जळगाव,प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व चोपडा येथे अनुक्रमे 23 व 30 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी 9 ते दुपारी एक या कालावधीत विशेष दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये दिली आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या कार्यकारी समितीची बैठक मागील महिन्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दिव्यांग तपासणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. या पार्श्वभूमीवर शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आरोग्य यंत्रणेस दिले होते.…
Author: saimat team
जळगाव,प्रतिनिधी । आदिवासी समाजाचे भगवान बिरसा मुंडा वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक १५ नोव्हेंबर रोजी भाजपा कार्यालय वसंत स्मृती येथे दुपारी 3 वाजता भाजपा जळगाव जिल्हा व महानगराच्या वतीने वीर बिरसा मुंडा व संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यारर्पण जिल्हा अध्यक्ष आ सुरेश भोळे (राजु मामा) खासदार उन्मेश दादा पाटील महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी मा महापौर सीमाताई भोळे जिल्हा पदाधिकारी प्रदीप रोटे , रेखा ताई कुलकर्णी ,प्रा भगतसिंग निकम, राजेंद मराठे, राहुल वाघ , महेश जोशीं, मनोज भंडारकर , प्रकाश पंडित, धीरज वर्मा नगरसेवक अॅड सुचीता…
मलकापूर, प्रतिनिधी । येथील शहरातील मुख्य भागातून रुट मार्च काडत शहरातील नागरिकांना शांततेचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी शहर पोलीस स्टेशन मलकापूर येथे आज दिनांक 15 नोवेंबर ला अभिनव त्यागी उपविभागीय पोलिस अधिकारी मलकापूर यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन मलकापूर शहर येथे त्रिपुरा राज्य तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात झालेल्या दंगली संदर्भाने शांतता व सुव्यवस्था राहावी या करिता मलकापूर शहरांमध्ये रूट मार्च कढण्यात आला आहे. रूट मार्च मध्ये एस आर पी जालना गट क्रमांक 3 चे 24 अंमलदार, आरसीबी पथक क्रमांक 2 चे 11 अंमलदार व पोस्ट मलकापूर शहर येथील 3 अधिकारी व 15 अंमलदार हजर होते. रूट मार्च…
मलकापुर, प्रतिनिधी । येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर आगीचे तांडव उपजिल्हा रुग्णालय समोरील एस.एस.राजपाल या किराणा व्यावसायिकाच्या दुकानात माल खाली करून निघालेल्या मालवाहू ट्रक क्रमांक युपी 70 सिटी 8445 च्या वरील बाजूस विद्युत प्रवाहाच्या सर्विस लाईनच्या तारा अडकुन जवळच असलेल्या डीपीवर शॉर्टसर्किट झाला बाजूला असणाऱ्या जाधव यांच्या चहा नाश्त्याच्या हॉटेल वर विद्युत तारा पडल्याने त्या हॉटेलला आग लागून त्यातील 50 ते 60 हजार रुपयांचे सामान जळून खाक झाले आहे. ही घटना रविवार दि. 14 रोजी रात्री आठच्या सुमारास घडली उपजिल्हा रुग्णालय समोर राजपाल किराणा दुकानावर रोजच दिवसभर मोठ मोठी जड मालवाहू वाहने उभी असतात यामुळे येथे रहदारीचा खोळंबा होत असतो माणसाला साधे…
एरंडोल, प्रतिनिधी । महाराष्ट्राची प्रवासी व सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लालपरी आज बंद आहे, मागील काही वर्षापासून एसटी महामंडळाचे कर्मचारी एसटीला राज्य सरकार कर्मचारी म्हणून सामावून घेण्याचा व अशा विविध मागण्यांसंदर्भात राज्य शासनाशी चर्चा करत आहेत. या संदर्भात अनेक वेळी राज्यात आंदोलने देखील झाली आहेत आणि यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन देखील राज्य शासनाकडून दिले गेले,परंतु अजूनही तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे पुन्हा मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात आंदोलन झालेली आहेत. या आंदोलनादरम्यान ३७ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल देखील उचलले आहेत. कर्मचाऱ्यांनी दिवाळीपूर्वी पुकारलेला कामबंद आंदोलन प्रसंगी मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन…
