वीज ग्राहकाचा विद्युत पुरवठा केला खंडीत

0
32

साईमत/ न्यूज नेटवर्क/ जळगाव :

शहरातील सुकृत्ती ड्रीम होम प्लॅट न. वी वाटीका आश्रमजवळील रहिवासी तथा प्रशासकीय सेवेतील कार्यरत कर्मचारी भारत कुंडलिक भगत यांनी काही कारणास्तव वीज बील उशीराने अदा केले होते. परंतु संबंधित अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा लेखी आदेश नसताना गुरुवारी, ११ जुलै रोजी विद्युत पुरवठा खंडीत केेला आहे. त्यामुळे त्यांनी पिंप्राळा सबस्टेशन वीज महावितरणचे उपअभियंता यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर उकाडा होत आहे. अशातच भारत भगत यांना अस्थमाचा त्रास आहे. त्यामुळे त्यांच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांसह कर्मचारी जबाबदार राहतील, असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या तक्रारीची महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here