जळगाव, प्रतिनिधी । आगामी सणासुदीचा व गर्दीचा हंगाम लक्षात घेता प्रवाशांकडून मोठया प्रमाणात खाजगी कंत्राटी बसेसचा वापर करण्यात येतो. प्रवाशांकडून खाजगी कंत्राटी वाहतूकीची ने-आण करणाऱ्या वाहतूकदारांकडून गर्दीच्या हंगामामध्ये अवाजवी भाडेवाढ करण्यात येते. अशा खाजगी कंत्राटी वाहनांच्या भाडेदरासंदर्भात मा. उच्च न्यायालय, मंबई येथे जनहित याचिका क्र. 149/2011 दाखल करण्यात आली होती. सदर याचिकेत मा. उच्च न्यायालयाने खाजगी कंत्राटी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचे आदेश शासनास दिले होते. राज्यातील खाजगी कंत्राटी प्रवाशी वाहनांचे कमाल भाडेदर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहनांचे संपूर्ण बससाठी प्रति किलोमीटर भाडेदर त्याच स्वरुपाच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रती किलोमीटर भाडेदराच्या 50% पेक्षा अधिक राहणार नाही…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । टायगर ग्रुप जळगाव तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले विवेकानंद व्यायाम शाळेत 71 तरुणाने रक्तदान केले. जळगाव शहरातील गांधी उद्यान जवळ विवेकानंद व्यायामशाळेत टायगर ग्रुपचे संस्थापक जालिंदर जाधव राष्ट्रीय अध्यक्ष डॉ तानाजी जाधव सागर काबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अध्यक्ष डॉ तानाजी जाधव. यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात तरी 71 रक्तदान 10 ते 5 केले. प्रमुख पाहुणे मा आमदार राजू मामा भोळे, डॉ. प्रदीप तळवळकर, शेखर कुलकर्णी, सागर सपके, डॉ. अवधूत चौधरी, नगरसेवक धिरज सोनवणे, अतुल हाडा, अमित काळे, प्रशांत कुलकर्णी आदी रक्तदान शिबिर उद्घाटनासाठी उपस्थित होते. आयोजक टायगर ग्रुप जळगाव जिल्हा प्रमुख सदस्य गौरव…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,०५० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,०४० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६४,६०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे आजचा भाव? गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,०५० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४८,०५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम…
जळगाव, प्रतिनिधी | यावल तालुक्यातील डांभूर्णी येथे स्वयंदीप प्रतिष्ठान अंतर्गत शासकीय योजना व माहिती समिती डांभूर्णीतर्फे शनिवार दि. ३० ऑक्टोबर रोजी आयोजित ई-श्रम कार्ड नोंदणी व वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आ. लता चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. स्वयंदीप प्रतिष्ठान अंतर्गत शासकीय योजना व माहिती समिती डांभूर्णीतर्फे ई-श्रम कार्ड नोंदणी व वाटप शिबिराचे सकाळी १०.३० वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजन करण्यात आलेले आहे. याशिबिराचे उद्घाटन आ. लता चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच सेतू सुविधा कक्ष (आपले सरकार पोर्टल)चे उद्घाटन तहसीलदार महेश पवार…
भुसावळ प्रतिनिधी | येथून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या जवळ ट्रॉला, कोंबड्या वाहून नेणारी पीकअप व्हॅन आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाले असून दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी जखमींना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले आहे. भुसावळजवळील साकेगाव येथील उड्डाणपुलाच्या उतारावर रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास ट्रॉला आणि कोंबड्या वाहून नेणार्या व्हॅनची टक्कर झाली. यात एमएच-१९ पीजी ०२२४ या क्रमांकाच्या दुचाकीलाही या दोन्ही वाहनांनी उडविले. या अपघातात मोटारसायकल चक्काचूर झाली असून ट्रॉला आणि पीक अप व्हॅनचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून व्हॅनमधील एक तर ट्रॉलातील एक असे दोन जण गंभीर…
