विविध गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप
साईमत/चोपडा/प्रतिनिधी
येथील इनरव्हील क्लबतर्फे नवरात्रीनिमित्त ‘गरबा नाईट’ चे आयोजन केले होते. गरबा नाईटसाठी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉ. वैशाली सौंदाणकर, सचिव पूनम गुजराथी यांनी परिश्रम घेतले. गरबा नाईटला प्रमुख पाहुण्या म्हणून इंदिरा पाटील, ज्योती पावरा होत्या. तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. प्रा. ईश्वर सौंदाणकर, आशिषभाई गुजराथी, व्ही. एस. पाटील, एम. डब्ल्यू. पाटील, संजय बारी, रोटरीचे डिस्ट्रिक्ट जाॅइंट सेक्रेटरी तथा गरबा नाईटचे प्रायोजक नितीन व रश्मी अहिरराव उपस्थित होते.
याप्रसंगी विविध गटात पारितोषिके देण्यात आली. ६ ते १५ वयोगटातून गरबा प्रिन्स आरव गुजराथी व गरबा प्रिन्सेस धनश्री पाटील यांची निवड करण्यात आली. बेस्ट कॉस्च्यूमचे बक्षीस जैस्वाल बहिणींना देण्यात आले. १६ ते ५५ वयोगटातून गरबा किंग म्हणून सनम जैन तर गरबा क्वीन म्हणून सुरभी पोतदार यांनी मान मिळवला. बेस्ट कपल म्हणून खुशबू अग्रवाल व मयंक अग्रवाल यांची निवड करण्यात आली. बेस्ट कॉस्च्यूम पुरुष गटात अग्रवाल व महिला गटात निकिता अग्रवाल हे विजेते ठरले. बेस्ट डान्सर म्हणून कनन सचदेव, हितीषा पाटील, हर्षिता साळी, नेहा जैन, भावना चौधरी यांनी बक्षिसे पटकावली. इनरव्हील सभासदांमधून बेस्ट डान्सर म्हणून आशा वाघजाळे, सरोज पाटील, सोनल जैन यांना बक्षिसे देण्यात आली. वयोगट ५०+ मध्ये सौ. वारडे यांना बक्षिस देण्यात आले.
सर्व बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. परीक्षकाचे काम लिना पाटील, ज्योती टाटीया यांनी पाहिले. यशस्वीतेसाठी भगिनी मंडळाच्या सर्व विभागातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी तसेच इनरव्हील क्लबच्या सभासदांचे सहकार्य लाभले.
