Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»Government Extends : ज्वारी–मका खरेदी नोंदणीस शासनाची मुदतवाढ
    कृषी

    Government Extends : ज्वारी–मका खरेदी नोंदणीस शासनाची मुदतवाढ

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoDecember 1, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    १५ डिसेंबरपर्यंत शेतकरी नोंदणी करा, जिल्हा प्रशासनाचे आवाहन

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   

    खरीप पणन हंगाम २०२५-२६ अंतर्गत किमान आधारभूत किमत खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी, मका व बाजरी (भरडधान्य) खरेदीकरिता शेतकरी नोंदणीच्या अंतिम मुदतीत वाढ केली आहे. पूर्वी ही मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत होती. मात्र, आता असलेली नोंदणी BeAM पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत असून नोंदणी संथगतीने होत असल्याने शासनाने नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

    शासनाने प्रत्यक्षात खरीप खरेदी प्रक्रिया ३ नोव्हेंबर २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्याचे निश्चित केले आहे. भरडधान्याकरिता ज्वारी (संकरीत) ३ हजार ६९९, मका २ हजार ४००, बाजरी २ हजार ७७५ रुपये प्रति क्विंटल निश्चित केले आहेत. जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, पाळधी, एरंडोल, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, शेंदुर्णी, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव आदी केंद्रांवर शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ घेता येणार आहे.

    सर्व शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य खरेदी योजनेचा लाभ घ्यावा. ही योजना शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा याकरीता राबविण्यात येत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ज्वारी, मका व बाजरी विक्रीकरीता आपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर जावून सातबारा उतारा, आधारकार्ड व बँकेचे पासबुक घेवून प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करुन घ्यावी. नोंदणी ही ऑनलाईन पध्दतीने पॉस मशिनद्वारे करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँकेचे पासबुक, चालू वर्षाचा सातबारा उतारा, पीकपेरा आदी कागदपत्रांसह नोंदणीकरीता प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

    शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

    खरेदीकरीता आपणास एसएमएस प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला F.A.Q. दर्जाचे भरडधान्य विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेवून यावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon:ऑनलाईन फसवणूक: शेतकऱ्याचे बँक खाते हॅक, ५.५ लाख रुपयांची लंपास

    March 18, 2026

    Bhusawal:खडका चौक परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य

    March 18, 2026

    Pachora:स्टॅम्प पेपर घोटाळा उघड; ५०० रुपयांच्या ‘जादा’ मागणीने वेंडर एसीबीच्या जाळ्यात

    March 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.