Author: saimat team

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील पहूर येथे ग्रुप ग्रामपंचायत जव्हार मध्ये आज सकाळी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एडवोकेट एस आर पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून माझे जिल्हा सदस्य राजधर पांढरे शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील माजी उपसरपंच रवींद्र मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी गणेश पांढरे राजधर पांढरे एडवोकेट एस आर पाटील रामेश्वर पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रामेश्वर पाटील यांनी केले तर आभार माजी उपसरपंच रवींद्र मोरे यांनी मानले यावेळी सांडू तडवी शेख चांदतडवी नसृद्दिन तडवी जिल्हा सचिव…

Read More

अमरावती, प्रतिनिधी । शहरात झालेल्या हिंसक घटनेनंतर रविवारी अमरावती शहरात तणावपूर्ण शांतता दिसून आली. या प्रकरणी एकूण १५ गुन्हे दाखल करण्यात आले असून रविवारी सायंकाळपर्यंत ५० संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, त्रिपुरातील कथित हिंसाचार घटनेच्या अफवेने राज्यात निघालेले मोर्चे आणि त्यानंतर अमरावतीसह इतर शहरांत उफाळलेला हिंसाचार या घटनांची चौकशी केली जाईल व दोषींना कठोर शासन केले जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी प्रसार माध्यमांना दिली. अमरावतीमध्ये ४ दिवस संचारबंदी लागू केली असून इंटरनेट सुविधाही बंद केली आहे. रविवारी भाजपने अमरावतीच्या ग्रामीण भागात बंद पुकारला होता. त्यामुळे थोडा तणाव निर्माण झाला. पण एकूण राज्यातील स्थिती नियंत्रणात…

Read More

यावल, प्रतिनिधी । काल दि.14 रविवार रोजी सकाळी आठ तीस वाजता तालुक्यातील एका तलाठ्याच्या समक्ष भुसावल रोडवर पेट्रोल पंपाजवळ वाळूने भरलेले एक ट्रॅक्टर सुसाट वेगाने पळून गेले किंवा त्या ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई होऊ नये म्हणून सोडून देण्यात आले का? तसेच संध्याकाळी आठ तीस वाजता भुसावल रोडवरच एका हॉटेलात 2ते3 तलाठी आणि पश्चिम भागातील एक वाळू तस्करांची पार्टी झाल्याने तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की वाळूने भरलेला ट्रॅक्टर सुसाट वेगाने जात असल्याची माहिती तापी नदी किनारपट्टी जवळील गावातील एका तलाठ्याला दिसले असता त्या वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरचा पाठलाग त्या तलाठ्याने केला. वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरला थांबवले सुद्धा…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्राणज्योत मालवली आहे. सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगशेकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. बाबासाहेबांवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. ते १०० वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपाचार सुरू होते. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रुग्णालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेबांचं निधन झालं. “आदरणीय पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे रुग्णालयात उपचार घेत असताना वृद्धापकाळाने आज दिनांक १५ नोव्हेंबर…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यातील लॉन्ढ्री गावात कापसाच्या मोजणीत फसवणूक झाल्याची घटना काल दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पहूर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे. यावेळी लॉन्ढ्री या गावातील शेतकरी नामदेव राठोड यांचा कापूस ८ हजार १०० या भावाने व्यापाऱ्यांनी खरेदी केला होता, कापूस मोजणी सुरू असताना अचानक शेतकऱ्याला शंका आली असता , कापसाचा वजन काटा असता त्याने त्या मापारी ला सांगून काटा थांबवला त्या नंतर तोच चाळीस किलो वजन केले असता, ते वजन 49 किलो भरले. त्यानंतर नामदेव राठोड यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी व्यापाराला व त्याच्या आयशर गाड्या दोन्ही थांबवून पोलिसांना कळवले असता,तात्काळ पहूर येथून पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्यासह कर्मचारी…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील करवसुली वाढविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून मालमत्ता कर भरणा केल्यास शास्तीमध्ये सूट देण्यात येत होती. महापालिका प्रशासनाच्या अभय योजनेला उत्तम प्रतिसाद लाभल्याने योजना पुन्हा कार्यान्वित केली जावी, अशी मागणी करणारे पत्र महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे केली होती. महापौर महाजन यांच्या या मागणीला यश आले असून, अभय योजना जळगावकरांसाठी पुन्हा दोन महिन्यांसाठी लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 रोजी महापालिका प्रशासनाने तसे आदेशही काढले आहेत. मालमत्ता कराचा भरणा वाढवून महापालिकेच्या करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अभय योजनेंतर्गत जुलै महिन्यापर्यंत सूट देण्यात येत होती. महापालिका प्रशासनाला अभय योजनेत उत्तम प्रतिसाद लाभल्याने योजना पुन्हा…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीण व महानगर जिल्ह्याच्या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर अभ्यास वर्ग आज दिनांक १३ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. या प्रशिक्षण वर्ग शिबिरात दुसऱ्या दिवशीच्या पाचवे सत्रात खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सोशल मीडियाचा प्रसार या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच सहावे सत्रात तरुण भारतचे निवासी संपादक दिनेश दगडकर यांनी भारताची वाढती सुरक्षा व सामर्थ्य या विषयावर मार्गदर्शन केले. समारोप सत्रात आमदार मा.राजुमामा भोळे यांनी प्रशिक्षण वर्गाचा आढावा घेऊन आगामी काळात अधिक क्षमतेने काम करण्यासाठी मार्गदर्शन केले. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ३६५ दिवस कार्य करणारा कार्यकर्ता…

Read More

मणिपूर, वृत्तसंस्था । मणिपूरच्या चूरचंदपूरमध्ये शनिवारी भारतीय लष्कराच्या एका ताफ्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये एक कर्नल, त्यांची पत्नी आणि आठ वर्षाच्या मुलासह आसाम रायफल्सचे चार जवान ठार झाले. या हल्ल्यातील मृतांमध्ये 46 असम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी यांचा समावेश होता. हा हल्ला दिहेंग परिसरापासून तीन किलोमीटरच्या अंतरावर झाला असून, त्यात इतर चार जवानही जखमी झाले असल्यांची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. “शहिदांचं बलिदान देश कधीही विसरणार नाही,” अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली. “मणिपूरच्या चूरचंदपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेला हल्ला भ्याड हल्ला आहे. या हल्ल्यात देशानं पाच जवान गमावले आहेत. त्यात कमांडिंग…

Read More

जळगाव, प्रतिनिधी | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट)चे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली ‘जय भीम’ हा चित्रपट शासनाने कर मुक्त करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. दलितांच्या अन्यायाला वाचा फोडणारा व सत्य घटनेवर आधारीत “जय भीम” चित्रपटास राज्य शासनाने संपुर्ण महाराष्ट्रात कर मुक्त करावा, जेणे करून “जय भीम” चित्रपट हा सर्वसामान्य गोर गरीब जनतेला कमी दरात राहीला तर तो पाहता येईल व त्याद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरी विचारांची माहिती मिळेल. त्यामुळे राज्य शासनाने “जय भीम” चित्रपट हा कर मुक्त करून सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट) जळगावच्या वतीने जळगाव महानगर अध्यक्ष…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४८,२७० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,३४० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६७,१०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे आजचा भाव? गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४८,२७० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,२७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम…

Read More