जळगाव, प्रतिनिधी । दि 13 नोव्हेंबर रोजी स्टुडन्ट फोर सेवा व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगराच्यावतीने परिषद की दिवाळी या उपक्रमांतर्गत आपल्या घराप्रमाणे जनजाति बांधवांचे घरात आनंदाचा दिवा लागावा या उद्देशाने अभाविप जळगावच्या कार्यकर्त्यांनी शहरांमध्ये विविध ठिकाणी फिरून साड्या, फराळ व मिठाई एकत्र करून यावल तालुक्यातील निंबादेवी जवळील जनजाति पाड्यावर साडी चोळीचा आहेर, फराळ व मिठाई वाटप करण्यात आली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज नगर अध्यक्ष डॉ प्रा. अखीलेश शर्मा यांनी जनजाती पाड्यांवर असलेल्या विद्यार्थ्यांना व पालकांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले तसेच वाढत्या व्यसनाधीनतेवर प्रामुख्याने प्रकाश टाकला व व्यसनाधीनते च्या दुष्परिणामांचे चित्र डोळ्यासमोर उभे करून व्यसनापासून दुर राहण्यास सांगितलं, आपण…
जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यातील लोंढरी या गावात कापसाच्या मोजणीत फसवणूक झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर फेसबुक, Whatsapp च्या माध्यमातून व्हायरल झालेल्या होत्या. यावेळी साईमत लाइव्यच्या हाती सत्य घटना काय ही माहिती आली आहे. तसेच लोंढरी या गावात शेतकऱ्यांच्या कापसाची मोजणीत फसवणूक झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या, यावेळी आमच्या सायदैनिक साईमत च्या हाती लागलेल्या माहितीनुसार लोंढरी गावातील नामदेव राठोड या शेतकऱ्याने व्यापारी अंकित पाटील यांना कापूस आठ हजार १०० रु च्या भावाने दिला असता, त्यांनी अचानक त्यातील एक ४० किलो तोलाचे माप केले असता त्यांना काही शंका आल्या होत्या, परंतु कापुस वजनामध्ये काहीच फरक न पडल्याने तरी देखील त्यांनी आणि…
भुसावळ, प्रतिनिधी । येथील कारागृहातील कैद्याला भेटू देण्याच्या मोबदल्यात दोन हजाराची लाच घेतांना पोलीस नाईकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे भुसावळ परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस पोलीस नाईक अनिल लोटन देवरे असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तक्रारदार यांचे नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल असून ते कारागृहात आहे. कैद्याला भेटू देण्यासाठी आरोपी पोलीस नाईक अनिल लोटन देवरे यांनी ३ हजारांची लाच मागितली होती. तडजोड अंती २ हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली व सापळा रचण्यात आला. सोमवारी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास भुसावळ कारागृहात तक्रारदाराकडे देवरे यांनी २ हजारांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने रंगेहात…
जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहरातील विविध भागात विना परवानगी लावलेल्या फलकांवर महापालिकेने कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील बहिणाबाई चौकातील लेवा बोर्डींग, बसस्थानक ते आकाशवाणी चौकापर्यंत रस्त्याच्या दुभाजकात तसेच ख्वॉजामिया चौक परिसरात काही जणांनी महापालिकेची परवानगी न घेता विविध जाहीरातींचे, शुभेच्छांचे फलक लावले होते. महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी कारवाईची मोहिम राबविली असता सदर फलकांबाबबत कुठलीही परवानगी घेतलेली नसल्याचे आढळून आले. त्यानुसार महापालिकेने कारवाई करुन सर्व फलक जप्त केले. याप्रकरणी रविवारी महापालिका कर्मचारी युवराज नारखेडे यांच्या फिर्यादीवरुन फलक लावणार्या चेतन किशोर शिंपी रा. पोलीस कॉलनी, चंदू आण्णानगर, निलेश संजय जोशी, सुनील विजय…
जळगाव, प्रतिनिधी । आदिवासी क्रांतिकारक थोर स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्यावतीने महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याला उजाळा दिला बिरसा मुंडा यांनी पाणी जंगल आणि भूमिसाठी आदिवासी समाजासाठी त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला एकोणिसाव्या शतकातील बिरसा मुंडा हे महान स्वातंत्र्य सेनानी होते ते चळवळीत सक्रीय होते आदिवाशी होत असलेल्या बिर्टीश दडपणा विरुद्ध बिरसा मुंड यांनी मोठा लढा दिला होता. यावेळी जिल्हा सचिव भरत मोरे, युवक अध्यक्ष मिलींद सोनवणे, कार्याध्यक्ष सागर सपकाळे, महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, संघटक अनिल लोंढे, किरण अडकमोल, हरीष शिंदे, संदीप…