नशिराबाद, प्रतिनिधी : जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ६० विद्यार्थ्यांना वह्या, व्यवसाय पुस्तिका, कंपास पेटी, चित्रकला वही आदी साहित्य देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नशिराबाद शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष विनायक वाणी होते. यावेळी जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत बँकेतर्फे अशा प्रकारचे उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या शैक्षणिक साहित्याचा उपयोग आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास बँकेचे संचालक प्रवीण खडके, तरल शहा, निमिष पाटील, विजय जोशी, संचालिका ज्योत्स्ना बऱ्हाटे तसेच बँकेचे अधिकारी शुभ श्री दप्तरी यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी नशिराबाद शिक्षण मंडळाचे संचालक ॲड. प्रदीप देशपांडे, शाळेच्या मुख्याध्यापिका एस. ए. बनसोडे, उपमुख्याध्यापक ए. डी. चौधरी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. टी. पाटील यांनी केले.
