जळगाव प्रतिनिधी | पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना माहिती मिळताच बंदी असलेल्या बायो-डिझेलची साठवणूक करून विक्री करणार्यांवर एलसीबीने मारलेल्या छाप्यात २० लाख ७५ हजार रूपयांचे बायो-डिझेल जप्त करण्यात आले असून तिघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने भुसावळ ते मुक्ताईनगर महामार्गाला लागून असणार्या हॉटेल गरीब नवाज ढाब्याजवळ छापा टाकला. त्यात बायोडिझेलची काळ्या बाजारात चोरटी विक्री करण्यासाठी जमिनीत पुरलेल्या दोन टाक्या भरलेल्या आढळल्या. या कारवाईत २० लाख ७५ हजार रूपयांचे बायो-डिझेल पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी युसूफ खान नूर खान (वय ५४,…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील दोन ठिकाणी पोलिसांनी छापे मारून सहा गावठी कट्टयांसह २४ जीवंत काडतुसे जप्त करून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पोलीस महानिरिक्षक बी.जी. शेखर यांना चोपडा तालुक्यात दोन ठिकाणी अवैध शस्त्रविक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तालुक्यातील खार्या पाडाव शिवारातील उमर्टी ते वैजापूर रस्त्यावरील टेकडीजवळ सतनामसिंग महारसिंग जुनैजा (२२, रा. उमर्टी, जिल्हा बडवाणी) याच्याकडून ८२ हजार ५०० रुपये किंमतीचे तीन स्टिलचे गावठी बनावटीचे पिस्टल तसेच मॅगझीनसह चौदा जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली आहेत. यासोबत त्याला अटक करण्यात आली आहे. दुसर्या छाप्यामध्ये चोपडा ते धरणगाव रोडवरील हॉटेल विश्व…
पुणे, वृत्तसंस्था । गेल्या 13 दिवसांपासून ठप्प असलेली पुणे विमानतळारील हवाई वाहतूक पुन्हा सुरु होईल. याठिकाणी तिकीट बुकिंग सेवा पूर्ववत झाली आहे. उद्या सकाळी 8 वाजता प्रवासी वाहतूक पुन्हा सुरु होईल. मात्र, रात्री आठ ते सकाळी आठ दरम्यान वाहतूक बंदच राहील. रात्रीची विमान वाहतूक सुरू होण्यासाठी आणखी दोन महिने वाट पहावी लागेल. धावपट्टीच्या दुरुस्तीचे कामासाठी विमानतळावरून वाहतूक 16 ते 29 ऑक्टोबर दरम्यान बंद ठेवण्यात आली होती. यापूर्वी दसऱ्याच्या दिवशी पुणे विमानतळावरुन तब्बल 63 विमानांनी उड्डाण केले होते. या काळात 18 हजार प्रवाशांची ये-जा झाली होती. पुण्यात विमान प्रवासी वाहतुकीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सध्या असलेल्या इमारतीत प्रवाशांची मोठी गर्दी…
जळगाव, प्रतिनिधी । मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचेकडील दि. 20 ऑक्टोबर, 2021 रोजीच्या पत्रानुसार जळगाव जिल्ह्यामध्ये दिनांक 01/01/2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत केला आहे. जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येणा-या या कार्यक्रमाची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे : 1. एकत्रीकृत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी : दि. 1 नोव्हेंबर, 2021 (सोमवार) 2. दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी : दि.…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील जिल्हा रुग्णालयात महाविद्यालयाच्या आवारात एका ६५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव शहरातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात आज गुरूवारी २८ ऑक्टोबर रोजी साकाळी ११ वाजेच्या सुमारास ६५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान तिच्याजवळ ओळख पटविण्यासंदर्भात कोणतीही वस्तू मिळाली नाही. या संदर्भात एमआयडीसी पोलीस स्थानकात वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पवार यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्थानकाचे पो. ना. अतुल पाटील, पोकॉ. किरण पाटील करीत आहे.
जळगाव प्रतिनिधी । गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज मोहाडी रोड वर फिरत असतांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील मोहाडी रोड परिसरात विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील मोहाडी रोड परिसरात एकजण कंबरेला पिस्तूल लावून फिरत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथे आज गुरूवारी २८ ऑक्टोबर रोजी ११ वाजता कारवाई करत संशयित आरोपी विकी महेंद्र कोळी (वय-२०) रा. समता…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलात (Central Reserve Police Force) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (CRPF Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, जीडीएमओ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावरथेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 22, 24 आणि 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical officer) जीडीएमओ (GDMO) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical officer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित शाखांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना दीड वर्षांचा अनुभव असणं आवश्यक…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । बुधवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा ३५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. मागील २७ दिवसांत इंधनांच्या दरात तब्बल २० वेळा वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्या आयओसी, एचपीसीएल आणि बीपीसीएल यांच्या इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल १०७.९४ रुपये लीटर तर, डिझेल ९६.६७ रुपये लीटर झाले आहे. तत्पूर्वी, पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मंगळवारी सांगितले की, वाढत्या इंधन दराबाबत आपण सौदी अरेबियासह अन्य आखाती देश आणि रशिया यांच्या पेट्रोलियम मंत्र्यांशी बोलत आहोत. या महिन्यात २० वेळा झालेल्या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोल ६.३० रुपयांनी तर, डिझेल ६.८ रुपयांनी महाग झाले आहे. १ जानेवारी २०२१ पासूनच्या दहा महिन्यांत…
जळगाव, प्रतिनिधी । वडनगरी येथे गावामध्ये बस सेवा सुरु नसल्यामुळे गावातील वयस्कर, गृहस्थ, महिला विशेष करुन शाळकरी विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने कानळदा, नंदगाव, नांद्रा, पिलखेडा,भोकर या गावाकडे जाणाऱ्या बसेस वडनगरीकडे कराव्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव तालुका संघटक योगेश पाटील यांनी निवेदनाद्वारे केली. वडनगरी हे गाव कानळदा,आव्हाणे रस्त्याला फक्त १ किलोमीटर अंतरावर असून आमच्या गावाची लोकसंख्या ही जवळपास दोन अडीच हजार पर्यंत आहे. आज प्रत्येक खेड्या-पाड्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस चालत असतात. परंतु आमचे दुर्देव की आमच्यागावामध्ये आजपावेतो आम्हा प्रवाशासाठी आपली महामंडळाची बस गावामध्ये आजपर्यंत आलेली नाही. त्यामुळे गावातील वयास्कर गृहस्थ, महिला विशेष करुन शाळकरी विद्यार्थी…
मुंबई, वृत्तसंस्था । अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकर्यांना प्रत्यक्ष वाढीव दरानुसार मदत मिळणार असून आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर कॅबिनेटच्या बैठकीत हा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केल्यानंतर मंत्रीमंडळाने याला अनुकुलता दर्शविली आहे. या बाबतचा शासननिर्णय एक-दोन दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. तर पालकमंत्र्यांनी गत सप्टेंबर २०२० पासून थकबाकी असणार्या शेतकर्यांनी चालू बिल भरले तरी त्यांची वीज जोडणी न तोडण्याची मागणी केली असता याला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. याचा राज्यभरातील लक्षावधी शेतकर्यांना फायदा होणार आहे. याबाबत वृत्त असे की, राज्य सरकारने २१ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार…