Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»अनैतिक संबंधांत अडसर ठरणाऱ्या दिव्यांग पतीला पत्नीने धाडले ‘यमसदनी’
    क्राईम

    अनैतिक संबंधांत अडसर ठरणाऱ्या दिव्यांग पतीला पत्नीने धाडले ‘यमसदनी’

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 13, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

    अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या दिव्यांग पतीला विहिरीत ढकलून देत त्याचा निर्घृणपणे पत्नीने खून करुन त्याला ‘यमसदनी’ धाडले असल्याची घटना धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे घडली आहे. यासंदर्भात केवळ बदनामीच्या भीतीपोटी मयत व्यक्तीच्या काकाने उशिरा फिर्याद दिली. दरम्यान, धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून पत्नीला अटक केली आहे. या घटनेमुळे धरणगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

    प्रकाश यादव धोबी (वय ४५, रा. भवरखेडा, ता. धरणगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो गावात पत्नी ज्योती, १ मुलगा, १ मुलगी यांच्यासह राहत होता. तो पायाने दिव्यांग असतानाही परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, पत्नी ज्योती हिचे माहेरी येथे गावातील एकाशी अनैतिक संबंध असल्याची त्याला माहिती होती. पत्नी ज्योतीसोबत त्यांचे अनेकदा शाब्दिक वाद झाले होते. ज्योती धोबी यांनी पती प्रकाश धोबी यांना २ जून रोजी मुंजोबा मंदिरात पूजेसाठी जायचे, म्हणून घेऊन गेली होती. तेथे शालिक पाटील यांच्या शेतात मुंजोबा मंदिरात आशीर्वाद घेतल्यानंतर तेथे असलेल्या विहिरीजवळ पत्नी घेऊन गेली. तेथे परत त्यांचे वाद झाले.

    त्यानंतर पत्नीने पती प्रकाश धोबी यांना विहिरीत ढकलन देत हत्या केली. काही अंतरावरून प्रकाश धोबी यांचे काका अर्जुन धोबी यांनी ही घटना पाहिली. मात्र, बदनामीच्या भीतीने त्यांनी कोणाला सांगितले नाही. त्यानंतर बुधवारी, १२ जून रोजी काका अर्जुन धोबी यांनी धरणगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावर ही घटना उघड झाली आहे. खून करणाऱ्या पत्नीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उध्दव ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:आशाबाबा नगरात मध्यरात्रीची चोरी हॉटेल मॅनेजरच्या घरातून ४५ हजारांचा ऐवज लंपास

    March 4, 2026

    Dharangaon: धरणगाव तालुक्यातील नाले आणि बंधारे सुधारण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम

    March 2, 2026

    Chalisgaon: बसस्थानकावरील गर्दीत महिलेचे ४० हजारांचे मंगळसूत्र लंपास

    March 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.