“पालिकेतील मुख्याधिकारी व नगर रचना विभागा सदर प्रकरणाकडे दुर्लक्ष करून तात्पुरता स्वरुपाची परवानगी देण्याच्या मार्गावर?” यावल, प्रतिनिधी । रावेर तालुक्यात सावदा नगरपालिका हद्दीतील गट नं.१३५ च्या शेत जमीनीवर न.पा.सह नगर रचना विभाग जळगांव,जिल्हाधिकारी जळगांव येथून नियमानुसार कोणतीच परवानगी न घेता शेत मालकांनी येथील नैसर्गिक नाल्याचे सपाटीकरण करून परस्पर मनाप्रमाणे बेकायदेशीर ले-आऊट बनवून,प्लाट बुकींग पावत्या,तयार केल्याअसून शेत जमीनीचे मोजमाप करून खुणा गाडुन शेत जमीनीला प्लाटीत विभागणी करून लोकांना संपूर्ण सुख सुविधा उपलब्ध न करता अनधिकृतपणे विक्री करत असल्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू असल्याचे संपूर्ण रावेर तालुक्यात बोलले जात आहे.या संदर्भात तक्रारदारांनी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुराव्यासह तक्रार दिली असल्याचे…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । सावखेडा बुद्रूक, ता. पाचोरा येथील वीरजवान मंगलसिंह जयसिंह परदेशी यांच्या कुटुंबीयांची जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट घेवून सांत्वन केले. जवान मंगलसिंह परदेशी यांना 14 नोव्हेंबर, 2021 रोजी पठाणकोट येथे कर्तव्यावर असताना छातीत गोळी लागल्याने वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर 16 नोव्हेंबर, 2021 रोजी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आज पालकमंत्री श्री. पाटील यांनी सावखेडा येथे जावून परदेशी कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी परदेशी कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली. तसेच नियमाप्रमाणे मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे सांगितले. यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी वीरजवान मंगलसिंग परदेशी यांचे आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा-मुलगी…
जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील कला पथकांनी आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदनातून आपल्या जिल्ह्यातील कलावंतांना कामे मिळावी यासाठी निवेदन दिले. 14 ऑक्टोबर च्या शासन निर्णयानुसार आपल्या जिल्ह्यात दहा संस्थांची कलापथकांची निवड करण्यात आली पण अद्याप पर्यंत कार्यक्रम मिळाले नाही covid-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून कलावंतांचे कामच बंद आहे त्यामुळे काही कला पथकांच्या कलाकारांवर उपासमारी व मोलमजुरी करण्याची वेळ आलेली आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी त्वरीत कार्यक्रम देऊ असे कलावंतांना आश्वासनही दिले आहे आज जे कलावंत आपल्या उदरनिर्वाहासाठी कलेवर अवलंबून आहेत असे कलाकारांबद्दल मला सहानुभूती आहे असेही जिल्हाधिकारी साहेबांनी मत व्यक्त केले निवेदन देताना समर्थ बहुउद्देशीय संस्थेचे विशाल जाधव तुळजाई बहुउद्देशीय संस्थेचे…
‘महाराष्ट्रातील दंगली – रझा अकादमीचे षडयंत्र ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद यावल, प्रतिनिधी । वर्ष 2012 मध्ये मुंबईत रझा अकादमीने केलेल्या दंगलीत राष्ट्रीय संपत्तीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते.त्याची वसूली अजूनही बाकी आहे.आता पुन्हा त्रिपुरातील घटनेचे कारण देऊन महाराष्ट्रात अमरावती,मालेगाव,नांदेड आणि अन्य भागांत विनापरवानगी मोर्चे काढून हिंदूंवर आक्रमणे करण्यात आली.हिंदूंचे आणि राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करण्यात आले. यातील दंगलखोरांकडून नुकसान भरपाई वसूल केली पाहिजे. रझा अकादमीचा इतिहास लक्षात घेता दंगलीतील सहभागाविषयी त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे,अशी मागणी अधिवक्ता सतीश देशपांडे यांनी केली.हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘महाराष्ट्रातील दंगली रझा अकादमीचे षड्यंत्र ?’ या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात…
जळगाव, प्रतिनिधी । भारतीय राष्ट्रीय प्राधिकरण तर्फे आकाशवाणी चौक , ईच्छा देवी चौक व अजिंठा चौफुली येथे सर्कलचे काम सुरू करण्यात आलेले होते . जळगाव शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता याठिकाणी होणाऱ्या सर्कलच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा होऊन लहान मोठे अपघात होऊन जिवीत हानी होण्याची शक्यता लक्षात आल्याने , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर तर्फे दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी उपरोक्त नमुद तिन्ही चौकात सर्कल होऊ नये व उड्डाणपुल बांधण्यात यावे , यामागणीचे निवेदन मा. जिल्हाधिकारी , जळगाव व मा. प्रकल्प अभियंता , भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण , जळगाव यांना देण्यात आले होते . परंतु 5/6 दिवस उलटुन देखील सदर निवेदनाची…
