Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या कर्मचारी संपावर आहेत एसटी ही आजच्या खाजगीकरणाच्या काळात ग्रामीण व अतिदुर्गम भागातील सर्वसामान्यांसाठी उरलेले एकमेव हक्काचे प्रवासाचे साधन आहे. एसटी महामंडळ हे देशातील सर्वात मोठी असणारी सार्वजनिक वाहतूक संस्था आहे. मात्र जागतिकीकरणाच्या दबावात ही वाहतूक व्यवस्था हि खाजगी करण्याचा डाव पूर्वीपासूनच सुरु आहे त्याला कुठलाही राजकीय पक्ष अपवाद नाही मात्र येथील मानवी जीवन निर्देशांक उंचावण्यासाठी विकासप्रक्रियेत एसटी चा मोठा वाटा आहे ग्रामीण व अतिदुर्गम भागात शिक्षण रोजगार व आरोग्याच्या सुविधांसाठी आजही सर्वसामान्य जनता एसटी वरच अवलंबून आहे त्यामुळे हि एसटी वाचवणे हे महत्वाचे आहे एसटी कर्मचार्यांच्या संपामुळे एसटी चे शासनात विलीनीकरणाचा मुद्दा हा पुन्हा ऐरणीवर…

Read More

यावल, प्रतिनिधी । तापी नदी पात्र तसेच नदी नाल्यातून यावल तालुक्यात शिरागड पथराळे थोरगव्हाण परिसरातून अवैध वाळू वाहतूकीची तस्करी जोरात सुरू असून संपूर्ण यावल तालुक्यात अवैध वाळू पुरवठा होत आहे.वाळू पुरवठा करणारे वाळू तस्कर ठेकेदारांकडून मनमानी पद्धतीने सोयीनुसार वेळ पाहून वाजवीपेक्षा जास्त दराने अवैध वाळू विक्री करीत आहे. याकडे यावल तहसीलदार यांच्यासह मंडळ अधिकारी तलाठी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने तसेच शासकीय कामे करण्यासाठीसुद्धा शासकीय ठेकेदारांनाच यावल तहसील मधून अधिकृत वाळू वाहतुकीचे परवाने मिळत नसल्याने अवैध वाळू तस्करांना सुगीचे दिवस आले असून याकडे महसूल विभाग जाणून बुजून वाळू तस्करी करणाऱ्यांना सहकार्य करीत आहे का?असे संपूर्ण यावल तालुक्यात बांधकाम व्यावसायिकांमध्ये बोलले…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथे येथे विधी सेवा प्राधिकरण यांचे संयुक्त विद्यमाने तालुका वकील संघ आणि एस एस मणियार लॉ कॉलेज येथील विद्यार्थी यांच्यामार्फत कायदा जनजागृती शिबिर संपन्न झाले आहे. पहूर येथील लोकनियुक्त सरपंच निताताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एड. देवेंद्र पारळकर यांनी सूत्रसंचालन चेतन रोकडे तर आभार ॲडव्होकेट प्रशांत पाटील यांनी याप्रसंगी ॲड. एस आर पाटील, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी कायदा अंतर्गत यांनी महिला विषयी असलेल्या कायद्याची माहिती दिली. तसेच राजधर पांढरे बाबूराव घोंगडे रामेश्‍वर पाटील अंगणवाडी सेविका सुषमा चव्हाण पीडित महिला व त्यांचे अधिकार या विषयी माहिती, तर देवेंद्र पारळकर…

Read More

चाळीसगाव, प्रतिनिधी । फ्लॅट घेण्यासाठी विवाहितेचा १० लाखासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्लॅट घेण्यासाठी तुझ्या आई-वडीलांकडून दहा लाख रुपये घेऊन ये सांगत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. शहरातील शिंदी कॉलणी येथील सोनम विनय दुसाने (वय- ३०) या विवाहितेचा लग्न नाशिक येथील विनय प्रकाश दुसाने यांच्याशी झाला. मात्र सुरूवातीला पतीसह सासरच्या मंडळींकडून चांगली वागणूक मिळाली. त्यानंतर पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी तुझ्या आई-वडीलांकडून १० लाख रुपये घेऊन ये असे सांगून पती व सासरच्या सदस्यांकडून तिला शारीरिक व मानसिक छळवणूक…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षेची आवेदनपत्रे शुक्रवार, १२ नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने आवेदनपत्रे भरावीत, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यामध्ये उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ‘सरल’ डाटाबेसवरून नियमित शुल्कासह १२ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत भरावयाची आहेत, तर उच्च माध्यमिक शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत व्यवसाय अभ्यासक्रम…

