जळगाव, प्रतिनिधी । नारीशक्ती ग्रुप जळगावतर्फे दि_२० रोजी अमर संस्था संचलित मानव सेवा तीर्थ वेले तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथे गरजूंना ब्लँकेट व औषधी वाटप करण्यात आली. वेले चोपडा येथे मानव सेवा तीर्थ येथे मनोरुग्ण, दिव्यांग तसेच रस्त्यावर अनाथ अशा व्यक्तींना आश्रय देऊन अन्न वस्त्र निवारा या तिन्ही गरजा भागविल्या जाऊन त्यांच्यावर औषधोपचार केला जातो. अशा लोकांची सेवा करण्यासाठी नारीशक्ती ग्रूप जळगाव यांनी पुढाकार घेऊन हिवाळ्याचे औचीत्य साधून अशा एकूण ७० गरजुंसाठी ब्लँकेट व औषधी वाटप करण्यात आली. जळगाव महापौर जयश्री महाजन यांनी औषधी उपलब्ध करून दिली. याप्रसंगी नारीशक्ती ग्रुप जळगाव अध्यक्ष मनिषा पाटील, सुमित्रा पाटील, ज्योती राणे, भावना चौहान,…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आज शनिवार, दि. 20 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजिलेल्या ‘स्वच्छ अमृत महोत्सव’ 2021 अंतर्गत कार्यक्रमात कचरामुक्त शहरासाठीचा जळगावला 3 स्टार रेटिंग हा पुरस्कार गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी छत्तीसगडचे नागरी प्रशासन आणि विकास राज्यमंत्री डॉ.शिवकुमार डहरीया व स्वच्छ भारत अभियानाच्या संचालिका व सहसचिव श्रीमती रूपा मिश्रा यावेळी उपस्थित होत्या. समस्त जळगावकरांच्यावतीने आज मी व उपायुक्त श्री.पवन पाटील यांनी तो स्वीकारला. खरंतर शहरातील नागरिक विविध अडचणींचा सामना करताना मेटाकुटीस येतात. मात्र, सामंजस्य अन् सजगतेचा प्रत्यय आणून देत कचरा विलगीकरणाच्या…
जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा प्रशासन आणि नेहरू युवा केंद्रातर्फे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास या संकल्पनेनुसार देशभक्ती आणि राष्ट्र निर्माण या विषयावर भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावरील स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकांना राज्य आणि देशस्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील स्पर्धकांनी जास्तीत जास्त प्रमाणात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केले आहे. जिल्हा प्रशासन आणि नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या संकल्पनेसह देशभक्ती आणि राष्ट्र निर्माण या विषयावर घोषणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…
चाळीसगाव, प्रतिनिधी । गांजा विक्रीच्या गुन्ह्यातील wanted असलेल्या आरोपीस अटक करण्यात आली. राजु पुंडलीक कुमावत (रा.घाटरोड, चाळीसगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. 2018 मध्ये मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सौंदाणे, ता.मालेगांव, जि.नाशिक येथे एका दुकानदाराला गांजा विक्री करण्यासाठी जवळ बाळगतांना अटक करण्यात आली होती. या दुकानदाराकडुन सुमारे 5 किलो 748 ग्रँम 31 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात सदर दुकानदाराला राजु पुंडलीक कुमावत ( रा. घाटरोड, चाळीसगाव) याने गांजा आणुन दिल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हापासुन राजु पुंडलीक कुमावत (रा. घाटरोड, चाळीसगाव) हा पसार होता. आरोपी कोदगाव शिवारात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली व…
मुंबई, वृत्तसंस्था । एसटी संपावर तोडगा निघत नसल्याने आता आझाद मैदानातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा जोर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील २५० आगारांतील एसटी कर्मचाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने आझाद मैदानात यावे आणि संघर्षाचा लढा तीव्र करावा, असे आवाहन फेसबुकच्या माध्यमातून संपकरी कर्मचाऱ्यांनी केले आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील अनेक आगारांतील एसटी कर्मचारी आझाद मैदानात येतात. ज्यांची घरे या परिसरात आहेत ते येऊन-जाऊन आंदोलनात सहभागी होत आहेत. मैदानात येताना अन्य सहकाऱ्यांसाठी दिवाळीचा फराळ, जेवणाचा डबा घेऊन येतात. तर, मुंबई बाहेरील आगारांतील कर्मचारी मैदानातच वास्तव्यास आहेत. राज्यातील प्रत्येक आगारातून साधारणपणे शंभर कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात यावे. येताना कर्मचाऱ्यांनी पेमेंट स्लीप, आधार कार्ड, मास्क जवळ बाळगावे. तसेच मैदानात…
