Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Baliram Peth : बळीराम पेठेत रस्त्यावर वाढते अतिक्रमण ठरतेय डोकेदुखी
    जळगाव

    Baliram Peth : बळीराम पेठेत रस्त्यावर वाढते अतिक्रमण ठरतेय डोकेदुखी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 16, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शनिपेठच्या पोलीस निरीक्षकांनी सर्व हॉकर्सला दिली तंबी

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरातील चौकाचौकांमध्ये भाजीपाला विक्रेते व्यवसाय करतात. त्यातील काही हॉकर्स त्यांच्या गाड्या रस्त्यावर लावतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्याचा वाहनचालकांसह पादचारी नागरिकांना त्रास होतो. बळीराम पेठ आणि शनिपेठ येथे मुख्य मार्गांवर हॉकर्स गाड्या लावतात. यासाठी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत कावेरी कमलाकर यांनी अशा बेशिस्त हॉकर्सला शिस्त लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी सोमवारी, १६ जून रोजी स्वतः पायी फिरून सर्वांना तंबी दिली आहे. दरम्यान, कावेरी कमलाकर यांच्या कार्यकाळात बळीराम पेठ आणि शनिपेठचा मुख्य रस्ता सोबतच गल्ल्या मोकळा श्वास घेतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केले आहे.

    जळगाव शहरात दररोज शनिपेठ तसेच बळीराम पेठ भागात मुख्य रस्त्यांवर भाजीपाला विक्रेते व्यवसाय करतात. भाजीपाला विक्रेते रस्त्याच्या कडेला न उभे राहता भिंतीपासून ५ ते ७ फूट पुढे उभे राहतात. त्यामुळे जवळपास अर्धा रस्ता हॉकर्सने व्यापला जातो. त्यातच खरेदीसाठी येणारे नागरिक रस्त्यावर आपली वाहने उभी करत असल्याने अनेकवेळा पायी चालण्यास जागा मिळत नाही. त्यातच शनिपेठ पोलीस ठाण्याकडून ये-जा करण्यासाठी हाच मुख्य मार्ग आहे.

    भाजीपाला विक्रेत्यांचे वजन काटेही केले जप्त

    शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी बाजारात फिरून रस्त्यावर बसणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना चांगलाच दम दिला. तसेच ८ ते १० भाजीपाला विक्रेत्यांचे वजन काटेही त्यांनी जप्त केले. बेशिस्त हॉकर्स आणि भाजीपाला विक्रेत्यांना कायमस्वरूपी शिस्त लावण्याची गरज असल्याचा सूर सर्वसामान्य जनतेतून उमटत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.