Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»आर्ट गॅलरीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावणार
    जळगाव

    आर्ट गॅलरीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावणार

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 19, 2024Updated:August 19, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जागतिक छायाचित्रणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांचा सूर

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी:

    जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर असोसिएशन, भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सोमवारी, १९ ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रणा दिनानिमित्त कॅमेरा पूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आर्ट गॅलरीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावणार असल्याचा सूर जागतिक छायाचित्रणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांमधून उमटला. अध्यक्षस्थानी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हास पाटील होते. भ्रमणध्वनीद्वारे आ.राजूमामा भोळे, डॉ.केतकीताई पाटील, शिवसेनेचे शरद तायडे यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

    यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मनीष जैन, जळगाव नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष चतुर्भुज सोनवणे, माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी महापौर सीमाताई भोळे, प्रेस फोटोग्राफरच्या असोसिएशनच्या आमंत्रित सदस्य सरिता माळी-कोल्हे, जैन उद्योग समूहाचे उपाध्यक्ष अनिल जोशी, माजी उपमहापौर करीमभाई सालार, माजी उपमहापौर अश्विन सोनवणे, दर्जी फाउंडेशनचे गोपाळ दर्जी, नगरसेवक विशाल त्रिपाठी, सामाजिक कार्यकर्ते तथा बिल्डर युसूफ मकरा, ज्येष्ठ नगरसेवक कैलास आप्पा सोनवणे, नगरसेवक सुनील माळी, अशोक लाडवंजारी, वाल्मीक पाटील, ॲड.जमील देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते इरफान नुरी, पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक श्री.मोरे, जळगाव जिल्हा दूध फेडरेशनचे संचालक अरविंद देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

    प्रास्ताविकात फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष शब्बीरभाई यांनी आर्ट गॅलरीसाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा मिळावी, असे गेल्या २० वर्षांपासून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना मागणी करण्यात येत आहे. मात्र, आजपर्यंत काहीही उपयोग झालेला नाही. आर्ट गॅलरीमुळे जागतिक पातळीवर गावाचे नाव मोठे होणार आहे. त्यात सगळ्या उभयतांना मदतीचे आवाहन केले. फोटोग्राफर व त्यांच्या परिवारासाठी वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

    आर्ट गॅलरीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन

    यावेळी सरिता माळी-कोल्हे यांनी जळगाव नगरीत भव्य दिव्य अशी आर्ट गॅलरी निर्माण होण्याकामी शासन दरबारी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले. माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी आपल्या कार्यास पक्षभेद सोडून पूर्ण सहकार्य करू, असे सांगितले. दर्जी फाउंडेशनचे गोपाळ दर्जी यांनी छायाचित्रणाच्या इतिहासाबद्दल थोडक्यात माहिती देऊन मार्गदर्शन केले. करीमभाई सालार यांनीही राजकीय मतभेद सोडून आर्ट गॅलरीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे उपस्थितांना आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी आर्ट गॅलरीसाठी व प्रेस फोटोग्राफर यांच्या इतर समस्यांबाबत जे पण सहकार्य लागेल ते मी करेल, असे आश्वासन दिले. जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त सर्व उपस्थित फोटोग्राफर्सना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

    यांनी घेतले परिश्रम

    मान्यवरांचे स्वागत प्रेस फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष शब्बीर सय्यद, पदाधिकारी वैभव धर्माधिकारी, सतीश जगताप, जयंत चौधरी, अतुल वडनेरे, राजू हरीमकर, ईश्वर राणा, विशाल महाजन यांनी केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते कॅमेऱ्यांचे पूजन करण्यात आले. यशस्वीतेसाठी वैभव धर्माधिकारी, जयंत पाटील, राजू हारीमकर, अतुल वडनेरे, बंटी सय्यद, विशाल महाजन, प्रियंक शहा यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रेस फोटोग्राफर असोसिएशनचे आमंत्रित सदस्य युवराज वाघ तर आभार सतीश जगताप यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव प्रभाग ७ मध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती भीती, नगरसेविकांची महापौरांकडे तातडीची मागणी

    March 2, 2026

    Jalgaon:महापालिकेत नवीन जेसीबी व अग्निशमन वाहनांचा समावेश

    March 2, 2026

    Amalner:शेतकरी गौरवासाठी अमळनेरमध्ये उभा होणार अजित पवारांचा पुतळा

    March 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.