Author: saimat team

जळगाव प्रतिनिधी । मुस्लिम आरक्षण संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवार 22 नोव्हेंबर रोजी दुपारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले. 5 जुलै 2019 रोजी विधान भवनावर मोर्चा काढून न्यायालयाने मान्यता दिलेल्या ५ टक्के मुस्लिम शिक्षणिक आरक्षणाचे तातडीने अंमलबजावणी करावी आणि वंचित बहुजन आघाडीने दिलेले पैगंबर बिल पास करावे या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या मागणीनुसार न्यायालयाने मान्यता दिलेले ५ टक्के मुस्लिम शैक्षणिक आरक्षण लागू करावे, धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या वतीने मिळकतीचे वाटप करून खुद्दार हजरत यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे, वारकरी मंडळी येतील कीर्तनकार यांना…

Read More

चाळीसगाव, प्रतिनिधी | २२ वर्षीय विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील पाटणा येथील सणुजा निरजराव फराटे (वय-२२) ह.मु. पाटणा ता. चाळीसगाव या विवाहित तरूणीचा शिवारातील एका विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवार रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सणुजा निरजराव फराटे हि विवाहित तरूणी आहे. तिचे सासर हे पुणे जिल्ह्यातील मांडवगण येथील आहे. तत्पूर्वी ती आपल्या आईवडिलांकडे आलेली असताना हि थरारक घटना घडली. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस…

Read More

जळगाव प्रतिनिधी | जिल्हा बँकेच्या आज सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणूकीसाठी जिल्ह्यात रविवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी १५ केंद्रांवर मतदान घेण्यात आले, यात २ हजार ८५३ मतदारांपैकी २ हजार ६८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत एकुण ९४.०८ टक्के मतदान शांततेत पार पडले. यात सर्वाधिक मतदान मुक्ताईनगर केंद्रावर १०० टक्के झाले. तर त्या खालोखाल भडगाव केंद्रावर ९९.२२ टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात कमी मतदान यावल केंद्रावर ८८.५९ टक्के झाले आहे. मतदान केंद्र निहाय मतदान आकडेवारी पुढील प्रमाणे : जळगाव ४०० पैकी ३६६ (९१.५०) टक्के, भुसावळ १३९ पैकी १३४ (९६.४० ) टक्के, यावल ३३३ पैकी…

Read More

जळगाव प्रतिनिधी | अमरावती येथील दंगलीच्या पार्श्‍वभूमिवर कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्यात आज सकाळी सहा वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत कलम-१४४ (१)(२)(३) अंतर्गत धरणे, मोर्चे आणि आंदोलनांवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांनी याबाबतचे नोटिफिकेशन जारी केले आहे. जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज सकाळी एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात एक दिवसासासाठी जमावबंदीचे निर्देश जारी केले आहेत. या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी खालीलप्रमाणे निर्देश दिले आहेत. ज्याअर्थी, पोलीस अधिक्षक, जळगांव यांनी दिनांक २१/११/२०२१ रोजीचे पत्रान्वये, विविध राजकीय पक्ष/संघटना यांच्यातर्फे महाराष्ट्र राज्यामध्ये दिनांक २२/११/२०२१ रोजी अमरावती येथे दिनांक १२/११/२०२१ रोजी झालेल्या दंगलीची चौकशी तसेच रझा अकादमीवर बंदी घालण्यात यावी व इतर मागण्याकरीता धरणे…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील चौघुले प्लॉट परिसरात रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एका सलून व्यवसायिक तरुणाची चॉपरने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. तरुणाला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याची प्राणज्योत मालवली. ममुराबाद रस्त्यावर असलेल्या प्रजापत नगरात राहणाऱ्या सुनील सुरेश टेमकर वय-३६ या तरुणाचे चौघुले प्लॉट परिसरात सलून दुकान आहे. गेल्या ५ दिवसांपासून तो आजारी असल्याने त्याचे दुकान बंद होते. रविवारीच त्याने दुकान उघडले होते. रात्री १० वाजेच्या सुमारास त्याच्यावर कुणीतरी चॉपरने वार केल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याची प्राणज्योत मालावली. जिल्हा रुग्णालयात शनीपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे…

