फलकावर खडूद्वारे रेखाटले ‘सुवर्णयुग माझ्या शिवबाचं’ वर चित्र

0
3

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कुलचे कलाशिक्षक सुनील डी.भिवसने यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाळेच्या दर्शनी फलकावर रंगीत खडूच्या माध्यमातून ‘सुवर्णयुग माझ्या शिवबाचं’ कलाकृतीचा सुंदर असा प्रसंग सायंकाळी रयतेच्या शेत शिवारात फेरफटका मारताना छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे शेतकरी यांचा हूबेहूब, बोलका सुंदर असा प्रसंग रेखाटला आहे. असे मनमोहक सर्वांना आवडणारे चित्र पाहून विद्यार्थ्यांसह पालक भारावले आहेत.

याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ, संस्थेचे चेअरमन संजय वाघ, मानद सचिव ॲड. महेश देशमुख, व्हा.चेअरमन विलास जोशी, शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे वासुदेव महाजन, मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, उपमुख्याध्यापक नरेंद्र ठाकरे, पर्यवेक्षक आर.एल.पाटील, ए. बी. अहिरे, पर्यवेक्षिका अंजली गोहिल, सांस्कृतिक प्रमुख रहीम तडवी यांनी कलाकृतीचे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here