Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»ब्रेकिंग न्यूज : अजित पवारांनी सोशल मीडियावरील राष्ट्रवादीचा उल्लेख आणि पक्षचिन्ह हटवले
    मुंबई

    ब्रेकिंग न्यूज : अजित पवारांनी सोशल मीडियावरील राष्ट्रवादीचा उल्लेख आणि पक्षचिन्ह हटवले

    SaimatBy SaimatApril 18, 2023Updated:April 18, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे ४० आमदारांसह भाजपसोबत(BJP) जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज सकाळपासून त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले वॉलपेपर डिलीट केले आहे. अजित पवार यांच्या ट्विटर आणि फेसबुकवर वॉलपेपर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवारयांच्यासह अजित पवार यांचा फोटो होता. ते फोटो कायमस्वरूपी त्यांनी डिलिट केले आहे. त्यामध्ये वॉलपेपर अपलोड केल्यानंतर होणाऱ्या पोस्टसुद्धा डिलिट केल्या आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी हा इशारा दिला आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

    राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याच्या चर्चा सुरू होत्या. भाजप सह शिवसेनेतील अनेक नेत्यांनी अजित पवार अस्वस्थ असल्याचं बोलून दाखवलं होतं. त्यामुळे अजित पवार कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीतून बाहेर पडतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्राने अजित पवार हे 40 आमदारांसोबत भाजपासोबत जाऊन सरकार स्थापन करतील अशी चर्चा सुरू आहे. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाकडून सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भाजपकडून बी प्लॅन तयार केला जात असल्याचे बोलले जात आहे.

    भाजप उद्धव ठाकरे यांच्यानंतर शरद पवार यांना धक्का देण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अजित पवार हे नाराज आहेत का? अजित पवार हे अस्वस्थ आहे का? असे विविध सवाल यानिमित्ताने उपस्थित केले जात आहे. आणि असे असतांना अजित पवार यांनी त्यांच्या सोशल मिडियावरील फेसबूक आणि ट्विटरवर वॉलपेपर काढून टाकला आहे. अजित पवार यांनी यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाव आणि चिन्ह त्यासोबत शरद पवार यांच्यासोबतचा फोटो लावला होता. तो पोस्ट सहित डिलिट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लावले जात आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा भीषण अपघात; पोलो कार पलटून तिघांचा जागीच मृत्यू

    March 19, 2026

    Government Alert : गॅस टंचाई टाळण्यासाठी सरकार सतर्क; शाळा-रुग्णालयांना १००% पुरवठा

    March 18, 2026

    Political : ‘राजकीय गणिते’ पुन्हा मांडणीवर; ठाकरे गटातील खासदार शिंदेंच्या संपर्कात?

    March 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.