Z.P. Officer : जि.प.च्या अधिकारी स्नेहा पवार, जामनेरचे बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान

0
18

जि.प.च्या सीईओ मिनल करनवाल यांच्या अनोख्या उपक्रमाची घोषणा

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुख आणि गटविकास अधिकारी यांना प्रशासकीय काम करताना प्रोत्साहन मिळावे, चांगले काम केल्याबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी, यादृष्टीने महिनाभरात विविध विषयांबाबत उत्तम काम करणाऱ्या विभागप्रमुख, गटविकास अधिकारी यांना प्रोत्साहनपर अर्ध शासकीय पत्र देण्याची घोषणा केली आहे. मे महिन्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार आणि जामनेर येथील गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांची निवड केली आहे.

प्रशासकीय काम करताना येणाऱ्या अडचणींवर मात करून विहित कालावधीत ठरलेली कामे पूर्ण करून त्या बाबींचा लाभ सामान्य घटकापर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुख व गटविकास अधिकारी यांची दर महिन्याला निवड करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत एप्रिल महिन्यासाठी जिल्हा परिषदेचे एक विभागप्रमुख, एक गटविकास अधिकाऱ्यांची यासाठी निवड केली आहे.

पारदर्शक बदली प्रक्रिया अन्‌ घरकूल योजनेची अंमलबजावणीच्या कामगिरीची दखल

मे महिन्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, जामनेर येथील गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांची निवड केली आहे. स्नेहा पवार यांना पारदर्शक बदली प्रक्रिया राबविल्याबद्दल तर जामनेर गटविकास अधिकारी यांना घरकूल योजनेच्या अंमलबजावणीत केलेल्या कामगिरीबद्दल निवड केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here