Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»औषध निरीक्षकाची लाचखोरी: एसीबीने रचला सापळा
    क्राईम

    औषध निरीक्षकाची लाचखोरी: एसीबीने रचला सापळा

    SaimatBy SaimatMarch 12, 2025Updated:March 12, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या एका मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणात अन्न व औषधे प्रशासन कार्यालयातील औषध निरीक्षक किशोर देशमुख यांनी पशूपक्षी फार्मा दुकानाचा परवाना मिळवण्यासाठी ८ हजार रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून औषध निरीक्षक देशमुख आणि त्यांच्या पंटरला रंगेहात पकडले आहे.

    शिरपूर येथील एका व्यापारी संकुलातील गाळ्यात तक्रारदाराने पशूपक्षी फार्माचे दुकान सुरू करायचे होते. त्यासाठी त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल केला होता. औषध निरीक्षक किशोर देशमुख यांनी तक्रारदाराला सांगितले की ते शिरपूर येथील मेडिकल दुकानदार तुषार जैन यांच्यासह स्थळ पाहणी करणार आहेत आणि त्यासाठी ८ हजार रुपये द्यावे लागतील. या लाच मागणीमुळे तक्रारदाराने धुळे येथील एसीबीच्या कार्यालयात तक्रार दाखल केली.

    एसीबीच्या पथकाने पारोळा चौफुलीवर सापळा रचला आणि तुषार जैनला रंगेहात पकडले. त्यानंतर औषध निरीक्षक किशोर देशमुख यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Pachora : अश्लील व्हिडिओचा राग तरुणाची निर्घृण हत्या, पती-पत्नी अटकेत

    March 14, 2026

    Parola : शहरातील थकीतदारांविरोधात नगरपरिषदेची धडक कारवाई

    March 13, 2026

    Varangaon:वरणगावात वृद्धावर लोखंडी रॉडने धोकादायक हल्ला

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.