Read More

यावल, प्रतिनिधी । सप्टेंबर/आक्टोंबर2021या महिन्यात झालेल्या गुलाबचक्री वादळ अतीवृष्टीतील नुकसानीची वाढीव रक्कम मदत मिळणेसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा समन्वयक आबा पाटील (मानमोडीकर)यांच्यासह समस्त शेतकरी बांधवांनी बोदवड तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या सप्टेंबर/आक्टोंबर महीन्यातील गुलाबचक्री वादळ अतीवृष्टी दरम्यान बोदवड तालुकाभरात 65 मिली. च्या वर नुकसानदायक पाऊस/अतीवृष्टी झाली यात सर्व पिकांचे एकूण नुकसान सुमारे 75ते 80%च्या जास्त झाले आहे.सदरची झालेली अतीवृष्टी ही शासनाच्या ओल्या दुष्काळाच्या निकषात अत शर्तिमधे बसत आहे.आपल्या स्तरावरून पंचनामे झाले परंतु नुकसानीच्या पटीत सदर पंचनामे झालेले दिसत नसल्याने भरपाई ही फार अल्प प्रमाणात मंजूर होऊ शकते.तरी शेतकऱ्यांचा झालेला खर्च आणि शेतकरी…

Read More

यावल, प्रतिनिधी । पोलिस आणि प्रशासन राजकीय नेत्यांच्या इशार्‍यांवर चालतात,हे देशभरात गेली अनेक वर्षे आपण अनुभवत आहोत.सार्वजनिक ठिकाणी होणारे अवैध नमाजपठण हे देशभरातील सभ्यतेला आव्हान आहे. गुरूग्राममध्ये उघडपणे रस्त्यांवर सुरू असलेल्या अवैध नमाजपठणाला तेथील हिंदू नागरिकांनी तसेच संघटनांनी ज्या प्रकारे विरोध केला,तसा विरोध देशभरात सर्व ठिकाणी होणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन विवेकानंद कार्य समितीचे अध्यक्ष नीरज अत्रीयांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ सार्वजनिक स्थळांवर नमाज का?’ या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते. ‘वोट बँके’च्या राजकारणासाठी संविधानाचे पालन न करता विशिष्ट समाजाला सूट दिली जात आहे,हे गेली ७० वर्षे या देशात होत आहे.भारतीय संविधानानुसार ‘कोणालाही बाधा उत्पन्न होईल,अशी…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । चालू हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्याचे पुढील संक्रमण टाळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. याकरीता शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कापुस पिक माहे डिसेंबर 2021 पर्यंत शेतातुन काढुन टाकावे व फरदड घेऊ नये, जानेवारी 2021 पासुन 5 ते 6 महिने कापुस विरहीत शेत ठेवल्यास शेंदरी बोंडअळीचा जीवनक्रम संपुष्टात येतो व त्यामुळे पुढील हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होतो. शेंदरी बोंडअळीला डिसेंबर महिन्यानंतर खाद्य उपलब्ध नसल्यास सुप्त अवस्थेत जाते. परंतु फरदडीमुळे जीवनक्रम चालु राहून पुढील हंगामात लागवड करण्यात येणा-या कापसावर तिचा पुन्हा प्रादुर्भाव…

Read More

जळगाव प्रतिनिधी । अवैधपणे घरगुती गॅस वाहनांमध्ये भरणाऱ्या रॅकेटचा एमआयडीसी पोलीसांनी कारवाई करुन पर्दाफाश केला आहे. कारवाईत रिकामे सिलिंडर, गॅस भरण्याच्या मशीनसह ६८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन जणांना अटक केली आहे. एमआयडीसी पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सिराज खान रज्जाक खान उर्फ शेराखान (वय ३०) रा मास्टर कॉलनी व जहांगीर रफिक पटेल (वय ४४) रा. सदाशिवनगर शेरा चौक अशी अटक केलेल्या दोन्ही संशयितांची नावे आहेत. मास्टर कॉलनीत जळगाव किराणाच्या मागील बाजूस बेकायदेशीररित्या घरगुती सिलिंडरमधून गॅस वाहनांमध्ये भरून दिल्या जात असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. त्यानुसार जिल्हा पोलीस ठाण्याच्या म त्यानुसार चिंता…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र शासनाने तृतीयपंथीय व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम कायदा, 2019 पारित केला आहे. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक 7 ऑक्टोंबर, 2020 अन्वये तृतीयपंथीयांच्या समस्या/तक्रारी संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून तृतीयपंथीय व्यक्तींसाठी “NATIONAL PORTAL FOR TRANSGENDER PERSONS” (https://transgender.dosje.gov.in) राष्ट्रीय पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळणेसाठी अर्ज करण्याबाबतची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांनी या संकेतस्थळावर ऑनलाईन भेट देऊन ओळखपत्र व…

Read More