जळगाव, प्रतिनिधी । मानवी सेवेत ताकद असल्याने समाजातील वंचित घटकांच्या मदतीसाठी प्रत्येकाने नेहमीच मदतीचा हात दिला पाहिजे. सामाजिक कार्याने प्रेरित संघटनेने दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्य वितरणाचा कार्यक्रम अनुकरणीय आणि कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी केले. चाळीसगाव जि. जळगाव येथे आज सायंकाळी वर्धमान धाडीवाल मित्र मंडळातर्फे दिव्यांग बांधवांना विविध साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दिव्यांग संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षी निकम, अनिल चौधरी, सामाजिक कार्यकर्ते वर्धमान धाडीवाल आदी उपस्थित होते. राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले, समाजातील वंचित, दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । सावखेडा बु., ता. पाचोरा येथील वीरजवान मंगलसिंह जयसिंह परदेशी (वय 35) यांच्या पार्थिवावर आज सकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, राज्याचे जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी परदेशी कुटुंबायांची घरी जाऊन भेट घेत त्यांचे सांत्वन केले. जवान मंगलसिंह परदेशी यांना 14 नोव्हेंबर, 2021 रोजी पठाणकोट येथे कर्तव्यावर असताना छातीत गोळी लागल्याने वीरमरण आले. त्यांचे पार्थिव आज सकाळी सावखेडा येथे आणण्यात आले. त्यानंतर शोकाकूल वातावरणात आणि ‘जवान मंगलसिंह अमर रहे’च्या जयघोषात अंत्ययात्रा काढण्यात आली. जवान मंगलसिंग परदेशी यांना त्यांचा सहावीतील 12 वर्षीय मुलगा चंदन याने…
सोलापूर, वृत्तसंस्था । अक्कलकोट येथून प्रवासी भरून सोलापूरकडे येणाऱ्या जीपचा अपघात होऊन त्यात दोन महिलांसह एकूण पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना कुंभारी येथे घडलीय. या अपघातामध्ये १२ प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. आज सकाळी ११ च्या सुमारास हा अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार जीपच्या चाकाचा टायर फुटल्याने हा अपघात घडलाय. मृत आणि जखमींची ओळख पटविण्याचे काम सोलापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत. जखमींवर सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे प्रवासी खासगी वाहनांचा आधार घेत आहेत. अक्कलकोट येथून एमएच १३ एएक्स १२३७ या क्रमांकाची प्रवासी वाहतूक करणारी जीप…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेच्या विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीवर रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील पिंप्राळा भागात राहणाऱ्या ३० वर्षीय विवाहितेचा पाठलाग करून एकाने विनयभंग केल्याची प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंप्राळा भागात ३० वर्षीय विवाहिता आपल्या पतीसह वास्तव्याला आहे. सोमवारी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास विवाहिता ह्या पती व मुलासह दुचाकीने दवाखान्यात जात असतांना नुर मोहम्मद लतीफ (वय-४०) रा. जळगाव हा दुचाकीचा पाठलाग केला. त्यानंतर त्यांच्या दुचाकीसमोर त्याची दुचाकी लावून त्यांना थांबविले. विवाहितेला माझ्याशी…
जळगांव, प्रतिनिधी । भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या बालदिनाचे औचित्य साधून जळगांव येथील रॉबिनहूड आर्मीने जादूगाराच्या कार्यक्रमाचे आयोजन करून अगदी अनोख्या पद्धतीने बालदिवस साजरा केला. मुलं म्हणजे देवा घरची फुलं’जवाहरलाल नेहरूंचे मुलांवरील प्रेम पाहता दरवर्षी विविध उपक्रम घेऊन बालदिवस साजरा केला जातो.जळगांव येथील समता नगर परिसरात रॉबिन हूड आर्मीतर्फे प्रसिद्ध जादूगार अविनाशजी दुसाने यांच्या मॅजिक शोचे आयोजन केले गेले.रॉबिन हूड आर्मीच्या सदस्या संगीता चावला यांनी अविनाशजींचे स्वागत करत कार्यक्रमाला सुरुवात केली. अविनाशजींनी वेगवेगळे जादू प्रस्तुत केले व खूप मजेदार गोष्टी सांगितल्या.मुलांनी तसेच परिसरातील लोकांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.खाऊ वाटप करून बालदिन मजेत साजरा करण्यात आला.…
जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रीय रोगनियंञण आरोग्य कार्यक्रम अंतर्गत लाळ खरकुत रोगाचे निर्मूलनसाठी लसीकरण करणे बाबतची मागणी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी केली. भडगाव तालुक्यातील मोठी लोकसंख्या असलेल्या आमडदे गावात पशुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात असून येथिल प्रमुख व्यवसाय शेती व शेतील जोडव्यवसाय म्हणून दुग्धव्यसाय मोठ्या प्रमाणात असून येथिल पशुवैदयकीय दवाखान्यात गाय,म्हैस,शेळी,मेंढी बैल,या जनावरांना लाळ,खरकुत आजारावर निर्मूलन करण्यासाठी लसीकरण करने आवश्यक असून दुध उत्पादक शेतकरी बांधवांच्या दुधात घट होत असल्याने ही तसेच एखादे पशुधन दगावले तर शेतकरी बांधवांला 50 ते 60 हजार रूपये आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून…
भुसावळ, प्रतिनिधी | विशेष पोलीस महानिरीक्षकांची मोठी कारवाई अवैध गॅस फिलींग प्रकरणातील प्रमुख सूत्रधार वसीम अब्दूल मशीद पटेल याला बाजारपेठ पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. शहरातील पटेल कॉलनीत गुरुवारी विशेष पोलिस महानिरीक्षका बी.जी. शेखर यांच्या पथकाने कारवाई केली होती. त्यात ९ घरगुती सिलिंडरसह दोन रिक्षा व अन्य मुद्देमाल मिळून १ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गॅस वाहनात भरणारा सलमान अब्दुल माजिद पटेल (वय ३०, पटेल कॉलनी, खडका रोड, भुसावळ), रिक्षा चालक आरिफ खान इसाफ खान (वय ३५, जाम मोहल्ला, भुसावळ) व जकाउल्ला खान असदउल्ला खान (वय ४३, खडका रोड, रामदासवाडी, भुसावळ) यांना अटक केली होती. मात्र, मुख्य संशयित…
यावल, प्रतिनिधी । दिनांक १५ रोजी जळगाव येथील पद्दमालय विश्राम गृह येथे जळगाव जिल्हा निळे निशान पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली. बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक तथा संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीत सामाजिक स्तरावरील विविध समस्यावर चर्चा करून संस्थापक / अध्यक्ष यांनी संघटनेची भूमिका काय व कशी या बद्दल मार्गदर्शन केले. बैठकी दरम्यान राहुलभाऊ शिरसाठ यांची जळगाव महानगर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तसेच अशोक तायडे जिल्हा उपाध्यक्ष , किशोर तायडे जळगाव महानगर उपाध्यक्ष , दिपक लोहार भुसावळ युवा तालुका अध्यक्ष , अब्दुल फारुकी यावल तालुका उपाध्यक्ष , विष्णू भालेराव यावल शहर अध्यक्ष , विजय…
जळगाव, प्रतिनिधी : सागर पार्कवर महापालिका आणि सुप्रीम इंडस्ट्रीज यांनी संयुक्तरित्या उभारलेले अद्ययावत स्वच्छतागृह हे काळाची गरज आहेच. पण, याची निगा राखण्याचे आणि याला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही जळगावकरांची आहे. नागरिकांसा सकारात्मक सहभाग असल्याशिवाय कोणतेही काम यशस्वी होत नाही. यामुळे जळगावकरांनी आता महापालिकेच्या प्रयत्नांना साथ देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते सागर पार्कवरील स्वच्छतागृहाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी त्यांनी जळगाव शहरातील चार प्रमुख रस्त्यांसाठी उद्या निविदा प्रसिध्द करण्यात येत असून १० डिसेंबर नंतर या रस्त्यांची कामे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देखील दिली. सुप्रीम इंडस्ट्रीजच्या सीएसआर निधीतून सागर पार्कवरी महापालिकेच्या मदतीने अद्ययावत स्वच्छतागृह उभारण्यात…
पाचोरा, प्रतिनिधी । पठाणकोट येथे झालेल्या एका हल्ल्यात सावखेडा बुद्रूक ता.पाचोरा येथील रहिवासी असलेले जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी (३५) हे शहीद झाले. शनिवारी रात्री ही घटना घडली. दरम्यान, जवान शहीद झाल्याचे कळताच परिसरातील गावांमध्ये शोककळा पसरली आहे. शहिद मंगलसिंग हे ३९ – ई.एम.ई. मध्ये नायक पदावर कार्यरत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण सावखेडा बुद्रूक जि. प.शाळेत तर वरखेडी विद्यालयात १० वी पर्यंतचे शिक्षण झाले. वयाच्या १८ वया वर्षीच ते सैन्यदलात भरती झाले. सेवापूर्तीला एक वर्ष बाकी असतांनाच त्यांना वीर मरण आले. पंधरा दिवसांपूर्वीच सावखेडा येथून सुटी घालवून कर्तव्यावर हजर झाले हेाते. मंगलसिंग यांच्या पश्चात आई – वडील, दोन मोठे भाऊ, पत्नी,…