यावल प्रतिनिधी । १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविल्याची घटना बारा नंबर रोजी घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील एका गावात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फसूल लावून पळवून नेल्याचा प्रकार १२ नोव्हेंबर रोजी उघडकीला आला. शोधाशोध करून मुलगी न मिळाल्याने अखेर बुधवारी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील आदीवासी भागात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. ११ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता सर्वजण जेवण करून घरात झोपले. मध्यरात्रीच्य सुमारास अज्ञात व्यक्तीने १६ वर्षीय मुलीला…
Author: saimat team
जळगाव प्रतिनिधी । डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ रेल्वे स्टेशन येथे दोन जणांना मारहाण केल्याची घटना घडली याप्रकरणी संशयितांविरुद्ध विरुद्ध शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रेल्वे स्थानकासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ काहीही कारण नसंताना दोन जणांना मारहाण करून लोखंडी वस्तूने वार करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश सुहास चौधरी (वय-२५) रा. दिक्षीत वाडी जळगाव हा तरूण मित्र वैभव सुभाष काळे रा. दिक्षीत वाडी यांच्या सोबत बुधवार १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता शहरातील रेल्वे स्थानकासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आले. त्याठिकाणी कल्पेश भोईटे आणि प्रशांत…
जळगाव, प्रतिनिधी । बनावट पावत्यांच्या आधारे जिल्हा परिषदेच्या ठेकेदारांनी अवैध गौणखनिजाचा वापर केल्या प्रकरणी अखेर जि.प. सीईओंनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा परिषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांनी या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा केला आहे. जळगावसह पाचोरा, भडगाव आणि एरंडोल या तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या कामांसाठी १४ ठेकेदारांनी रॉयल्टी न भरता बनावट पावत्यांच्या वापर करून शासनाला चुना लावल्याचे हे प्रकरण जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी उघडकीस आणले आहे. या प्रकरणात शासनाची तब्बल ६३ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक करण्यात आल्याचे पुरावे त्यांनी सादर केले आहेत. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी गुन्हे दाखल…
सर्कल, तलाठी यांची संयुक्त कारवाई यावल, प्रतिनिधी । पाडळसे बामणोद रस्त्यावर फैजपूरकडे जात असलेले अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर सर्कल,तलाठी यांनी पकडून फैजपूर पोलीस स्टेशनला जमा केले.पुढील दंडात्मक कारवाई साठी यावल तहसिलदार यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. दि.16रोजी सकाळी पाडळसे बामणोद रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर क्र.एम.एच.09जी.ई5966 हे गस्ती पथकातील यावल मंडळ अधिकारी शेखर तडवी,फैजपुर मंडळ अधिकारी देवरे,अंजाळे येथील तलाठी सूर्यवंशी,यावल तलाठी ईश्वर कोळी,पाडळसे येथील भूषण सूर्यवंशी, कोरपावली,टाकरखेडा येथील तलाठी तायडे,परसाडे येथील समीर तडवी,यांच्यासह डोंगर कठोरा,चूंचाळे तलाठी,शासकीय वाहन चालक साळवे या पथकाने पकडून फैजपूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.डंपर चालक संजय कडू पाटील आणि मालक ज्ञानेश्वर लोणारी राहणार आंदलवाडी तालुका…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४८,४८० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४८,३६० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६६,४०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४८,४८० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,४८० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर…
