Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Smugglers Attack Jalgaon Police : गोवंश तस्करीचे वाहन पकडले, तस्करांनी जळगावच्या पोलिसांवर केला हल्ला
    क्राईम

    Smugglers Attack Jalgaon Police : गोवंश तस्करीचे वाहन पकडले, तस्करांनी जळगावच्या पोलिसांवर केला हल्ला

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 16, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुदैवाने बचावले ; एक ताब्यात, तिघे फरार

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    जिल्ह्यात गोवंश तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. अशा घटनांना आळा बसावा, यासाठी पोलीस प्रशासनातर्फे वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे. अशातच रविवारी, १५ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गोवंश तस्करी करणाऱ्या इनोव्हा वाहनाचा मुक्ताईनगरजवळून पाठलाग सुरु केला. त्यांना हे वाहन अकोला जिल्ह्यात पकडण्यात यश आले. परंतु, वाहनातील तस्करांनी पोलिसांवर हल्ला चढविला. तस्करांनी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना वाहनाने चिरडण्याचाही प्रयत्न केला. त्यात ते गंभीर जखमी झाले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले.

    एलसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक अनिल जाधव आणि पोलीस चालक दर्शन ढाकणे हे रविवारी रात्री जिल्ह्याभर गस्तीवर होते. पोलिसांनी गोवंश तस्करी करत असलेल्या संशयावरुन गाडीचा मुक्ताईनगरपासून मलकापूर, नांदुरा, बाळापूरमार्गे पथकाने तब्बल १०० कि.मी.पेक्षा अधिक अंतराचा पाठलाग सुरु केला. पोलिसांनी अकोलाजवळ संबंधित इनोव्हा वाहनाला ओव्हरटेक करून थांबवले. त्यावेळी संदीप पाटील यांनी गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तस्कराने इनोव्हा रिव्हर्स घेत त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांच्या छातीला आणि बरगड्यांना दुखापत झाली आहे. पाय आणि चेहरा खरचटला आहे. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव केला.

    तिघांनी पोलिसांना दिला चकवा

    एवढ्यावरच न थांबता संदीप पाटील यांनी हार न मानता वाहनासह एकास ताब्यात घेतले. मात्र, वाहनातील इतर तिघे आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले आहेत. त्यानंतर त्यांनी तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षास तसेच खामगाव व अकोला पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच अकोला पोलिसांनी त्वरित नाकाबंदी लागू केली. मात्र, आरोपींनी जंगल किंवा ग्रामीण भागात पळून जाऊन पोलिसांना चकवा दिला. घटनास्थळी अकोला पोलिसांनी पंचनामा केला आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम उशीरापर्यंत सुरु होते. दरम्यान, गोवंश तस्करी करणारे आता पोलिसांवरही हल्ले करत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा तस्करांवर कठोर कारवाईसाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.