Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»स्पर्धा परीक्षा तयारी सोबत विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्य रुजावे
    अमळनेर

    स्पर्धा परीक्षा तयारी सोबत विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्य रुजावे

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 26, 2024No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

    स्पर्धा परीक्षा तयारी सोबत विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्य रुजवावे. त्यांचा सर्वांगीण विकास करावा, त्यातून आदर्श नागरिक घडेल, असे प्रतिपादन मंगळ ग्रह सेवा संस्था अमळनेरचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी केले. येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित पू. साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अमळनेर आयोजित दोन दिवशी करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी अध्यक्षीय मनोगतात बोलत होते.

    याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेरचे डीवायएसपी सुनील नंदवाडकर, प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. एस आर चौधरी, एम.एम.कॉलेज पाचोरा येथील प्रा.डॉ.अतुल सूर्यवंशी, साने गुरुजी ग्रंथालयाचे चिटणीस प्रकाश वाघ उपस्थित होते.
    यावेळी डीवायएसपी नंदवाडकर, डॉ. एस.आर.चौधरी, डॉ. अतुल सूर्यवंशी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच स्नेहल सिसोदे, आदित्य पाटील, गायत्री पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

    दोन दिवशी कार्यशाळेत विद्यार्थ्यांसाठी सामान्यज्ञान स्पर्धा, प्रश्‍नमंजुषा, वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वन मिनिट शो स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले. परीक्षक म्हणून नगरपरिषदेचे निवृत्त प्रशासन अधिकारी भाऊसाहेब देशमुख, निवृत्त शिक्षक व्ही.एन.ब्राह्मणकर, श्रम साफल्य अभ्यासिका वेल्हाणेचे संचालक के.एल.पाटील, कळमसरे हायस्कूलचे उपशिक्षक सोपान भवरे, तलाठी एम.आर.पाटील, पोलीस चंदन पाटील, विशाल सोनवणे, दानेश सोनार, मयूर पाटील यांनी काम पाहिले.

    यासाठी लोकमान्य टिळक स्मारक समिती, पंकज कॉम्प्युटरचे संचालक राजेंद्र भावसार, निवृत्त लिपिक रवींद्र चव्हाण, माजी नगरसेवक राजू फाफोरेकर, शिक्षक सतीश कांगणे, जाधव इंग्लिश अकॅडमीचे संचालक विनोद जाधव, शिक्षक प्रवीण पाटील, चंद्रकांत देसले, प्रेमराज पवार, शशिकांत पवार, आयटीआय इन्स्ट्रक्टर गणेश पाटील, पीडब्ल्यूडीचे असिस्टंट इंजिनियर युनूस पिंजारी, विनोद सोनवणे यांचे सहकार्य लाभले.

    श्रीमती सरला हरिभाऊ पाटील एलआयसी अधिकारी, विजय जगन्नाथ बोरसे निवृत्त स्टेट बँक अधिकारी, दिलीप राजाराम सोनवणे अध्यक्ष साने गुरुजी ग्रंथालय, प्रकाश रामदास वाघ चिटणीस साने गुरुजी ग्रंथालय, उज्ज्वला आणि चंद्रकांत नगावकर या मान्यवरांच्या दातृत्वातून विविध स्पर्धांसाठी रोख बक्षीस विद्यार्थ्यांना देण्यात आली. यशस्वीतेसाठी पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाचे अध्यक्ष, चिटणीस, संचालक मंडळाचे परिश्रम घेतले. सूत्रसंचलन स्नेहल सिसोदे, मेघा मोरे या विद्यार्थिनींनी तर केंद्र संचालक विजयसिंह पवार यांनी आभार मानले.

    विविध स्पर्धा, बक्षिसे यांचा निकाल असा-

    सामान्यज्ञान स्पर्धेत योगेश प्रदीप पाटील प्रथम, नम्रता दिलीप सोनवणे द्वितीय, मयूर जितेंद्र पाटील तृतीय, प्रिया राजूसिंग परदेशी, जान्हवी आशिष जोशी उत्तेजनार्थ, वकृत्व स्पर्धेत आदित्य दिलीप पाटील प्रथम, विशाल संजय सोनवणे द्वितीय, स्नेहल योगेश शिसोदे तृतीय, कुशल रवींद्र भदाणे उत्तेजनार्थ, प्रश्‍नमंजुषा स्पर्धेत गट क्रमांक दोन प्रथम, गट क्रमांक तीन द्वितीय, गट क्रमांक एक तृतीय, गट क्रमांक सात उत्तेजनार्थ, रांगोळी स्पर्धेत कोमल भोई, पूनम भोई प्रथम, मेघा मोरे, जयश्री मोरे द्वितीय, नम्रता सोनवणे, किरण लांबोळे तृतीय, प्रिया परदेशी, आदित्य पाटील उत्तेजनार्थ, वन मिनिट शो स्पर्धेत अजिंक्य प्रवीण सोनवणे प्रथम, गायत्री कैलास पाटील द्वितीय, स्नेहल योगेश शिसोदे तृतीय, आदित्य दिलीप पाटील, तेजस्विनी मनोहर कोठावदे उत्तेजनार्थ अशा विजयी स्पर्धकांंचा समावेश आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Amalner:शेतकरी गौरवासाठी अमळनेरमध्ये उभा होणार अजित पवारांचा पुतळा

    March 2, 2026

    Amalner:चार जणांकडून साईड न दिल्याच्या वादातून व्यापाऱ्याच्या कारची तोडफोड

    February 20, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.