Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»चोपड्यात मालवण घटनेचा आम आदमी पार्टीतर्फे तीव्र जाहीर निषेध
    चोपडा

    चोपड्यात मालवण घटनेचा आम आदमी पार्टीतर्फे तीव्र जाहीर निषेध

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 28, 2024Updated:August 28, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टर, अधिकाऱ्यांसह मंत्र्यांवर कठोर कारवाईची मागणी

    साईमत/चोपडा/प्रतिनिधी :

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील शिवस्मारक अवघ्या आठ महिन्यात कोसळल्याने आम आदमी पार्टी चोपडा शाखेतर्फे घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. विद्यमान सरकारने फक्त प्रसिद्धीसाठी देशातील कोट्यावधी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे चोपडा तालुका आम आदमी पार्टीतर्फे घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच दुर्दैवी घटनेला जबाबदार भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टर, अधिकारी व मंत्र्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

    भारतीय नौदल दिनाचे औचित्य साधून गेल्या ४ डिसेंबर २०२३ रोजी मालवणनजीक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला होता. तो पुतळा अवघ्या आठ महिन्यात म्हणजे २६ ऑगस्ट २०२४ रोजी पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुतळा बसविण्यापूर्वी शिवप्रेमींनी आवाज उठवून पुतळा आकारहीन व शिल्पशास्त्रास धरून नसल्याचे कळवले होते. परंतु सूचनांकडे दुर्लक्ष करून शिवस्मारकाचे घाईघाईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शिव स्मारकासाठी महाराष्ट्रातील जनतेचे अडीच कोटी रुपये खर्चुन जयदीप आपटे या अल्पअनुभवी कारागिराला काम दिले गेले होते.

    यांची होती उपस्थिती

    यावेळी जिल्हा महासचिव विठ्ठलराव साळुंखे, तालुकाध्यक्ष समाधान बाविस्कर, युवा नेते बाबु कोळी, तालुका सचिव भीमराव उमाळे, अशोक ढालवाले, बळीराम बारेला, मयाराम बोरेला, सुनील रमेश बोरला, छोटू सोनवणे, विजय शेलकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chop : ट्रॅक्टर अपघातात बाप-लेकाची एकाच दिवसात शोकांतिका

    February 7, 2026

    Chop : चोपड्यातील वाहतूक हवालदार निलंबित

    January 31, 2026

    chop : माहेरी आलेल्या महिलेची विहिरीत उडी दोन मुलांसह मृत्यू

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.