जळगाव, प्रतिनिधी । नारीशक्ती ग्रुप जळगावतर्फे 9 ऑक्टोबर 2021 रोजी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीन जळगाव शहर आ. राजूमामा भोळे यांच्या शुभहस्ते दिव्यांग भगिनी सविता अशोक साळुंके हिला देण्यात आली. या भगिनीला उदरनिर्वाहासाठी पिको फॉल शिलाई मशीनची खूप आवश्यकता होती ती गरज तिची नारीशक्ती ग्रुप तर्फे पूर्ण करण्यात आली तसेच तिला आपला उद्योग धंदा वाढवण्यासाठी हँडीकॅप्पड ई-बाईक ची देखील गरज आहे असे तिने आपल्या मनोगतातून बोलून दाखवले. त्यावेळी सविता या दिव्यांग भगिनीची स्थिती पाहता तत्क्षणी मा.राजूमामा भोळे यांनी तिला दिवाळीपर्यंत हँडीकॅप्पड ई_बाईक देण्याचा शब्द दिला. तात्काळ कार्यवाही करून राजूमामा भोळे व नारीशक्ती ग्रुप अध्यक्ष मनीषा पाटील यांच्या माध्यमातून कुटुंबीयांसह…
रावेर, प्रतिनिधी | येथील तरुणाने नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना 17 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी रावेर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील शिवाजी चौक परिसरात राहणा-या २८ वर्षीय अविवाहीत युवकाने तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली. यामुळे एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळु शकले नाही. रावेर शहरातील शिवाजी चौक परिसरात राहणारा योगेश प्रभाकर महाजन (वय २८) हा घरी कोणाला न सांगता दि.१७ रोजी सायंकाळी सात वाजता टिव्हीएस कंपनीची क्र. MH 19 PC 7228 गाडी घेवून निघुन गेला होता. घरी आला नाही म्हणुन त्याच्या नातलकांनी शोधाशोध…
जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात बंद,रद्द झालेले मयत झालेले वारस न लागलेले अशा स्वस्त धान्य दुकान दुकानाचे जाहीरनामे जिल्हा प्रशासनाने काढले असून मात्र विस्तारित भागात लोकसंख्या झपाट्याने वाढत असून त्याभागात नविन दुकानं शासनाने निविदा काढून जाहीरनामे काढावे करावे या मागणीसाठी आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात निवेदन सादर करण्यात आले निवेदनात म्हटले आहे. जिल्ह्यात जुने बंद पडलले स्वस्त धान्य दुकाने जाहिरनामे काढून प्रक्रिया सुरू असून मात्र सुधारित विस्तारित भागात नवीन दुकाने काढण्याबाबत शासनाचे कोणतेही आदेश नाहीत त्या बाबतीत नविन दुकाने सुरु करावेत तसेच कोरोनाची…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धार्मिक आणि जातीय हिंसाचारावरून केंद्रातील मोदी सरकारवर आणि भाजपावर हल्लाबोल केलाय. देशात सत्ताधारीच जातीयवादाला खतपाणी घालत आहेत. त्यांना खड्याप्रमाणे बाजूला करणं तुमचं आणि माझं कर्तव्य आहे, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. तसेच आदिवासी कधीही चुकीच्या प्रवृत्तीला साथ देणार नाही ही खात्री असल्याचंही नमूद केलं. ते गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा) तालुक्यातील कार्यकर्ता आणि पदाधिकारी बैठकीत बोलत होते. शरद पवार म्हणाले, “धार्मिक आणि जातीयवादाला खतपाणी घालणारा विचार जाणिवपूर्वक वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हे सत्ताधारी करत आहेत. त्रिपुरात काही घडलं त्याचे परिणाम महाराष्ट्रात झाले. नांदेड, अमरावती, मालेगाव या ठिकाणी याचे परिणाम झाले. तिथं काही घडलं…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका २६ वर्षीय विवाहितेला दुचाकी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावे यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिस स्थानकात पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील आंबेडकर नगरातील माहेर असलेल्या विवाहितेला गाडी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारीका सिध्दार्थ तायडे (वय-२६) रा. आंबेडकर नगर, जळगाव यांचा विवाह सिध्दार्थ जगदीश तायडे रा. आराधना नगर, वापी, वलसाड, गुजरात येथे रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या सुरूवातील काही दिवस चांगले गेले. त्यानंतर पती सिध्दार्थ याने किरकोळ…