Author: saimat team

यावल, प्रतिनिधी । माजी विद्यार्थ्यांचा मेळावा हा उपक्रम प्रेरणादायी असून सेवा निवृत्त झालेल्या आम्हा सर्व शिक्षकांना आम्ही जणू आजही सेवा देत आहोत आणि ही मुलं आजही आमच्या समोर वर्गात आहेत असा भास होत आम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळते. विद्यार्थ्यांच्या अशा उपक्रमामुळे आमचे आरोग्य अधिक सुदृढ होत आहे असे आम्हाला जाणवते असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक व्ही. बी. पाटील यांनी केले ते किनगावात १९९४ मध्ये इयत्ता १० वीत असलेल्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात विद्यार्थी – विद्यार्थिनींनी आपल्या शिक्षकांचा सपत्नीक सत्कार केला. व मोठ्या उत्साहात मेळावा संपन्न झाला. किनगाव ता. यावल येथील नेहरू विद्यालयातील १९९४ मध्ये इयत्ता…

Read More

जळगाव प्रतिनिधी । तालुका पोलिसांनी सोमवारी अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ८ ट्रॅक्टरवर कारवाई करत ट्रॉलीसह ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा केले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी 9 नोव्हेंबर दुपारी तालुका पोलीस ठाण्यात दिनेश चांगो भोई रा. हरिविठ्ठल नगर व रवि सर्जू राठोड रा.समतानगर यांच्यासह एकूण ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना सावखेडा शिवारात गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैधपणे वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार चिंथा यांनी सोमवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस उपनिरिक्षक कल्याण कासार, विश्‍वनाथ गायकवाड यांच्यासह कर्मचार्‍यांना सोबत…

Read More

जळगांव, प्रतिनिधी । जागतिक आरोग्य संघटने नुसार भारत हा मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जाणारा देश आहे असे समजले जाते. देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात मधुमेह पसरत चालला आहे. आज पाहिलं तर प्रत्येक घरात एकतरी मधुमेही रुग्ण हा असतोच. शिवाय एकदा का मधुमेह झाला की तो कधीच बरा होत नाही. त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी आयुष्यभर औषधं किंवा इन्सुलिन घ्यावे लागतात असा समज समाजात पसरलेला आहे. तसंच डायबेटीसमुळे हृदयरोग, हार्ट अटॅक, किडणी फेल्युअर, नजर कमजोर होणे अशा कॉम्प्लिकेशन्सना चाळीशी पुढीलच नाही तर तीस वर्षाखालील तरुण पिढी ही या गंभीर समस्यांचा सामना करत असल्याचं दिसून येत आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजेच बदललेली व चुकीची जीवनशैली…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,९८० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,०३० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६४,७०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे आजचा भाव? गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,९८० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,९८० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या व प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. तर, हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे सरकारकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. परिणामी एसटी वाहतुक ठप्प झाली असून, सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने देखील कडक भूमिका घेत, राज्यभरातील ३७६ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केले असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यभरातील १६ विभागातील ४५ आगारामधील ३७६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये नाशिक विभागातील कळवण आगारातील १७…

Read More

यावल, प्रतिनिधी । औरंगाबाद पश्चिम विभागाचे आमदार संजय शिरसाट यांनी ग्रामसेवकांनबाबत चिथावणीखोर अपशब्दाचा वापर जाहीररित्या केल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन यावल तालुका शाखेतर्फे यावल पोलीस निरीक्षक,यावल तहसीलदार,यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे तसेच गुन्हा दाखल न केल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन यावल तालुका शाखेचे पदाधिकारी ग्रामसेवकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,औरंगाबाद पश्चिम विधानसभा क्षेत्रातील आमदार संजय शिरसाट यांनी दि.8नोव्हेंबर2021रोजी औरंगाबाद येथे सरपंचाचे प्रशिक्षण कार्यशाळेत भाषण करताना शासकीय व्यासपीठावरून ग्रामसेवक सर्ववर्गाबद्दल “भामटा, हरामखोर”इत्यादि अपशब्द वापरून संवर्गाची बदनामी केली तसेच ग्रामविकासात सरपंच, ग्रामसेवक यांचे सयुक्तिक जबाबदारीचे भान न…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ८ नोव्हेंबर, २०२१ पासून बेमुदत संप पुकारलेला आहे. या संपाच्या काळात प्रवाशांची गैरसोय होवू नये म्हणून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे प्रवाशांच्या सोयीकरीता नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली आहे. नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी क्र. ०२५७-२२६१८१९ असून प्रवाशांना वाहनाची उपलब्धता किंवा मागणी असल्यास त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधून मागणी नोंदविण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर शासकीय अधिसूचनेनुसार खाजगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपनीच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहनाव्दारे प्रवासी वाहतूक करण्याकरीता मान्यता देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने बसेस उपलब्ध करुन देण्यासाठी परिवहन कार्यालयातील सहा. मोटार वाहन…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहरातील विराज अशोक कावडीया यांची युवासेनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सहसचिव पदावर निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना प्रमुख राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टचार मंत्री आदित्य ठाकरे आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी ही निवड जाहीर केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आजवर केलेल्या वाटचालीचे हे फळ आहे. पक्षश्रेष्ठींनी युवासेनेच्या विस्तारासाठी दिलेली ही संधी आव्हानातमक आणि मोठी आहे. शिवसेना, युवासेनेचे सर्व पदाधिकारी, सहकारी तसेच शिवसैनिकांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू, असा विश्वास विराज कावडीया यांनी व्यक्त केला आहे. विराज कावडीया हे वयाच्या १६ व्या…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारून काम बंद आंदोलन सुरू केले आहे, यात खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कडून होत असलेली जनतेची लुबाडणूक थांबवा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका संघटक योगेश पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे काही संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून यात काम बंद आंदोलन जवळपास आठ ते दहा दिवसापासून सुरू होते व आजपासून तर सर्व संघटनेचे काम यामध्ये सहभागी झाल्यामुळे आता एकंदरीत संपूर्ण भारतातील तसेच या बंद ठेवण्यात आल्या आहेत. ऐन दिवाळीच्या सणाला संप पुकारल्यामुळे बाहेरगावी गेल्यावर जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा मनस्ताप…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील जे शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र आहेत. अशा पात्र लाभार्थ्यांची नुकसानीची भरपाई विनाविलंब त्यांच्या खात्यावर जमा करावी. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्वसंबंधीत विमा कंपन्याचे प्रतिनिधी व यंत्रणांना दिलेत. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा आढावा आज पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतला. याप्रसंगी आमदार अनिल पाटील, अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, विविध विमा कंपन्यांचे प्रतिनिधी व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतक-यांचे…

Read More