जळगाव प्रतिनिधी । पायी जात असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकलीला दुचाकीने धडक देऊन जखमी केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे स्थानक परिसरात राहणाऱ्या सलीम सय्यद कुटुंबासह राहतात. भीक मागून ते आपला उदरनिर्वाह भागवतात. मंगळवारी सलीम सय्यद हे त्यांची मुलगी सकिना हिला सोबत घेत शिवाजीनगर परिसरातील रेल्वे स्टेशनच्या बाजुने रस्त्याने पायी जात होते यादरम्यान सद्दाम पटेल यांच्या पानटपरी नजीक अज्ञात दुचाकीस्वाराने सकिनाला धडक दिली. या धडकेत सकिनाच्या डाव्या पायाला दुखापत होऊन ती जखमी झाली. उपचार घेतल्यानंतर सकीनाच्या वडील सलीम सय्यद यांनी गुरूवारी याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली त्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे व मुलींचे निरीक्षणगृह/बालगृह, जळगाव येथील कंत्राटी पदभरतीकरीता उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आली असुन, प्राप्त झालेल्या अर्जातील पात्र उमेदवारांची निवड करुन त्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी Jalgaon.nic.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. अशी माहिती वनिता सोनगत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. ज्या उमेदवारांनी या पदभरतीसाठी अर्ज केले आहेत व ज्यांना सदरील अर्जावर हरकत घ्यावयाची आहे, अशा उमेदवारांनी dwcwjal@gmail.com या मेलवर अथवा प्रत्यक्ष जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, आकाशवाणी जवळ, जळगाव या…
जळगाव, प्रतिनिधी । देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व राष्ट्रीय एकात्मता दिनाचा कार्यक्रम आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा खनीकर्म अधिकारी दीपक चव्हाण, तहसीलदार सुरेश थोरात आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. याप्रसंगी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये साथीच्या रोगाशी संबंधित उध्दभवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे. या क्षेत्रातील संसाधनांमधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दूर व्हावा, याकरिता आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या युवक-युवतींना हेल्थकेअर क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी भारत सरकारव्दारा प्रधानमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण 3.0” योजना राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 18 ते 45 वयोगटातील एकूण 150 बेरोजगारांना शासकीय आर्युवेद महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार असून हे प्रशिक्षण ऑन जॉब ट्रेनिंग स्वरुपाचे असेल. प्रशिक्षणानंतर प्रशिक्षित उमेदवारांना शासनातर्फे प्रमाणपत्र प्राप्त होणार असून त्यान्वये त्यांना आरोग्य क्षेत्रात…
जळगाव, प्रतिनिधी । वर्षानुवर्ष प्रलंबित राहणारे खटले, आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळण्यासाठी व आपसात सामोपचाराने तडजोड घडवुन वाद मिटवुन घेण्याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार संपुर्ण देशात 11 डिसेंबर, 2021 रोजी एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी दिली आहे. महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकिल संघ, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने ही राष्ट्रीय लोकअदालत होईल. जळगाव येथे जिल्हा व सत्र न्यायालयाचे आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी.जगमलानी यांचे अध्यक्षतेखाली लोकअदालतीस…
यावल, प्रतिनिधी । यावल तालुक्यात संपूर्ण पशुधनाचे लसीकरण तात्काळ करण्यात यावे अशी मागणी यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन करण्यात आली. पंचायत समिती यावल गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की यावल तालुक्यात संपूर्ण पशुधनावर लाळ्या खूजगट, लम्पि स्क्रीन डिसीज या संसर्जन्य आजारांच्या प्रादुर्भावा पासून पशुधनाचे संरक्षण व्हावे म्हणून पशुसंवर्धन विभागामार्फत पशुचे मोफत लसीकरण करावे.यावल तालुक्यातील ग्रामीण भागात शेती सह पशूपालन हा प्रमुख व्यवसाय आहे.बदलत्या हवामानामुळे गाय,म्हशी,बैल,शेळी,मेंढी या सारख्या जनावरांमध्ये तोंडखुरी, पायखुरी,लाळ्या खूजगट,लम्पि स्किन डिसीज या सारखे साथीचे संसर्ग आजार जनावरांमध्ये आढळून येत आहेत.या संसर्ग आजारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे…
जामनेर, प्रतिनिधी । पहूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांची बदली करा मागणीसाठी युवा सेने उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील यांनी पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्याकडे मागणी केली होती. अखेर या दोघांमध्ये पहूर पोलिस ठाण्यात बैठक घेऊन सलोखा निर्माण करण्यात आला. जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे किरकोळ वादातून दोन जणांमध्ये हाणामारी झाली होती या हाणामारी दोन्ही गट पहूर पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद देण्यासाठी आले असता या ठिकाणी यांच्यासोबत आलेला शेंदुर्णी शहर युवा सेना शहर प्रमुख अजय भोई या युवा सेना कार्यकर्त्याला पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी गैरवर्तन केलं म्हणून पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांची तीन दिवसात बदली करा अन्यथा…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले. हे तीन कायदे मागे घेण्यासाठी काही शेतकरी संघटनांनी बराच काळ आंदोलन केले होते. आज गुरु नानक देवजींच्या प्रकाशाचा पवित्र सण आहे. आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. प्रयत्न करूनही आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. शेतकर्यांचाच एक वर्ग त्याला विरोध करत होता, पण आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता.…
जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील वाकोद गावाजवळ निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या गुरांचा ट्रक पोलिसांनी पकडला असून चालक व विलन्नर या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ट्रक क्रमांक PA-03 AZ 9907 या ट्रक गुरांचा वाहतूक करताना पकडण्यात आला वाकोद गावाजवळ पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांना गुप्त माहितीवरून या ट्रकला वाकोद गावाजवळ रंगेहात पकडण्यात आले या ट्रक मध्ये चौकशी केली असता यामध्ये मयत आठ जर्सी गाय एक लहान गाय असे आढळून आले. या ट्रकमधील चालक संदीप चंदू राम कुमार राहणार पंजाब व विलन्नर मानफिरीही अंग्रेज सिंग राहणार पंजाब या दोघांना रंगेहात पकडून पोलिसांनी ट्रक सह…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील आदर्श नगर येथील रहिवाशी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची रेल्वेस्थानक परिसरातून २० हजार रूपये किंमतीची दुचाकी लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदर्श नगर येथील रहिवाशी मधुकर नथ्थू कोळी (वय-६८) हे आपल्या कुटुंबियासह राहतात. ते सेवानिवृत्त कर्मचारी आहे. अमळनेर तालुक्यातील पाडसे येथे त्यांची शेती आहे. मंगळवार १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता अमळनेर येथे जाण्यासाठी जळगाव रेल्वे स्थानक परिसरात पार्सल ऑफीस जवळ दुचकी (एमएच १९ बीवाय ४५) ने आले. दुचाकी तिथेच पार्किंग करून ते अमळनेर येथे गावाला गेले. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता जळगावात आल्यानंतर त्यांना त्यांची पार्किंग केलेली दुचाकी मिळून आली नाही.…