धूम स्टाइलने महिलेची सोन्याची पोत लांबवली

0
10

चोपडा शहरातील गौतम नगरातील घटना

साईमत/चोपडा/विशेष प्रतिनिधी

शहरातील गजबजलेल्या गौतमनगर भागात बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पायी फिरणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत धूम स्टाइलने समोरून पल्सर मोटारसायकलने येत दोन तरुणांनी लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

आशा प्रल्हाद बिऱ्हाडे (वय ५४) या बुधवारी, १६ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शहरातील गौतमनगर भागातील रस्त्यावरून फिरण्यास जात असताना समोरून अचानक वेगात विना नंबर प्लेटची दुचाकी आली.त्यावर तोंड बांधून बसलेल्या युवकांनी बिऱ्हाडे यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत तोडून धूम स्टाइलने पोबारा केला. दोघेही चोरटे तरुण हे २५ ते ३० वयोगटातील असावेत, असा अंदाज आहे.

महिलेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आरोपी दिसेनासे झाले होते. आशा प्रल्हाद बिऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here