Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»सेवानिवृत्त वृद्धाची १९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
    क्राईम

    सेवानिवृत्त वृद्धाची १९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoNovember 26, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ शहर पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल

    साईमत/भुसावळ/प्रतिनिधी

    शहरातील तापी नगरात राहणाऱ्या एका ६५वर्षीय वृद्धाला बँकेचे व्यवहार घरपोहच करून देऊन चांगले रिटर्न मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल १९ लाख ४०५ रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    प्रदीपसिंह प्रतापसिंह परदेशी (वय६५, रा. तापी नगर, भुसावळ) हे वृद्ध आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते सेवानिवृत्त आहेत. १० मार्च २०२३ ते ६ डिसेंबर २०२३ च्या दरम्यानच्या काळात जळगाव येथे राहणारे संदीप चौधरी आणि सोनाली चौधरी यांनी प्रदीपसिंह परदेशी यांना बँकेचे व्यवहार घरपोहच करून देऊन चांगले रिटर्न मिळवून देऊ, असे सांगून विश्वास संपादन करून त्यांच्याकडून कॅश, ऑनलाईन व चेकद्वारे तब्बल १९ लाख ४०५ रुपये स्वीकारून त्याच्या मोबदल्यात बनावट व हुबेहूब दिसणारे कागदपत्र तयार करून त्यांच्या घरी आणून अपहार केला.

    दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रदीपसिंह परदेशी यांनी २५ नोव्हेंबर रोजी दुपारी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी संदीप चौधरी,सोनाली चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय विजय गायकवाड करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.