साईमत न्यूज नेटवर्क –
घटना जालना जिल्ह्यात उघडकीस आली आहे. जाफराबाद तालुक्यातील गोपी शिवार परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन गवळी याने विम्याची मोठी रक्कम मिळवण्यासाठी आणि कर्जातून सुटका करून घेण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्याचा कट आखला. या कटात त्याने अमित राजू फुलारे आणि आकाश गवळी यांना सहभागी करून घेतले.
योजनाबद्ध पद्धतीने या तिघांनी संदीप चव्हाण या तरुणाचा गळा दाबून निर्घृण हत्या केली. त्यानंतर या हत्येला अपघाताचे स्वरूप देण्यासाठी मृतदेह कारमध्ये ठेवून ती कार पेटवून देण्यात आली. या प्रकारामुळे गुन्हा अपघात असल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र पोलिसांनी केलेल्या सखोल तपासातून हा संपूर्ण कट उघड झाला असून नितीन गवळी, अमित फुलारे आणि आकाश गवळी या तिघांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात विमा रक्कम मिळवण्यासाठी हा बनावट मृत्यूचा डाव रचल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अशा गंभीर गुन्ह्यांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
