Shanipeth Police Raid : शनिपेठ पोलिसांचा अवैध गॅस भरणा केंद्रावर छापा, ६१ सिलेंडर जप्त

0
11

संशयित तीन जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

शहरातील मोहन टॉकीज परिसरातील एका घरात अवैधरित्या गॅस भरणा केंद्र उभारले होते. या केंद्रांवर शनिपेठ पोलिसांनी छापा टाकत ६१ सिलेंडर जप्त केले असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी संशयित तीन जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहे. तसेच रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? त्याचा शोध घेत आहे.

अवैध गॅस भरणा केंद्रामुळे या भागातील रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन शनिपेठ पोलिसांनी २८ व्यावसायिक सिलिंडर (१० भरलेले, १८ रिकामे) आणि ३३ घरगुती सिलिंडर (१३ भरलेले, १० रिकामे) जप्त केले आहेत. अवैधरित्या गॅस भरण्याच्या गुन्ह्यात संशयित आरोपी वाहन चालक आदेश राजू पाटील, राहुल नारायण सोनवणे आणि राकेश नारायण सोनवणे यांचा समावेश आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई शनिपेठ पोलीस ठाण्याच्या निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील पोलीस कर्मचारी शशिकांत पाटील, कमलेश पाटील, प्रदीप नन्नवरे, योगेश साबळे, गजानन वाघ, निलेश घुगे, अमोल वंजारी, विक्की इंगळे, नवजीत चौधरी, पराग दुसाने यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here