Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»welfare board schemes : कामगारांना कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ मिळावा
    जळगाव

    welfare board schemes : कामगारांना कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ मिळावा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 20, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बांधकाम, घरेलू कामगारांतर्फे जोरदार निदर्शने, घोषणाबाजीने परिसर दणाणला

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    जिल्ह्यातील बांधकाम कामगार आणि घरेलू कामगारांच्या विविध मागण्यांसाठी तसेच कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ मिळावा अशा प्रमुख मागणीसाठी मंगळवारी, २० मे रोजी दुपारी १२ वाजता आंबेडकर मार्केट परिसरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर जळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटना आणि घरेलू कामगार संघटना यांच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या मोठ्या घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता.
    निदर्शनांमध्ये कामगारांनी अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यापैकी प्रमुख मागणी होती की, बोगस आणि अपात्र कामगारांची नोंदणी तात्काळ थांबवावी. यासोबतच खऱ्या आणि पात्र बांधकाम कामगारांची कल्याणकारी मंडळाने तातडीने नोंदणी करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. पात्र कामगारांना गृहोपयोगी भांडे आणि इतर आवश्यक लाभ त्वरित मिळावेत, अशा प्रमुख मागण्यांसाठी कामगारांनी आवाज उठविला. हे आंदोलन पाच मागण्यांसाठी करण्यात आले.

    खरे कामगार लाभांपासून वंचित

    आंदोलनात जिल्हा बांधकाम संघटनेचे विजय पवार, अनिकेत ताराबाई महाजन आणि प्रवीण चौधरी यांच्यासह बांधकाम कामगार, घरेलू कामगार उपस्थित होते. कामगारांनी आपल्या हक्कांसाठी एकजुटीने घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. बोगस नोंदणीमुळे खऱ्या कामगारांना मिळणाऱ्या लाभांपासून वंचित रहावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला.

    आंदोलनकर्त्यांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा

    निदर्शनांमुळे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाबाहेर काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी योग्य बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. कामगार संघटनांनी प्रशासनाने मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा, यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.