दलित तरूणाला झाडाला उलटे लटकवून अमानुष मारहाण

0
2

अहमदनगर ः

माणुसकीला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार अहमदनगरमध्ये घडला आहे. अहमदनगरमध्ये एका दलित तरूणाला झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. मारहाण झालेला तरुण अल्वयीन आहे. अत्यंत किरकोळ कारणावरु त्याला ही मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची देखील मागणी केली जात आहे.

शेळी चोरल्याच्या संशयावरून या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेय. त्याच्यासह इतर काही लहान मुलांना देखील मारहाण करण्यात आली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे हा अमानुष प्रकार घडला आहे.

अत्यंत अमानुष कृत्य

मारहाण करणाऱ्यांनी तरूणाला झाडाला उलटे लटकावले आणि माणुसकीला लाजवणारे कृत्य केले. पुरोगामी महाराष्ट्राला लाज आणेल असाच हा प्रकार आहे. या घटनेनंतर नगर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. रिपाइने आक्रमक पवित्रा घेत या घटनेतील सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे तसेच आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here