भुसावळ, प्रतिनिधी । येथील कारागृहातील कैद्याला भेटू देण्याच्या मोबदल्यात दोन हजाराची लाच घेतांना पोलीस नाईकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे भुसावळ परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस पोलीस नाईक अनिल लोटन देवरे असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तक्रारदार यांचे नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल असून ते कारागृहात आहे. कैद्याला भेटू देण्यासाठी आरोपी पोलीस नाईक अनिल लोटन देवरे यांनी ३ हजारांची लाच मागितली होती. तडजोड अंती २ हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली व सापळा रचण्यात आला. सोमवारी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास भुसावळ कारागृहात तक्रारदाराकडे देवरे यांनी २ हजारांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने रंगेहात…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहरातील विविध भागात विना परवानगी लावलेल्या फलकांवर महापालिकेने कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील बहिणाबाई चौकातील लेवा बोर्डींग, बसस्थानक ते आकाशवाणी चौकापर्यंत रस्त्याच्या दुभाजकात तसेच ख्वॉजामिया चौक परिसरात काही जणांनी महापालिकेची परवानगी न घेता विविध जाहीरातींचे, शुभेच्छांचे फलक लावले होते. महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी कारवाईची मोहिम राबविली असता सदर फलकांबाबबत कुठलीही परवानगी घेतलेली नसल्याचे आढळून आले. त्यानुसार महापालिकेने कारवाई करुन सर्व फलक जप्त केले. याप्रकरणी रविवारी महापालिका कर्मचारी युवराज नारखेडे यांच्या फिर्यादीवरुन फलक लावणार्या चेतन किशोर शिंपी रा. पोलीस कॉलनी, चंदू आण्णानगर, निलेश संजय जोशी, सुनील विजय…
जळगाव, प्रतिनिधी । आदिवासी क्रांतिकारक थोर स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्यावतीने महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याला उजाळा दिला बिरसा मुंडा यांनी पाणी जंगल आणि भूमिसाठी आदिवासी समाजासाठी त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला एकोणिसाव्या शतकातील बिरसा मुंडा हे महान स्वातंत्र्य सेनानी होते ते चळवळीत सक्रीय होते आदिवाशी होत असलेल्या बिर्टीश दडपणा विरुद्ध बिरसा मुंड यांनी मोठा लढा दिला होता. यावेळी जिल्हा सचिव भरत मोरे, युवक अध्यक्ष मिलींद सोनवणे, कार्याध्यक्ष सागर सपकाळे, महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, संघटक अनिल लोंढे, किरण अडकमोल, हरीष शिंदे, संदीप…
जळगाव, प्रतिनिधी । जळगाव नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेल्या श्रीराम मंदिर संस्थांतर्फे कार्तिकी एकादशीनिमित्त श्रीराम रथोत्सवाचे सोमवारी आयोजन करण्यात आले. पहाटे ४ वाजता काकडा आरती व प्रभू श्री रामांच्या उत्सवमूर्तीस महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता श्रीराम मंदिर संस्थांनचे विश्वस्त गादीपती हभप मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते शारदा वेद पाठशाळा व शहरातील समस्त ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्राच्या घोषात रथाची व उत्सवमुर्तीची महापुजा करण्यात आली व प्रभू श्रीरामांच्या जयघोषणात श्रीराम रथोत्सवाला सुरूवात झाली. रथाचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांची सकाळपासूनच मांदियाळी सुरू आहे. त्यामुळे रथोत्सवाच्या मार्गाला यात्रेचे स्वरुप प्राप्त होवून सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
जळगाव, प्रतिनिधी । शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सौ.सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती ‘बालदिन’ म्हणून साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. साधना महाजन यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शाळेतील उपशिक्षक श्री.प्रशांत साखरे यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली.कार्यक्रमाला सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
