Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»भडगाव»Bhadgaon : अखिल भारतीय साहित्य संमेलनात कवी राम जाधव यांच्या कवितेची निवड
    भडगाव

    Bhadgaon : अखिल भारतीय साहित्य संमेलनात कवी राम जाधव यांच्या कवितेची निवड

    saimatBy saimatDecember 23, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Selection of poet Ram Jadhav's poem at the All India Literature Conference
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     ‘आम्ही लोक आदिवासी’ या कवितेची कविकट्टा या व्यासपीठवर निवड झाली.

    साईमत/भडगाव/प्रतिनिधी : 

    सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पिंपरखेड (ता.भडगाव) येथील माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेतील माध्यमिक शिक्षक कवी राम सखाराम जाधव यांची ‘आम्ही लोक आदिवासी’ या कवितेची कविकट्टा या व्यासपीठवर निवड झाली. दि.३ जानेवारी रोजी सत्र क्र.११ मध्ये दुपारी १२ ते १ या वेळेत कविताचे सादरीकरण होणार आहे.

    कवी राम जाधव हे आदिवासी बोलीभाषा व बंजारा बोलीभाषेचे अभ्यासक आहेत.आदिवासी बालकांमध्ये राहून त्यांनी पारंपरिक, मौखिक, लोकगीते जमवून त्यांनी त्या गीतांचा मराठी या प्रमाण बोलीभाषेत काव्यात्मक अनुवाद केला आहे. आदिवासी बोलीभाषेतील गीतांच्या माध्यमातून त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना चार ते पाच वेळा जळगाव आकाशवाणी केंद्रावरून गायन व प्रसारण करण्यासाठी सुसंधी उपलब्ध करून दिलेली आहेत.

    कवी राम जाधव यांच्या कवितांचे जळगांव आकाशवाणी केंद्रावरून अनेक वेळा गायन, प्रकट, वाचन व प्रसारण झालेले आहेत. ‘आई मला जन्म घेऊ दे’ ही बालनाटिका श्री.जाधव यांनी बालकांसाठी लिहून विद्यार्थ्यांना जळगाव आकाशवाणी केंद्रावरून प्रसारण करण्यासाठी सुसंधी उपलब्ध करून दिलेली आहे. कवी राम जाधव यांचे ‘तुमच्या कवितेचे प्रेरणास्रोत’ आणि ‘आजतागायत झालेली वाटचाल’ ही प्रकट मुलाखत देखील जळगाव आकाशवाणी केंद्रावरून प्रसारीत झालेली आहे.

    राम जाधव यांच्या कविता विविध साहित्य संमेलन किशोर, शिक्षण संक्रमण या शैक्षणिक मासिक तसेच विविध दिवाळी अंक व वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या आहेत. राम जाधव यांचे ‘आदिवासी बोलीभाषा’ व ‘काव्यात्मक अनुवाद’ हा पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर असून ते विविध पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या सचिव सौ.सनेर, माध्यमिक मुख्याध्यापकए.ए.पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक के.आर.पाटील यांच्यासह शाळेतील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कवी राम जाधव यांचे अभिनंदन केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Bhadgaon : भडगावमध्ये साधूवेशातील भामट्यांचा धक्कादायक फसवणूक प्रकार; दाम्पत्याची सोन्याच्या अंगठ्या लंपास

    January 23, 2026

    Bhadgaon:रणा नदीतून वाळू चोरी रोखताना महसूल-पोलिसांवर हल्ला

    December 31, 2025

    Bhadgaon : दर्शन पाटीलची ‘साधनाई गुणवंत्त विद्यार्थी’ पुरस्कारात हॅट्रिक

    December 24, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.