पोलीस हेडकॉन्स्टेबल असलम खान, चालक रोहिल गणेश, पोलीस कॉन्स्टेबल सुशील घुगे यांच्यासह अन्य पथक हे यावल-चोपडा रोडवर असलेल्या हॉटेल केसर बागजवळ तपासणीसाठी थांबले. दुपारी तीन वाजेच्या सुमारास तांदुळाने भरलेला ट्रक क्रमांक (एमएच १८ एसी…
जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता युवा मोर्चातर्फे कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.तसेच महामारीमध्ये कोरोना प्रतिबंधक मोफत लसीकरण आणि मोफत धान्य वाटप करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी महामारीच्या या काळात केंद्रसरकारने घेतलेल्या जनहीतातल्या सर्व योजना (उज्वला गॅस,जनधन खात्याद्वारे महिलांना आर्थिक सहाय्य, मोफत लसीकरण,मोफत धान्य वाटप) या बद्दल मोदी साहेबाना पत्र पाठवून नागरिकांनी आभार मानले. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा आनंद सपकाळे, सरचिटणीस मिलिंद चौधरी, अक्षय जेजुरकर, महेश पाटील, उपाध्यक्ष राहुल मिसतरी, स्वामी पोद्दार, सचीन बाविस्कर, चिटणीस सागर जाधव, प्रतीक शेठ, अबोली पाटील, काजल कोळी, मंडल अध्यक्ष, महेश लाठी, दिनेश पुरोहित, हर्षल चौधरी, पंकज सनस, निखिल सूर्यवंशी, मंडल चिटणीस आकाश चौधरी, भूषण…
भुसावळ प्रतिनिधी । चाकूचा धाक दाखवून १५ लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी तीन जणांवर भुसावळ बाजार पेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील नवशक्ती आर्केड कॉम्प्लेक्स येथे राहणाऱ्या ठेकेदाराला तीन जणांनी धमकी व चाकूचा धाक दाखवून १५ लाखाची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ येथील गुलमोहर कॉलनीतील योगेश अशोक नरोटे (वय-२९) हे गर्व्हमेंट कॉट्रॅक्टर आहेत. योगेश नरोटे यांचे शहरातील नवशक्ती आर्केड कॉम्प्लेक्स येथे त्यांचे ऑफीस आहे. २५ ऑक्टोबर नरोटे हे त्यांच्या ऑफीसमध्ये असतांना दिपक भास्कर राणे, पवन मेहरा (पुर्ण नाव माहित नाही) आणि एक अनोळखी व्यक्ती असे तिघेजण…
जळगाव, प्रतिनिधी । भारतीय क्रिकेट नियामक मंडळा तर्फे आयोजित सय्यद मुश्ताक अली T20 आंतर राज्य क्रिकेट स्पर्धे साठी महाराष्ट्र राज्याचा संघ आज पुणे येथे जाहीर करण्यात आला यात जळगांव चा जगदीश झोपे याची निवड झाली आहे.सदर स्पर्धा ०४ नोव्हेंबर २०२१ पासून विविध मैदानावर सुरू होत आहे महाराष्ट्र संघ खालील प्रमाणे; ऋतुराज गायकवाड (कर्णधार), नोशाद शेख (उप-कर्णधार), केदार जाधव, मुकेश चौधरी, जगदिश झोपे, अजीम काजी, शमशजमा काजी, मनोज इंगळे. सतेजित बच्छाव, यश नाहर, रणजित निकम, आशय पालकर, प्रदीप दाधे, स्वप्नील फुल्पगार, दिव्यांग हींगणेकर, सुनिल यादव, तरांजित सिंग धिल्लोन, धनराजसिंग परदेशी, स्वप्नील गुगळे, पवन शाह, महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल जगदीश…
जळगाव, प्रतिनिधी । येथील सौ. सु. ग. देवकर प्रायमरी स्कूलचे उपक्रमशील शिक्षक सागर पाटील यांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था, राजपूत करणी सेना आणि गौरी उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २०२०-२१ च्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिनाक्षी चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून गणेश अमृतकर, संदीपा वाघ, विलाससिंग पाटील, बी. एच. खंडाळकर, सुमित पाटील, ज्ञानेश्वर वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन त्यांनी विविध उपक्रम शालेय स्तरावर राबवले आहेत. सागर पाटील सर हे शिक्षक आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगर या आघाडीत महानगर सरचिटणीस तर महाराष्ट्र राज्य…
जळगाव, प्रतिनिधी । तांबापुरातील बिस्मिल्ला चौक येथे कोरोना लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख मान्यवरांनी उपस्थिती होती. यावेळी महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, शिवसेना महानगर अध्यक्ष शरद तायडे, नगरसेवक प्रशांत नाईक, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे युवक महानगर अध्यक्ष मिलिंद सोनवणे, तांबापूर शाखाप्रमुख शाहरुख शेख, शिवसेनेचे प्रशांत सुरडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याकचे रियाज काकर, जननायक फाऊंडेशनचे फरीदभाई, सामाजिक कार्यकर्ते वसीम खान, सामाजिक कार्यकर्ते असीफ शाह, सामाजिक कार्यकर्ते सलमान खाटीक, वाहतुक सेनेचे जब्बार भाई, सामाजीक कार्यकर्ते सोनूभाई, सलीम काकर, वसिम काकर, लतीफ भाई, लुकमान शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.