जळगाव, प्रतिनिधी । शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सौ सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल मध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण NAS परीक्षा संपन्न झाली. सदर परीक्षेला निरीक्षक म्हणून प्रीती सोज्वळ( केंद्रीय विद्यालय एन. एम. यू .जळगाव) तर सहाय्यक परीक्षक म्हणून वसीम शेख (समावेशित विशेष तज्ञ, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव )वृषाली चौधरी ( विशेष शिक्षिका, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव) हे उपस्थित होते. प्रथमतः विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. सदर परीक्षेला प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्री विजय पवार साहेब यांनी भेट दिली. सूत्रसंचालन श्री किशोर सोनवणे व आभार श्री सागर पाटील यांनी मानले. सदर परीक्षा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. साधना महाजन यांच्या…
जळगाव प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्ज प्रकरण सुरू असतांना आता जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुका येथे एनसीबीच्या पथकाने धडक कारवाई करत १५०० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील एरंडोल येथे एनसीबीचे पथकाला गोपनिय माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी ट्रकमधून वाहतूक करतांना १५०० किलो गांजाची पोती जप्त करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशच्या विखाशापट्टणम येथून हा गांजा विक्रीसाठी महाराष्ट्रात आणण्यात आला होता. यात दोन जणांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही संशयित आरोपी हे आंध्र प्रदेशातील आहे. Maharashtra: Mumbai NCB team seized 1500 kgs of Ganja near Erandol in Jalgaon district; two people apprehended for questioning. The Ganja…
जळगाव, प्रतिनिधी । येथील शिरसोली रस्त्यावरील श्री. गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात राज्य शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व केंद्र शासनाची आयुष्मान भारत योजना लागू झाली आहे. त्यामुळे या रुग्णालयातील अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्यसेवेचा मोफत लाभ पात्र लाभार्थ्यांना घेता येणार आहे. कोविडच्ज्ञा दुसऱ्या लाटेतील रुग्णांवरील सेवाभावी आणि अत्यंत यशस्वी उपचारानंतर गेल्या 22 जुलैपासून हे रुग्णालय मल्टिस्पेशालिटी आरोग्यसेवेसाठी सुरू झाले आहे. रुग्णालयात सर्व अत्याधुनिक यंत्रणा, तंत्रज्ञ व विविध आजारांवरील तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दर्जेदार आरोग्य सेवा शासनाच्या योजना अनेक रुग्णालयांना लागू झाल्या असल्या, तरी एकाच छताखाली मुंबई-पुण्याच्या तोडीस तोड पंचतारांकित आरोग्यसेवा व विविध आजारांवरील…
जळगाव प्रतिनिधी | गर्भवती महिलेस दारूड्या दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत तिचा मृत्यू झाल्याची घटना होती. याप्रकरणी महिलेच्या कुटुंबियांनी दोषीवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही तिचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने तणावाचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील वावडदा येथील ज्योती दीपक गोपाळ (वय २१) ही गर्भवती महिला आपल्या मीनी आणि दीपाली या दोन्ही नणंदांच्या सोबत वावडदा ते म्हसावद या रोडवर शतपावली करत होत्या. इतक्यात सुपडू विक्रम जाधव (रा. वावडदा, ता. जळगाव) हा दुचाकीस्वार भरधाव वेगाने आला. त्याने ज्योतीला मागील बाजूने जोरदार धडक देऊन तिला सुमारे २५ फुटांपर्यंत फरफटत नेले. यात ती गंभीर जखमी होऊन तिचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. दरम्यान, संबंधीत…
पंढरपूर, वृत्तसंस्था । कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज पहाटे अडीच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यांच्यासोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची महापूजा करण्याचा मान नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कोंडिबा टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई टोणगे यांना मिळाला. यावेळी अजित पवार म्हणाले की, ’18-20 महिने मंदिर बंद होती. वारीत खंड पडला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब ही मला म्हणायचे हे पुर्वरत व्हायला पाहिजे. मात्र कोरोना कमी होत नव्हता. मात्र, यंदा प्रशासनाला चांगली साथ दिली. सगळ्यांनी एकत्रित ठरवून यात्रा केली. आता मंदिरंही सुरु झाली आहेत. महापूजेमध्येही मी सहभागी झालो. पण, महाराष्ट्रातील जनतेला सांगतोय कोरोनानं…