थोरपाणी आदिवासी पाड्यावर खा.रक्षाताई खडसे यांनी दिली भेट

0
84

साईमत, यावल : प्रतिनिधी

रावेर लोकसभा कार्यक्षेत्रात २६ मे रोजी रात्री झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामध्ये सातपुडा जंगलाच्या पायथ्याशी तथा यावल तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेस लागून असलेल्या आंबापाणी या अतिदुर्गम आदिवासी भागातील गावाजवळील थोरपाणी आदिवासी पाड्यावर घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच आदिवासी पावरा कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे बुधवारी, २९ रोजी भाजपाचे पदाधिकारी यांच्यासह घटनास्थळी खा.श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भेट देऊन स्थानिकांकडून घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच घटनेत पावरा कुटुंबातील ८ वर्षाचा मुलगा बचावला आहे. त्याची भेट घेत सांत्वन करून धीर दिला. तसेच पाड्यावर झालेल्या नुकसानीची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी संवाद साधला.

घटनेत पावरा कुटुंबातील नानसिंग गुला पावरा, सोनुबाई नानसिंग पावरा, रतीलाल नानसिंग पावरा व बालीबाई यांचा मृत्यू झाला आहे. संबंधित कुटुंबाला व नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाकडून योग्य ती भरीव मदत तत्काळ मिळावी, यासाठी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सोबत उपस्थित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.


यावेळी यावल बाजार समितीचे
सभापती हर्षल पाटील, डॉ. कुंदन फेगडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पाटील, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, नरेंद्र नारखेडे, भरत महाजन, पुरजीत चौधरी, डॉ.सुनील पाटील, अनिल पाटील, राहुल पाटील, इडा बारेला यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here