जळगाव, प्रतिनिधी । आज दि. २९ रोजी जळगांव येथे श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी सभागृह, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे कार्यालयात सहकार भारती व मनहर भाई मेहता पतसंस्थेचे संचालक व महासंघाचे कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक झाली, बैठकीत सहकार भारतीचे वतीने सुरू असलेले उपक्रमाची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर सहकार क्षेत्रात संस्कारीत कार्यकर्ते असणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन बन्सीलालजी आंधोरे यांनी केले, सहकाराच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची चांगली संधी असते त्यातुन सुदृढ समाज उभा राहतो. समाजाच्या आर्थिक गरजांचे वेळी अडीअडचणीच्या वेळी सहकाराच्या माध्यमातून वेळोवेळी मदत होते व गरजा भगविल्या जातात, शेती, उद्योगाची उभारणी यांच्या भरभराटीमध्ये सहकाराचा खुप मोठा वाटा आहे, सहकार जगला पाहिजे यासाठी प्रामाणिक, होतकरू,…
जळगाव प्रतिनिधी । कृषी औद्योगीक सर्व सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयावर दरोड्याप्रकरणी आज दोन जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी संशयितांकडून मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरु आहे. संशयित आरोपी रणजीत सिंग जुन्नी यास जळगाव शहरातून व सागरसिंग बावरी यास जालना येथून अटक करण्यात आलेल्यांचे नावे आहेत. जळगाव जिल्हा कृषी सहकारी सेवा संस्थेकडे विकास दूध आणि पारले बिस्कीटची एजन्सी असून यामुळे संस्थेत बर्याचदा मोठ्या प्रमाणात रोकड असते. या अनुषंगाने ६ जुलै २०२१ रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास अनोळखी चार जणांनी संस्थेच्या कार्यालयाचा कडी कोयंडा ताडून आत प्रवेश केला होता. त्यांनी संस्थेच्या आतील कार्यालयात झोपलेल्या कर्मचार्यांना धमकी देऊन चोरीचा प्रयत्न केला. त्यांना तिजोरी…
जळगाव, प्रतिनिधी । दिवाळी सणासुदीच्या काळात भेसळयुक्त खादय पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करा, याबाबतचे निवेदन आज प्रहार जनशक्ती युवाच्यावतीने जिल्हा सहाय्यक आयुक्तांना दिले आहे. कोरोनाच्या काळात खाजगी रुग्णालयांनी रुग्णांच्या नातेवाईक; रूग्णांकडून आर्थिक मलिदा लाटून अगोदरच नागरीकांच्या डोळ्यात धुळफेक केलेली आहे. ऑक्सिजन बेडची संख्या;पॉझिटीव्हीटी दर पाहता व कोरोनावरील लसीकरणामुळे जिल्ह्यात रुग्णसंख्या आटोक्यात येत आलेली आहे.त्यामुळे आता यंदाच्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाच्या नियमाची शिथीलता झालेली आहे. खाजगी दुकाने;बाजारपेठा;नागरीकांच्या सण उत्सवानिमित्ताने मोठ्या प्रमाणात खादयपदार्थ खरेदी करण्याकरिता मोठ्या प्रमाणात नागरीकांची गर्दी होत असते.या अन्न भेसळमुळे नागरीकांचे आरोग्याचा धोका उदभवू नये या करीता खादय भेसळसाठेबाजी करणाऱ्यांवर तातडीने कारवाई व्हावी.या गर्दीचा…
यावल, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य शासनाने दि.१ नोव्हेंबर२००५पासून परिभाषित अंशदायी योजना(DCPS) कर्मचाऱ्यांना लागू केली आहे. सदर योजनेचे राष्ट्रीय पेंशन योजनेत(NPS)रुपांतर झाले आहे.परंतु संबंधित NPS धारक कर्मचाऱ्यांचे अनुज्ञेय हक्क डावलल्यामुळे आर्थिक दृष्ट्या अतिशय नुकसान होत आहे. सदर योजनेतील सुमारे१६०० कर्मचाऱ्यांचे परिवार आर्थिक बाबतीत संपूर्ण उध्वस्त झाले आहेत.त्यामुळे सदरची योजना रद्दबातल होणे आवश्यक असून कर्मचाऱ्यांच्या हिताचे आहे. यासाठी तसेच इतर अनुषंगिक मागण्यांसाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील १२ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सकाळ सत्रात ठिय्या आंदोलन करुन राज्य सरकारला साकडे घातले.सदर ठिय्या आंदोलनात१) जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव,२)महिला व बालविकास अधिकारी,जळगाव,३)प्रकल्प अधिकारी,एकात्मिक बाल विकास प्रकल्प,जळगाव,४) जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१,सहकारी संस्था,जळगाव, ५) सह दुय्यम निबंधक वर्ग- जळगाव-३,६)जिल्हा…
मुंबई, वृत्तसंस्था । एसटी महामंहाडळ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासंदर्भात पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभुमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने 27 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची दखल घेऊन कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यातही वाढ करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने 27 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची दखल घेऊन परिवहन मंत्री परब यांनी मंत्रालयात संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक आयोजित करुन तोडगा काढला. परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी यासंदर्भात…