जळगाव, प्रतिनिधी । रामेश्वर कॉलनीतील एका तृतीयपंथीयाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली एमआयडीसी पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रामेश्वर कॉलनीतील स्मशानभूमीजवळील रहिवाशी विक्रांत उर्फ विक्की उर्फ लैला मनोहर खरकार (वय-२०) या तृतीयपंथीने गुरुवारी रात्री राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. विक्कीने गळफास घेतल्याचे त्याच्या कुटुंबियांना दिसताच त्यांनी आक्रोश केला. परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्यांनी मृतदेह खाली उतवित जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून त्याला मयत घोषीत केले. शुक्रवारी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला त्याच्या पश्चात आई व लहान भाऊ असा परिवार आहे. रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी…
यावल, प्रतिनिधी । आज शुक्रवार दिनांक १९ रोजी यावल येथे भाजपा वैद्यकीय आघाडीतर्फे डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश संयोजक डॉ.अजित गोपछडे यांच्या वाढदिवसानिमित्त आई हॉस्पिटल, जावळे हॉस्पिटल च्या रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी तथा नगरसेवक डॉ कुंदन फेगडे, डॉ पराग पाटील, डॉ. प्रशांत जावळे, विशाल बारी, सागर लोहार आदींची उपस्थिती होती.
जळगाव प्रतिनिधी । शहरातील जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा कारागृहात अमोल ऊर्फ कार्तिक नाना सोनवणे (मराठे) (वय-29 रा. खेडी ब्रुदूक ता. जळगाव) हा खूनाच्या गुन्ह्यात जळगाव जिल्हा करागृहात आहे. गुरुवारी कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर हे कारागृह गस्त घालत होते. यावेळी कैदी गणेश सोनवणे हा त्याच्या बॅरेकच्या बाहेर निघुन त्याने बॅरेक 9 मध्ये जावुन टिव्ही लावला. यावेळी न्यायबंदी समाधान वाल्मीक शेवाळे याने अमोल याला तू आमच्या बॅरेक मध्ये कशासाठी आला, येथे आमचे साहित्य चोरीला जाते असे सांगीतल्यावरुन वादाला सुरुवात झाली. या वादात टिव्ही फोडण्याची…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातून ५७ हजार रूपये किंमतीचा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गणपती नगरातील विलास कैलास सोनवणे (वय-३३) हे खासगी वाहन चालवून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. विलास सोनवणे यांच्या आजीचे वृध्दापकाळाने निधन झाले होते. त्यांच्या दहाव्याचा कार्यक्रम असल्याने सोनवणे हे १४ नोव्हेंबर रोजी कुटुंबियांसह घराला कुलूप लावून जळगाव तालुक्यातील कंडारी येथे गेले. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड, एलईडी टीव्ही, दोन पाण्याच्या मोटारी आणि गॅस हंडी असा एकुण ५७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून…
जळगाव, प्रतिनिधी । राज्य निवडणूक आयोगाच्या 17 नोव्हेंबर, 2021 रोजीच्या आदेशानुसार निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिकत् झालेल्या जळगाव जिल्ह्यातील 162 ग्रामपंचायतीमधील 229 जागांसाठी पोटनिवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. ग्रामपंचायतीतील रिक्त पदांच्या पोटनिवडणूक कार्यक्रम असा राहील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिध्द केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेच्या सुधारणा करण्याचा सोमवार 22 नोव्हेंबर 2021 पर्यंत राहील. तहसिलदार सोमवार, 22 नोव्हेंबर, 2021 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करतील, नमुना ‘अ’ मध्ये नमूद ठिकाणी 30 नोव्हेंबर 2021 (मंगळवार) …