Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»Zombie Drug Explainer : ‘झोम्बी ड्रग’चा कहर? तरुणांच्या बदलत्या वागणुकीने निर्माण केली भीती
    राज्य

    Zombie Drug Explainer : ‘झोम्बी ड्रग’चा कहर? तरुणांच्या बदलत्या वागणुकीने निर्माण केली भीती

    saimatBy saimatApril 9, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / बंगळुरू

    बंगळुरूमध्ये अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्ये एक तरुण दीर्घकाळ एकाच जागी स्तब्ध उभा असल्याचे दिसते. तो ना पुढे सरकत होता, ना मागे—जणू तो पूर्णपणे भान हरपलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र दिसत होते. या घटनेमुळे पुन्हा एकदा ‘झोम्बी ड्रग’चा मुद्दा चर्चेत आला आहे. यापूर्वीही चंदीगडमधील एका डिलिव्हरी बॉयचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात तो तोंडात बीडी धरून काही काळ न हलता उभा असल्याचे दिसले होते. या दोन्ही घटनांमुळे नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा रंगली—हे तरुण ‘झोम्बी ड्रग’च्या प्रभावाखाली आहेत का?

    झोम्बी ड्रग म्हणजे काय? – ‘झोम्बी ड्रग’ म्हणून ओळखला जाणारा पदार्थ म्हणजे झायलाझिन (Xylazine). हे मूळतः प्राण्यांसाठी वापरले जाणारे भूल देणारे औषध आहे. पशुवैद्यक उपचारांमध्ये प्राण्यांना शांत करण्यासाठी किंवा वेदना कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हे औषध ओपिओइड नसले तरी, जेव्हा ते फेंटानिल, हेरॉईन किंवा कोकेनसारख्या अमली पदार्थांसोबत मिसळले जाते, तेव्हा त्याचा परिणाम अधिक तीव्र आणि दीर्घकाळ टिकणारा होतो.

    ‘झोम्बी’ हे नाव का? – या ड्रगच्या प्रभावामुळे व्यक्तीची हालचाल आणि प्रतिसाद देण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी होते. व्यक्ती दीर्घकाळ एकाच स्थितीत राहते, जणू काही ती जिवंत असूनही निष्क्रिय आहे. त्यामुळेच या संयोजनाला ‘झोम्बी ड्रग’ असे नाव दिले गेले आहे.

    शरीरावर होणारे परिणाम – झायलाझिन मेंदूतील ‘अल्फा-२ रिसेप्टर्स’वर परिणाम करून नॉरपेनेफ्रिनचे प्रमाण कमी करते. यामुळे व्यक्तीला तीव्र गुंगी येते, जागरूकता कमी होते आणि स्नायूंवर नियंत्रण कमी होते. काही प्रकरणांमध्ये त्वचेवर जखमा आणि गंभीर दुष्परिणामही दिसून येतात.

    वाढत्या वापरामागील कारणे- हे औषध तुलनेने स्वस्त असल्यामुळे आणि इतर ड्रग्सचा परिणाम जास्त वेळ टिकवण्यासाठी त्यात मिसळले जाते. विशेषतः फेंटानिलसारख्या पदार्थांसोबत वापरल्यास नशेचा कालावधी वाढतो.

    भारतामध्ये स्थिती काय? – भारतात झायलाझिनचा मानवी वापर अधिकृतपणे बंदीस्त असून, तो केवळ पशुवैद्यकीय उपयोगासाठीच परवानगी आहे. तरीही अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीमुळे अशा धोकादायक संयोजनांचा वापर वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अमली पदार्थांचे प्रमाण अधिक असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

    नवीन धोका समोर – अलीकडील अहवालांनुसार, ‘मेडेटोमिडाइन’ नावाचा आणखी एक अधिक शक्तिशाली पदार्थ बाजारात येत असून, तो झायलाझिनपेक्षा अधिक धोकादायक असल्याचे सांगितले जाते.

    या पार्श्वभूमीवर, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा व्हिडिओंमुळे समाजात जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या अमली पदार्थांपासून दूर राहणे आणि त्याविषयी योग्य माहिती ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Narendra Modi : ‘टीएमसीने तरुणांचा विश्वासघात केला, लांगुलचालन करणाऱ्या घुसखोरांचा खेळ थांबवू’

    April 9, 2026

    Mumbai crime : विशेष पोलीस मोहिमेत मुंबईत 10 आरोपी अटक; 29 किलो ड्रग्ज आणि 10.14 कोटींची संपत्ती जप्त

    April 8, 2026

    उन्हाळी सुट्टीत एसटी प्रवास महाग; १० टक्के भाडेवाढ आणि स्वच्छता अधिभार लागू

    April 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.