Read More

राष्ट्रपतीकडून तडवी यांना पुरस्कार, स्वच्छ भारत अभियानात चमकली यावल नगरपालिका यावल, प्रतिनिधी । स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कचरा मुक्त शहर (जीएफसी)या केंद्र शासनाच्या स्पर्धेमध्ये यावल नगरपरिषदेने संपूर्ण भारत देशात चौथा क्रमांक पटकाविला.दिनांक 20 शनिवार रोजी दिल्लीत एका शासकीय समारंभात यावलच्या नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवी यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत भारत सरकारच्या आवासन आणि शहरी कार्य मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या हस्ते सन्मानित करून गौरव करण्यात आला. स्वच्छ भारत अभियान 2021अंतर्गत कचरा मुक्त शहर (G.F.C)या केंद्र शासनाच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत देशपातळीवर चौथा (4) गुणाक्रम प्राप्त करत नगरपरिषद यावलचा दि.20नोव्हेंबर2021रोजी महामहिम राष्ट्रपती मा.रामनाथ जी कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय सचिव…

Read More

यावल तालुक्यात कायद्याचा धाक संपला यावल, प्रतिनिधी । बारा वर्षीय अल्पवयीन बालिकेवर एका तरुणाकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याची घटना यावल तालुक्यात शिरसाड या गावी घडल्याने एकास अटक करण्यात आली.छेडखानी करणाऱ्यांमध्ये कायद्याचा धाक राहिला नसल्याचे तालुक्यात बोलले जात आहे. शिरसाड येथील पीडित एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार शिरागड येथे हात मजुरी करून उदरनिर्वाह चालवतात शनिवार दि.20रोजी दुपारी फिर्यादीची12 वर्षाची लहान बहीण गावालगत कपाशीच्या शेतात सरपण जमा करण्यासाठी गेली असता यावेळी शिरसाड येथे राहणारा सखाराम उर्फ अक्रम मानसिंग बिलाला वय25ह.मु.वराडसिम तालुका भुसावल.हा तिथे आला त्यांनी या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला यावेळी मुलीचा आवाज ऐकून काही ग्रामस्थ व फिर्यादी तेथे…

Read More

जळगाव प्रतिनिधी | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या मतदानास आज सकाळी आठ वाजेपासून प्रारंभ झाला असून याची मतमोजणी उद्या होणार आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात जेडीसीसी बँकेच्या निवडणुकीत आधीच ११ जागा बिनविरोध झाल्या असून या माध्यामातून महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. तर बँकेच्या ९ मतदारसंघातील १० जागांसाठी आज सकाळी आठ वाजेपासून मतदानास प्रारंभ झाला आहे. यात जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे ८५३ आणि इतर संस्थाचे २ हजार मतदार त्यात मतदान करणार आहेत. यासाठी जिल्ह्यात १५ मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलला शेतकरी विकास पॅनलने आव्हान दिली आहे. सहकार पॅनलमध्ये माजी मंत्री डॉ. सतीश…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क इतर राज्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ५० टक्क्यांनी कमी केले असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले. तसेच गुरुवारी यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आल्याचेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले. आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क, खर्चाच्या ३०० टक्क्यांवरून १५० टक्क्यांवर आणण्यात आले आहे,” असे अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वर्षाला १०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या कपातीमुळे सरकारचा महसूल २५० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, यामुळे एक लाख बाटल्यांवरून २.५ लाख बाटल्यांची विक्री वाढेल.

Read More

धुळे, प्रतिनिधी । तालुक्यातील शिरपूर येथे लाकड्या हनुमान शिवारात पोलिसांनी छापा टाकून सुमारे ७ लाख २० हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील शिरपूर येथे लाकड्या हनुमान येथील शेतात प्रदीप वेस्ता पावरा नामक व्यक्तीने शेतात गांजा लावला होता. याविषयीची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिस अधिकारी सुरेश शिरसाठ व त्यांच्या पथकाने छापा टाकाला. शेतात सुमारे ३ ते ५ फुटांपर्यंत वाढलेली गांजाची रोपे आढळली. सर्व रोपे पोलिसांनी तोडून जप्त केली. या कारवाईत सुमारे ३६० किलो गांजा जप्त करण्यात आला. त्यांची किंमत सुमारे ७ लाख २० हजार रुपये आहे. या कारवाईची चाहूल लागण्यापूर्वी…

Read More