Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»चोपड्यात कारमध्ये सापडली तब्बल तीस लाखांची रोकड, दोघे ताब्यात
    चोपडा

    चोपड्यात कारमध्ये सापडली तब्बल तीस लाखांची रोकड, दोघे ताब्यात

    saimatBy saimatOctober 25, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    उपकोषागारात होणार जमा : निवडणूक निर्णय अधिकारींची माहिती

    साईमत/चोपडा/प्रतिनिधी

    तिरंगा चौक श्रीनाथ प्राईड येथे २४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास होंडाई व्हेन्यू कंपनीची गाडीत तीस लाख रुपयांची रोकड आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून नाकाबंदी तपासणी केली जात असतांना हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही रक्कम कुणाची आणि कुठे घेऊन जात होते, हे अद्याप समोर आलेले नाही. निवडणूक पार्श्वभूमीवर उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. लवकरच सत्यता उघड होईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.

    घटनेतील गाडी होंडाई व्हेन्यू कंपनीची क्र.एमपी०९-सीके७४७४ असा अाहे. तिच्यात ३० लाखांची रोकड मिळून आली. त्यात ५०० रुपये दराचे १५ लाख रुपये तर २०० रुपये दराचे सहा लाख रुपये आणि १०० रुपये दराचे ९ लाख रुपये, अशी रोकड सापडली आहे. ती रक्कम जप्त केली आहे. याप्रकरणी इम्रान अल्लाउद्दीन मन्सुरी (वय ४४, रा. बलवाडी, ता. वरला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) आणि अजय अरुण पाटील (वय ३२, रा. जयहिंद कॉलनी, चोपडा) हे दोघे रोकड रक्कम घेऊन चोपडा मार्गे जळगावकडे जात असताना तिरंगा चौकात श्रीनाथ प्राईड हॉटेल समोर मिळून आले आहेत. याबाबत सविस्तर पंचनामा केला आहे.

    रोकड कोणाची? खरा मालक कोण ? उलटसुलट चर्चा सुरु

    सार्वत्रिक निवडणूक विधानसभा २०२४ च्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, महेश्वर रेड्डी यांनी नाकाबंदी करण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, मधुकर साळवे, त्यांच्या सोबत असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे नाका तपासणी करीत असताना हा प्रकार उघडकीस आला. चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीत वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.

    ही रोकड कुठून कुठे घेऊन जात होते आणि ही रोकड कोणाची? हिचा खरा मालक कोण ? याबाबत शहरात उलट सुलट चर्चा सुरु आहे. त्याची पोलीस कसून चौकशी करीत आहे. ही रक्कम उपकोषागार कार्यालयात जमा करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक अधिकारी पाटोळे यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

    यांनी केली कारवाई

    ही कारवाई चाळीसगावच्या अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर (पवार), चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप, चोपडा शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, स.पो.नि. एकनाथ भिसे, पो.उ.नि. अनिल भुसारे, जितेंद्र वालटे, विजय देवरे, योगेश्वर हिरे, स.पो.उ.नि जितेंद्र सोनवणे, पो.हे.कॉ. संतोष पारधी, श्री.शिपी, ज्ञानेश्वर जवागे, पो.ना. संदीप भोई, पो.कॉ.प्रकाश मथुरे, प्रमोद पवार, विनोद पाटील, अमोल पवार, मदन पावरा, रजनीकांत भास्कर, अक्षय सूर्यवंशी, समा तडवी यांनी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Chop : ट्रॅक्टर अपघातात बाप-लेकाची एकाच दिवसात शोकांतिका

    February 7, 2026

    Chop : चोपड्यातील वाहतूक हवालदार निलंबित

    January 31, 2026

    chop : माहेरी आलेल्या महिलेची विहिरीत उडी दोन मुलांसह मृत्यू

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.