Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»रावेर»सावद्यात पालिकेतर्फे महिलांसाठी मतदार जनजागृती कार्यशाळा
    रावेर

    सावद्यात पालिकेतर्फे महिलांसाठी मतदार जनजागृती कार्यशाळा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoApril 26, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर

    येथील नगर पालिकेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच सावदा शहरातील महिलांनी मतदान प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे, याकरिता आयोजित केलेल्या कार्यशाळेत शहरातील बचत गटातील महिलांचे प्रतिनिधी म्हणून बचत गटाचे अध्यक्ष आणि सचिव यांना आमंत्रित केले होते. कार्यशाळेत उपस्थित सर्व महिलांना मतदानबाबतची प्रतिज्ञा देण्यात आली.

    मुख्याधिकाऱ्यांनी नगरपरिषदेतर्फे १०० टक्के मतदान हे ध्येय लक्षात ठेऊन स्पर्धेचे आयोजन केले आहे. याप्रसंगी महिलांना जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्यासाठी त्यांनी आवाहन केले. तसेच बचत गटातील व कुटुंबातील ८५ टक्के सदस्यांनी मतदान केल्यास कास्य प्रमाणपत्र तसेच ८६ टक्के ते ९५ टक्के सदस्यांनी मतदान केल्यास त्यांना रजत प्रमाणपत्र तसेच ९६ टक्के ते १०० टक्के सदस्यांनी मतदान केल्यास त्यांना सुवर्ण प्रमाणपत्र देण्यात येईल, याबाबत मार्गदर्शन केले.

    मतदान जनजागृती निमित्त शहरात, चौकाचौकात आणि मोक्याच्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. त्या माध्यमातून शहरातील मतदार आपले नाव मतदार यादीमध्ये शोधू शकतात. तसेच मतदानाचे ठिकाण याबाबतही माहिती मतदारांना मिळेल.

    नगरपरिषदेमार्फत रविवारी आठवडे बाजारात मतदान कक्ष स्थापन करून त्याठिकाणी शहरातील मतदार आपली मतदानाबाबतची स्लीप घेऊ शकतात याबाबत मार्गदर्शन केले. सावदा शहरातील दिव्यांग मतदार बांधवाकरीता पालिकेतर्फे प्रत्येक मतदान केंद्रावर व्हील चेअरची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच ८५ वर्षावरील वयोगटातील मतदारांना घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

    कार्यक्रमाला मुख्याधिकारी भूषण वर्मा, कार्यालय अधीक्षक सचिन चोळके, लेखापाल विशाल पाटील, सहा.प्रकल्प अधिकारी संदीप पाटील, समुदाय संघटक महेश इंगळे, शहर समन्वयक अरुणा चौधरी, संगणक तंत्रज्ञ धिरज बनसोडे, वरिष्ठ शिपाई राजेंद्र मोरे आदी उपस्थित होते.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Savda, Taluka Raver: भीषण अपघात भरधाव मोटारसायकलच्या धडकेत पादचारी ठार

    February 23, 2026

    Savda : सावदात भीषण आग! पाच दुकाने जळून खाक, लाखोंचे आर्थिक नुकसान

    February 4, 2026

    Raver : रावेरजवळ समोरासमोर धडक; दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

    February 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.