Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»चोपडा – यावल रस्त्यावरील पाण्याने तुंबलेले खड्डे झाले ‘जीव घेणे’
    चोपडा

    चोपडा – यावल रस्त्यावरील पाण्याने तुंबलेले खड्डे झाले ‘जीव घेणे’

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 24, 2024Updated:August 24, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वाहनधारकाने लहान रोपटे लावले खड्ड्यात, संभाव्य अपघात टाळण्याचा प्रयत्न

    साईमत/चोपडा/प्रतिनिधी :

    चोपडा- यावल आंतरराज्य मार्गावरील माचला फाट्याच्या अलीकडे असलेला छोटाश्या पुलावर एक मोठा खड्डा झालेला आहे. त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत. मोटरसायकल, चारचाकी वाहने हे जलद असतात. त्यामुळे जोरात खड्ड्यात आदळतात. वाहनधारकास पाणी तुंबलेल्या ठिकाणचा खड्डा लक्ष्यात न आल्याने दुचाकीवर बसलेले महिला, लहान मुले हे वाहनावरून बाजूला फेकली जातात. आजच लहुश धनगर, वर्डी यांच्या डोळ्यात देखत अशीच घटना घडली. वाहन धारकास पाणी तुंबलेल्या ठिकाणचा खड्डा लक्षात यावा, म्हणून त्यांनी लागलीच लहान रोपटे त्या खड्ड्यात लावले. संभाव्य अपघात टाळण्याचा लहानसा प्रयत्न केला. सद्यस्थितीला चोपडा – यावल रस्त्यावरील पाण्याने तुंबलेले खड्डे ‘जीव घेणे’ झाल्याचे चित्र आहे.

    सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याची डागडुजी करत असते. पण या रस्त्याच्या दुरुस्तीचे ‘नशीब’ केव्हा उघडेल? त्याच्या प्रतीक्षेत वाहनधारक आहेत. चोपडा सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांना सद्यस्थितीत पावसाळा सुरु असल्याने डागडुजी करता येणार नसल्यास रस्त्यावरील आणि पुलाच्या बाजूला साचणाऱ्या पाण्याचा निचरा करावा. लोकांचा जीव वाचवावा.जेणेकरून वाहनधारकांना खड्डे दिसतील आणि जीवितहानी थांबण्यास मदत होईल, अशी सर्वत्र मागणी होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chop : ट्रॅक्टर अपघातात बाप-लेकाची एकाच दिवसात शोकांतिका

    February 7, 2026

    Chop : चोपड्यातील वाहतूक हवालदार निलंबित

    January 31, 2026

    chop : माहेरी आलेल्या महिलेची विहिरीत उडी दोन मुलांसह मृत्यू

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.