मुक्ताईनगर, प्रतिनिधी । तालुक्यात काही दिवसांपुर्वी माजी सैनिकांचा खून करण्यात आला होता. खून करणाऱ्या आरोपींना पकडून पोलीस निरीक्षक राहूल खताळ यांनी गुडांची कुऱ्हा परिसरातून धिंड काढून जनतेमधील भिती दूर केली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा परिसरात गेल्या काही दरोडा, हत्या, काळे बाजारीकरण, अवैद्य धंदे, फसवणूक, अत्याचार, चोरी अशी विविध प्रकारची गुन्हेगारी आपले पाय पसरत आहे. या वाढलेल्या गुन्हेगारीच्या विरोधात परीसातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना निवेदन दिले होते. या वाढत्या गुन्हेगारीची दाखल घेत पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी काही दिवसांपूर्वी घडलेल्या माजी सैनिकांच्या खुंनाच्या आरोपींना पकडून त्यांना कुऱ्हा परिसरात त्यांची जनतेतील भीती काढण्यासाठी धिंड काढण्यात आली. याप्रकणी प्रतिक्रिया पोलीस…
यावल, प्रतिनिधी । यावल येथील नगरपरिषदचे नगरसेवक तथा आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष व आई हॉस्पीटलचे संचालक डाॅ.कुंदन फेगडे यांच्या परिवारातर्फे जागतिक पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार व गौरव करण्यात आला. यावल येथे मंगळवार दि.16 नोव्हेंबर2021रोजी येथील नगर परिषदचे युवा नगरसेवक तथा सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांच्या आई हॉस्पीटल हॉल मध्ये जागतीक पत्रकार दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील विविध वर्तमानपत्राचे अनेक वर्षापासुन वृत्त लेखानाचे कार्य करणाऱ्या वृत्तपत्र प्रतिनिधींचा सत्कार व सन्मान करण्यात आला.याप्रसंगी डॉ.कुंदन फेगडे यांच्या हस्ते जेष्ठ पत्रकार डी.बी.पाटील,पत्रकार राजु कवडीवाले,पत्रकार अय्युब पटेल,पत्रकार शेखर पटेल,अरूण पाटील,सुनिल गावडे,ज्ञानदेव मराठे,पराग सराफ,तेजस यावलकर,शब्बीर खान,विक्की वानखेडे,दिपक नेवे,प्रकाश चौधरी आदी पत्रकारांचा सत्कार करण्यात आले.यावेळी…
चिखली, प्रतिनिधी । जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत वाढलेल्या दरोडे, चोरीच्या घटनांमुळे भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज, १७ नोव्हेंबरला पहाटे चिखली शहर व्यावसायिकाच्या निर्दयीपणे झालेल्या हत्येमुळे हादरून गेले आहे. काल, १६ नोव्हेंबरला रात्री पावणेदहाच्या सुमारास दुकानात शिरलेल्या दोन चोरट्यांनी आनंद इलेक्ट्रॉनिक्सचे मालक कमलेश पोपट यांची पोटावर चाकूचे वार करून हत्या केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झाला असून, एक चोरटा दुकानाबाहेर लक्ष ठेवण्यासाठी थांबलेला होता. चिखली शहरातील जयस्तंभ चौक परिसरात कमलेश पोपट (५५) यांचे आनंद इलेक्ट्रॉनिक्स आहे. काल रात्री दुकान बंद करण्याची तयारी करत असताना त्यांनी दुकानाचे मुख्य शटर बंद केले. बाजूचे लहान शटर उघडे असताना तिघे जण मोटारसायकलने…
जळगाव प्रतिनिधी | चाईल्ड पोर्नोग्राफीचा प्रसार करणार्यांच्या विरोधात केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने धाडसत्र टाकले असून यात जळगावातही छापे मारण्यात आले आहेत. यामुळे या भयंकर प्रकाराचे धागेदोरे हे जळगावपर्यंत पोहचल्याचे स्पष्ट झाले. चाईल्ड पोर्नोग्राफीच्या विरूध्द सरकारने कठोर भूमिका घेतली असतांनाही याचा सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे दिसून आले आहे. या अनुषंगाने सीबीआयने मंगळवारी दिवसभरात देशभरात छापे टाकले. ऑनलाइन बाल लैंगिक शोषण सामग्रीशी संबंधित गुन्ह्यांवर देशव्यापी समन्वित कारवाईमध्ये, केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने १४.११.२०२१ रोजी ८३ आरोपींविरुद्ध ऑनलाइन बाल लैंगिक शोषण आणि शोषणाशी संबंधित आरोपांवर २३ स्वतंत्र प्रकरणे नोंदवली. यानंतर काल म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी देशभरात छापे टाकण्यात आले. यात…
पहूर, प्रतिनिधी । पोलिस स्टेशनचे निरीक्षक अरुण धनवडे साहेब यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेंदुर्णी येथील अजय भोई शिवसेनाप्रमुख याच्या कानाखाली कोणीही लगावली नसून हा खोटा आरोप करत आहे. शेंदुर्णी येथील एका वृद्धला फक्त घुरघूर का बघतो या कारणावरून त्यास एका शिवसेना पदाधिका-याने बेदम मारहाण केली, व पोलीस ठाणेस आल्यावर देखील त्यांचेशी अरेरावी व भांडण केले म्हणून त्यांना पोलीस ठाणेत बसवून त्यांचे विरोधात वृद्धाची एन.सी. नोंद करीत असताना नमुद भांडणाशी कोणत्याही प्रकारे संबंध नसताना अजय भोई नावाचा इसम प्रतिबंधीत क्षेत्रात (जेल समोर) विनापरवाना घुसून आरडाओरडा केला, सदरवेळी वायरलेस वर वरिष्ठांचा ग्रुप कॉल चालू असल्याने त्यास आम्ही शांत राहण्याचा इशारा करूनही तो मोठमोठ्याने…